সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, April 14, 2014

बेरीज वजाबाकी

 बेरीज वजाबाकी

लोकसभा निवडणुकीतील मतदानाची प्रक्रिया आटोपल्याने गेल्या महिना-दोन महिन्यांपासून सतत धावपळीत असलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते आता रिलॅ्नस झाले असलेतरी ‘तांची गोळाबेरीज सुरूच आहे. कोणत्ङ्मा विधानसभा क्षेत्रातून किती मते बेरीज वजाबाकी सुरू झाली आहे. तर दुसरीकडे येणारा निकाल काय असेल? या शंकेने जीव अद्यापही टांगणीला आहे.

लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याच्या पूर्वीपासूनच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते कामाला लागले होते. गावागावांत कार्यकारिणी तयार करणे, कार्यकर्त्यांचा गोतावळा जमविणे, पक्षाचा प्रचार आणि प्रसार करणे, वेगवेगळ्या उपक्रमांबरोबरच लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी धावपळ करणे, मेळावे आणि कार्यक्रम घेणे यात कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांचा वेळ जात होता. सत्ताधारी आघाडीचे पदाधिकारी भूमिपूजन आणि उद््घाटनात व्यस्त होते तर विरोधक आंदोलनात. निवडणुकीबरोबरच उमेदवार निश्‍चित झाले आणि या कार्यकर्त्यांचे टेन्शन वाढू लागले. या वेळी प्रचाराला कमी अवधी मिळाल्याने अनेकांची दमछाक झाल्याचेही दिसून आले. मतदानाचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतशी पदाधिकार्‍यांची धडकन वाढत होती. मतदानाच्या दोन दिवस आधी तर बूथवरच्या नियुक्त्या, थैल्या आणि पेट्यांचे वाटप, एरिया पलटवून टाकण्यासाठीची पळापळ यामध्ये पदाधिकारी क्षणाचीही उसंत घेत नव्हते. मतदानाच्या दिवशीही त्यांच्या डोक्यावर सार्‍या विश्‍वाचा भार असल्यागत चित्र होते. सायंकाळी ६ वाजता एकदाचे मतदान आटोपले आणि पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सुटकेचा नि:श्‍वास टाकला. आपल्यावर जबाबदारी असलेल्या भागात आपण मतदान कसे पलटवून टाकले.. मतदारांचे मत कसे परिवर्तन केले.. ढाई हजार थे, डेढ को तो पलटा दिया. अशा सुरस कथा हे कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत 'भाऊ' आणि 'साहेबांना' ऐकवीत होते.

दरम्यान, गेल्या महिना-दोन महिन्याचे टेन्शन मतदानानंतर कमी झाले असले तरी, क्षेत्रनिहाय मतदानाची आकडेवारी आणि लोकचर्चेतून कार्यकर्ते आपापल्या उमेदवाराच्या विजयाचे गणित मांडू लागले आहेत. येत्या १६ मे रोजी मतमोजणी होणार असून, आपले गणित जमेल की बिघडेल? या शंकेनेही त्यांना ग्रासले आहे. आपला उमेदवार विजयी झाल्यास ठीक, पण पराभवाचा झटका बसल्यास? तोंड कसे लपवायचे, याचीही चिंता या कार्यकर्त्यांना आहेच. असे असले तरी, मतमोजणीला अद्याप महिनाभराचा अवधी असल्याने पुढचे काही दिवस निवांतपणे घालवायचे म्हणून, अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते रिलॅक्स होण्यासाठी बाहेरगावी जाण्याच्या तयारीला लागले आहेत. काहींचे आरक्षणही झाले आहे. अर्थात, त्यासाठी येणार्‍या खर्चाची तरतूद या पदाधिकार्‍यांनी निवडणूक काळातच करून ठेवली असणार एवढे निश्‍चित.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.