সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, April 02, 2014

तर अण्णांचे प्रत्येकालाच आशीर्वाद.

वाल्याचा वाल्मिकी होणार असेल,
तर अण्णांचे प्रत्येकालाच आशीर्वाद

अहमदनगर, दि. २.४.२०१४.
सध्या लोकशाहीचा निवडणुकीरूपी कुंभमेळा चालू आहे. या कुंभमेळात पवित्र होण्यासाठी हौसे-नवसे-गवसे-भ्रष्टाचारी-गैरव्यवहारात अडकलेले सर्वजण ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचे आशीर्वाद घेण्यासाठी जात आहेत. खरेतर, वाल्यांचे वाल्मिकी होऊन सामान्य जनतेचे प्रश्न सोडविणार असतील तर, श्री. हजारे यांचे अशा प्रत्येक उमेदवाराला आशीर्वादच आहेत.
प्रत्येक लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उभे राहणाèया बहुतांशी उमेदवारांना अचानक अण्णांची आठवण होते. त्यांचे आशीर्वाद घेण्याची गरज वाटते. एरवी हे उमेदवार अण्णांच्या देशहिताच्या कुठल्याही आंदोलनात कधीही सहभागी नसतात. तसेच अण्णांनी उपस्थित केलेल्या जनहिताच्या प्रश्नांशी या उमेदवारांना कुठलेही कर्तव्य नसते. ते संपुर्णत: आलिप्त असतात. ऐन निवडणुकीतच अशा उमेदवारांना अण्णांची आठवण होते. अण्णांची भेट घेऊन, फोटो काढून बातम्या छापुन आणण्यासाठी खटाटोप केला जातो. परंतु आता जनता जागृत झालेली आहे. असे ढोंगी उमेदवार त्यामुळे जनतेस फसवू शकत नाहीत. अण्णांच्या जनहिताच्या लढयात कधीही नसलेले हे संधीसाधू आता अण्णांची भेट घेण्याकरीता मिनतवारी करतांना दिसतात.
काही उमेदवार तर केवळ असे नाटकच करत नाहीत, तर मतदारांमध्येही अण्णांच्या पाqठब्याचा आभास निर्माण करतात. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे नगर लोकसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार खा. दिलीप गांधी. खा. गांधी यांनी नुकतीच अण्णांची भेट घेतली. याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता त्यांनी सांगितले की, ‘अण्णा हजारे यांनी माझ्या कामाची चौकशी केली, तुम्ही चांगले काम केले आहे. तुम्ही या पुढेही चांगले काम करत रहा,ङ्क असे पत्रकारांना सांगितले. त्याच्या बातम्या वृत्तपत्रातून प्रसिध्द झाल्या. मंत्री आणि खासदार पद भुषिविलेल्या खा. गांधी यांनी निर्लज्जपणे किती खोटे बोलावे, आणि अण्णांच्या भेटीचे आणि त्यांनी न बोललेल्या वाक्यांचे कसे भांडवल करावे, याचा हा आदर्श वस्तुपाठ आहे. नगर अर्बन बँकेतल्या घोटाळयांविषयीचे सर्व तपशील आणि त्यातील खासदार महोदयांची मर्दुंमकी अण्णांना आणि सर्वांनाच ठाऊक आहे. या बाबत चौकशी आणि कारवाईसाठी अण्णांनी शासनाशी पत्रव्यवहारही केलेला आहे. इतकेच नव्हे तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, भाऊसाहेब तथा पांडुरंग फुंडकर व ईतर नेत्यांनी भ्रष्टाचाराबद्दल कारवाईची मागणी शासनाकडे केलेली आहे. श्री. हजारे यांच्यावर बेलगाम व खोटे आरोप करणारे जळगावचे माजी मंत्री सुरेश जैन व खा. गांधी यांची मैत्री सर्वश्रुत आहे. त्यावेळेस अ.नगर येथे खा. गांधी यांच्याकडेच सध्या भ्रष्टाचाराबद्दल तुरूंगवासी असलेल्या सुरेश जैन यांची उठबस होती. कुठल्याही पक्षाशी अथवा उमेदवाराशी आम्हाला काहीही घेणे देणे नाही. परंतू दिलीप गांधी वृत्तपत्रातून गैरसमज पसरविल्याने आधिक स्पष्टीकरणाकरिता आम्हाला हे सांगण्याची आवश्यकता वाटत आहे. वृत्तपत्रांशी बोलतांना खा. गांधी यांनी असेही सांगितले की, ‘ नरेंद मोदी यांना पाqठब्याबाबत अण्णा काहीही बोलले नाहीत. कदाचित मोदी स्वच्छ असतीलही परंतू भाजपने उमेदवारी दिलेले येडूरप्पा qकवा खा. गांधी यांसारखे उमेदवार जर निवडून आले तर मोदी भ्रष्टाचारमुक्त-समर्थ भारत कसा निर्माण करू शकतील, अशी शंका अण्णांनी वाटली.
खरेतर अशा उमेदवारांनी अण्णा यांची भेट घेऊन फोटो आणि कथित आशीर्वादाच्या बातम्या छापून आणण्याकरीता खटाटोप निरर्थक आहे. त्याऐवजी खèया अर्थाने लोकशाही रूजविण्याकरिता भ्रष्टाचार निर्मुलन, नागरीकांची सनद, नापसंतीचे मत नोंदविण्याबाबत, अकार्यक्षम लोकप्रतिनिधीला परत बोलविण्याचा अधिकार, ग्रामविकास, व्यवस्था परिवर्तन याकरिता सदर उमेदवार काय करणार आहेत, याची माहिती मतदारांना देणे गरजेचे आहे. तसेच हे उमेदवार अण्णांनी उपस्थित केलेल्या जनहिताच्या १७ मुद्यांबाबतही सोईस्कररित्या मौन बाळगुन आहेत. श्री. हजारे यांची भुमिका स्पष्ट असून उमेदवार कुठल्याही पक्षाचा अथवा गटातटाचा पुरस्कार अण्णा करीत नाहीत. तर जो उमेदवार चारित्र्यसंपन्न, आणि खèया अर्थाने सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्याकरिता प्रयत्नशील असेल त्यास जनतेने निवडुन दयावे, असे अण्णांचे आवाहन आहे. ज्या मतदारसंघात मत देण्यायोग्य एकही उमेदवार नसेल तेथे नापसंतीचे मत नोंदवावे. परंतू राष्ट्रीय कर्तव्य असल्याने प्रत्येकाने मतदान आवश्य करावे, असे आवाहन अण्णांनी केले आहे.
‘‘सुर्य कुणाच्याही कोंबडयाच्या अरवण्याने उगवू दया,
परंतू तो आता उगवू दया.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.