भारतीय स्टेट बँकेने आज भारतातील आपल्या सर्व शाखांसाठी प्रोबेशनरी ऑफिसर या पदांची जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण १८३७ रिक्त पदांची भरती करण्यात येणार आहे. यातील ७५८ पदे खुल्या वर्गासाठी असणार आहेत. या पदासाठी संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवीप्राप्त असणे आवश्यक आहे. उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांची परिक्षा घेण्यात येणार आहे. यातून निवड झालेल्या उमेदवारांना भारतातील स्टेट बँकेच्या कोणत्याही शाखेत नियुक्ती केले जाईल. प्रोबेशनरी ऑफिसरसाठी किमान वय २१ तर कमाल वयोमर्यादा ३० वर्ष असणार आहे. तर एससी आणि एसटी उमेदवारांना ५ वर्षे तर ओबीसी उमेदवारांना ३ वर्षांची सुट मिळणार आहे. या पदासाठी १ एप्रिल २०१४ चे वय ग्राह्य धरण्यात येईल. या पदासाठी फक्त ऑनलाईन अर्ज भरता येणार आहे. यासाठीची लिंक आजपासून सुरू करण्यात आली आहे. २४ एप्रिल पर्य़त अर्ज करता येणार आहे. खुल्या आणि ओबीसी गटातील उमेदवारांसाठी ५०० रूपये फी असून एससी आणि एसटी उमेदवारांना १०० रूपये फी आहे.
अधिक माहितीसाठी स्टेट बँकेची वेबसाईट
http://www.sbi.co.in/user.html किंवा https://www.sbi.co.in/webfiles/uploads/files/SBI_PO_RECRUITMENT_ADVERTISEMENT_ENGLISH.pdf
या लिंकवर क्लिक करा.
अधिक माहितीसाठी स्टेट बँकेची वेबसाईट
http://www.sbi.co.in/user.html किंवा https://www.sbi.co.in/webfiles/uploads/files/SBI_PO_RECRUITMENT_ADVERTISEMENT_ENGLISH.pdf
या लिंकवर क्लिक करा.