ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील व्यवस्थापनाचे मूल्यांकन करण्यासाठी तज्ज्ञ समिती येत्या
२३ व 24 एप्रिलला ताडोबा व्याघ्र प्रकल्पात येणार आहे.
व्यवस्थापन आराखड्यातील उद्देशपूर्तीसाठी केलेल्या कामाची किती व कसा प्रभाव झाला यांची पाहणी ते करणार आहेत. व्याघ्र प्रकल्पातील सद्य:स्थितीची पाहणी हे सदस्य करतील. व्याघ्र प्रकल्पातील व्यवस्थापन आराखड्यामध्ये जी कामे नेमून देण्यात आलेली आहेत. त्याचा वन्यप्राण्यांवर काय परिणाम झाला वन्यप्राण्यांसाठी असलेली योजना किती प्रभावीपणे राबविली गेली. यामध्ये वन्यप्राण्यांचा अधिवास, पाण्याची उपलब्धता, निसर्ग पर्यटन, व्याघ्र प्रकल्पातील गावांचे पुनर्वसन आदी कामांचा समावेश आहे.
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणातर्फे आंध्र प्रदेशातील सेवानिवृत्त प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) विजयकुमार सिथला यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठित करण्यात आली. या समितीत भारतीय वन्यजीव संस्थेचे सदस्य व्ही. के. पुनियाल, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी नसीन अहमद अन्सारी, जागतिक वन्यजीव निधीचे प्रतिनिधी दीपांकर घोष यांचा समावेश आहे. या चमूसोबत अमेरिकेतील राष्ट्रीय उद्यान सेवेचे संचालक डेव्हिड मान्स्की हेसुद्धा असणार आहेत.