সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, April 29, 2014

गुंठेवारी प्रकरणात तलाठी राजेंद्र अतकरे निलंबित

ब्रम्हपुरी -
गुंठेवारी प्रकरणात गुंठेवारी अधिनियम २00१ चा चुकीचा अर्थ लावित कृषक जमीन अकृषक केल्याप्रकरणी तत्कालीन तलाठी राजेंद्र अतकरे यांना उपविभागीय अधिकारी दीपा मुधोळ यांनी निलंबित केले.

नागभीड मार्गावर साई पेट्रोलपंप असून पेट्रोलपंपाची जमीन विधवा महिला कुंदा मोहन रामटेके हिच्या मय्यत पतीला रवी भैसारे, रामू मेहर व आनंद लांबट यांनी संगनमत करून जमीन हडपली. सदर जमीन भूमापन क्र. ६४/१ आराजी 0.६२ पैकी आराजी 0.१२ हेक्टर आर धोखाधडी करून विकल्या गेली. या प्रकरणात तत्कालीन तलाठी राजेंद्र अतकरे यांनी वरिष्ठ महसूल अधिकार्‍यांचा आदेश नसताना चुकीचा अर्थ लावित आपल्या मजिर्ने जमिनीचा चुकीचा फेरफार केला. तसेच चुकीची आकारणी लावली. या प्रकरणी हा वाद न्यायालयात सुरु होता. अर्जदान कुंदा रामटेके यांनी ब्रम्हपुरी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदविली होती. त्यानुसार ब्रम्हपुरी उपविभागीय अधिकारी दीपा मुधोळ यांनी प्रकरणाची शहानिशा केली असता दोषी आढळून आलेले तत्कालीन तलाठी राजेंद्र अतकरे यांना २४ एप्रिलला आदेश देवून निलंबित केले. राजेंद्र अतकरे हे सध्या नागभीड येथे तलाठी म्हणून कार्यरत आहेत. या आधीही गुंठेवारी प्रकरणात अनेक अधिकारी नगरपरिषद अधिकारी, बिल्डर यांना अटक व निलंबनाची कार्यवाही करण्यात आली आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.