সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, April 14, 2014

सलग सुट्टय़ांमुळे अनेक कर्मचार्‍यांनी मारली बुट्टी

निवडणूक धामधुमीचा मिळाला फायदा

सलग सुट्टय़ांमुळे अनेक कर्मचार्‍यांनी मारली बुट्टी

सुट्टय़ांमुळे शासकीय कार्यालये पडली ओस

तीन दिवसांच्या सुट्यांनी सरकारी कर्मचारी खूश

लागोपाठ आलेल्या तीन दिवसांच्या सुट्यांमुळे कर्मचारी चांगलेच खूश आहेत.संपूर्ण विदर्भात १0 एप्रिलला लोकसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले. निवडणुकीनिमित्त कर्मचार्‍यांवर असलेल्या शासकीय व निमशासकीय कर्मचारी उशिरापर्यंत कामावर असल्याने त्यांना ११ एप्रिलला सुटी देण्यात आली. १२ एप्रिलला दुसरा शनिवार, १३ एप्रिल रविवार तर १४ एप्रिलला भारतर▪डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती सलग तीन दिवस सुटी येत असल्याने असा योग नेहमी येणे नाही म्हणून काही कर्मचार्‍यांनी आपल्या कुटुंबीयांसोबत शेगाव, शिर्डी दर्शनासाठी बाहेर जात आहे तर काही तरुण कर्मचारी उन्हाळय़ाची दाहकता कमी करण्यासाठी चिखलदर्‍याला जाणार असल्याचे कळते. सलग तीन दिवसांची सुटी मिळाल्याने काही कर्मचारी घरीच आराम करणार असल्याचे बोलून दाखविले. मात्र सलग तीन दिवसांची सुटी मिळाल्याने शासकीय कर्मचारी मात्र जाम खूश आहेत.


रविवार ६ एप्रिलपासून दर दोन-तीन दिवसाआड येत असलेल्या विविध सणांमुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचार्‍यांसाठी सुट्यांचा जणू सुकाळ आहे. त्यामुळे शासकीय कार्यालये ओस पडली असून सलग सुट्टय़ांमुळे अनेकांनी बुट्टी मारून एकप्रकारे उन्हाळ्याच्या सुटीचा आनंद घेणे सुरू केले आहे. त्यात लोकसभा निवडणुकीच्या कामाची भर पडली असून जे निवडणुकीच्या कामात नव्हते त्यांनीही काम असल्याचे यात हात धुऊन घेतला आहे. 

१0 एप्रिल रोजी जिल्ह्यात लोकसभेची निवडणूक पार पडली. या मतदान कामासाठी अनेक अधिकारी व कर्मचार्‍यांची नियुक्ती केली होती. त्यांना वगळले असता इतर कर्मचारी व अधिकारी यांना मात्र कार्यालयाचीच जबाबदारी होती. मात्र त्यांनीही निवडणुकीचा व सततच्या सुट्टीचा आनंद घेण्याचा प्रय▪केल्याने अनेक कार्यालये आजही ओस पडली आहेत. विशेष म्हणजे ६ एप्रिल रोजी रविवार असल्याने शासकीय सुट्टी तर ७ एप्रिल रोजी सोमवारी कार्यालय होते. त्यानंतर ८ एप्रिल रोजी मंगळवारी रामनवमीची सुट्टी तर ९ एप्रिल रोजी कार्यालय होते. कार्यालय असले तरी इतर कर्मचारी व अधिकारी निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने या कर्मचार्‍यांना विचारणारा कोणीही नसल्याने मात्र ९ एप्रिललाही अनेकांनी बुटीच मारल्याचे निदर्शनास आले. पुन्हा १0 एप्रिलला मतदानाची सुट्टी तर ११ रोजी कार्यालय होते. मात्र १२ एप्रिलला दुसरा शनिवार, १३ एप्रिलला रविवार व १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि हनुमान जयंती दिनानिमित्त कार्यालयांना सुटी. नंतर तीन दिवस कार्यालये असले तरी १८ एप्रिलला गुडफ्रायडे, त्यानंतर शनिवार आणि पुन्हा रविवारची सुटी आल्याने या सततच्या सुटीचा आनंद घेण्यासाठी अनेकांनी कार्यालयाला बुट्टी मारल्याचे चित्र आहे. 

गेल्या आठवडाभरात फक्त एक किंवा दोन दिवस कर्मचार्‍यांनी कार्यालयात पाऊल ठेवले असल्याने जनसामान्यांची कामे खोळंबली आहेत. हे चित्र सर्वत्र शासकीय कार्यालयात अनुभवास मिळत आहे. जिल्हा परिषद हे लोकप्रतिनिधींच्या नियंत्रणाखाली असते. मात्र मागील महिनाभरापासून जिल्हा परिषदेचे अधिकारीही आपल्या प्रचारकार्यात व्यस्त असल्याने त्यांच्या कार्यालयातील कर्मचार्‍यांचेही चांगलेच फावले. शासकीय कार्यालयात फेरफटका मारला असता एकही कर्मचारी या पदाधिकार्‍यांच्या कार्यालयात हजर नव्हते. पदाधिकारीच नसल्याने येथील कर्मचार्‍यांना कोणतीच बंधने नसल्याने त्यांना मोकळे रान मिळाले आहे. हे चित्र मागील महिनाभरापासून पाहावयास मिळत असले तरी आता मात्र २१ एप्रिलपासून पूर्ववत अधिकारी आणि कर्मचार्‍यांचे आगमन झाल्यानंतर त्यांच्या स्वच्छंदाला आळा बसण्याची शक्यता आहे, पण गेल्या दोन आठवड्यांपासून असलेल्या सुट्यांमुळे आलेला आळस लवकर निघणार नाही हेही तितकेच खरे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.