१६ व्या लोकसभा निवडणुकीसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हा प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून आता उमेदवारही काऊंट डाऊन करायला लागले आहेत. मतदारांची अंतीम यादी तयार झाली असून त्यात सुमारे ३0 हजार मतदारांची वाढ झाली आहे. १७ लाख ५0 हजार ७८६ मतदारांची संख्या असून त्यात स्त्री मतदार ८ लाख ३0 हजार ९८९ तर पुरूष मतदार ९ लाख १९ हजार ८९७ आहेत. चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघामध्ये एक हजार ९५९ मतदान केंद्र असून सहाय्यकारी केंद्र ंमिळून ही संख्या एक हजार ९८३ झाली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चंद्रपूर, बल्लारपूर आणि राजुरा या चार विधानसभा मतदार संघांमिळून ४ हजार ८१ बॅलेट युनिट आणि २ हजार १३६ कंट्रोल युनिटची व्यवस्था करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील वणी आणि आर्णी या विधानसभा मतदार संघांमध्ये यवतमाळच्या जिल्ह्या प्रशासनाने आवश्यकतेनुसार इव्हीएम मशिनची व्यवस्था केली आहे.
जिल्ह्यातील ९ हजार २३६ कर्मचार्यांची निवडणूक कर्तव्यावर नियुक्ती करण्यात आली आहे. या सोबतच एक हजार ४३६ राखीव कर्मचारीही तैनात ठेवण्यात आले आहेत. ९ एप्रिलला मतदान केंद्राध्यक्ष आणि त्यांची चमू नियोजित मतदान केंद्रावर पोहोचणार आहे. त्यांच्यासाठी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. या वाहनांतून मतदान यंत्र आणि निवडणूक कर्मचार्यांना केंद्रावर पोहचविण्याची आणि परत आणण्याची जबाबदारी देण्यात आली आहे.