সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, April 14, 2014

चंद्रपुरात रक्ताचा तुटवडा

चंद्रपुरात रक्ताचा तुटवडा 
राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेली "ब्लड ऑन कॉल' ही योजनाही सध्या अडचणीत सापडली आहे. रक्ताचा तुटवडा असल्याच्या पार्श्‍वभूमीवर ही योजना राबविताना जिल्हा रुग्णालयाच्या रक्त संक्रमण विभागातील अधिकाऱ्यांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे. 
गंभीर रुग्णांना तातडीने रक्त मिळावे, त्यांना खासगी रक्तपेढ्यांच्या चकरा मारण्याची वेळ येऊ नये, यासाठी राज्य शासनाने "ब्लड ऑन कॉल' ही योजना सुरू केली. योजनेनुसार रक्त हवे असल्यास त्याने 104 क्रमांकावर संपर्क साधावा. हा दूरध्वनी पुणे येथील आहे. तेथून मग ज्याला रक्ताची गरज आहे; त्याला ते तातडीने देण्याची व्यवस्था जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त संक्रमण विभागाची चमू करते. यासाठी खर्चही फक्त पन्नास रुपये येतो. जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात "ब्लड ऑन कॉल' योजनेतून जवळपास दीडशे-दोनशे बॉटल रक्त गरजूंना देण्यात आले होते. आता अशी परिस्थिती राहिली नाही. सध्या जिल्हा सामान्य रुग्णालयातच रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. मार्च, एप्रिल, मे आणि जून महिन्यांचा काळ सुट्यांचा असतो. उन्हाळ्याच्या सुट्यांमुळे शाळा, महाविद्यालयेही बंद असतात. त्यामुळे रक्तदान शिबिरांची संख्या कमी झाली आहे. हे रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याचे प्रमुख कारण आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त संक्रमण विभागात महिन्याकाठी 600 ते 700 बॉटल असतात. मात्र, सुट्यांमुळे हा स्टॉक आता 60 ते 70 बॉटलवर आला असल्याची माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयातील रक्त संक्रमण विभागाचे अधिकारी डॉ. अनंत हजारे यांनी दिली. 

खासगी रक्तपेढ्यांची चांदी जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्याचा सर्वाधिक फायदा खासगी रक्तपेढ्यांना होत आहे. खासगी रक्तपेढ्याचालक मोठ्या रकमा रक्ताच्या बॉटलसाठी घेत असल्याचे एका रुग्णाने सांगितले. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.