काँग्रेस शोधणार नवा दलित उमेदवार
शहरातील सफाई कामाच्या कंत्राटाचा धनादेश मंजूर करण्यासाठी १0 हजार रूपयांची लाच स्विकारल्याप्रकरणी येथील माजी नगराध्यक्ष बिता रामटेके यांना व त्यांचे पती घनश्याम रामटेके यांनाही शिक्षा सुनावली. २00४ मध्ये हे प्रकरण घडले होते. या प्रकरणामुले काँग्रेस प्रतिमा धुलीस गेली । गत विधानसभा निवड़णूकित त्या चंद्रपूर च्या उमेदवार होत्या । आता काँग्रेसला नवा उमेदवार शोधावा लागणार आहे । गत निवडणुकीत येथील भाजपचे उमेदवार नाना शामकुळे यांनी काँग्रेसच्या बीता रामटेके यांचा १५ हजार ४१० मतांनी पराभव केला. शामकुळे यांना ६७ हजार २५५ मते मिळाली आहेत. तर, रामटेके यांना ५१ हजार ८४५ मते मिळाली।
2009 च्या निवडणुकीत कॉंग्रेसतर्फे बिताताई रामटेके चंद्रपूर विधानसभेच्या उमेदवार होत्या. त्यांना पराभव पत्करावा लागला. याहीवेळी बिताताईच उमेदवार असतील, अशी चर्चा होती. मात्र, त्यांना आता न्यायालयाने दोषी ठरविल्यामुळे त्यांचे राजकीय प्रवास संपण्यात जमा आहे. त्यातच सर्वोच्च न्यायालयाने नुकताच आदेश दिला आहे. त्यामध्ये न्यायालयाने एखाद्या राजकीय व्यक्तीला जर शिक्षा दिली, तर ती व्यक्ती भविष्यात निवडणुकीला पात्र ठरणार नाही. यामुळे आता बिताताईला निवडणूक रिंगणात उभे राहता येणार नाही.
तत्कालिन नगराध्यक्ष बिता रामटेके यांच्या कार्यकाळात तुकूम आणि पोलीस लाईन येथील सफाईचे कंत्राट चंद्रपुरातील शितला माता सेवा सहकारी संस्थेला देण्यात आले होते. काम सुरू झाल्यावर काही रकमेचे बिल मंजूर करून धनादेश देण्यात आला. मात्र उर्वारित रकमेसाठी रामटेके यांनी टाळाटाळ करीत १0 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. अखेर या संस्थेच्या अध्यक्षा कविता महातव यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंदविली. ठरल्यानुसार ३0 एप्रिल २00४ रोजी बिता रामटेके यांच्या निवासस्थानी कविता महातव यांनी ही रक्कम त्यांना दिली. त्यावेळी बिता यांचे पती घनश्याम रामटेकेही उपस्थित होते. लाचेची १0 हजारांची रक्कम त्यांनी आपल्या पतीकडे देण्यास सांगितली. त्यानुसार ही रक्कम स्विकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्या दोघांनाही रंगेहात अटक केली होती. याप्रकरणी विशेष न्यायालयात खटला सुरु होता. तब्बल १0 वर्षांंनी त्याचा निकाल लागला. विशेष न्यायाधीश ए.एस. भैसारे यांनी निर्णय देताना, बिता रामटेके यांना कलम ७ नुसार एक वर्षांंचा कारावास आणि ५00 रुपये दंड, कलम १३ नुसार दोन वर्षांचा कारावास आणि एक हजार रूपये दंडाची सजा सुनावली. या घटनेतील सहभागाच्या आरोपाखाली त्यांचे पती घनश्याम रामटेके यांनाही कलम १२ नुसार एक वर्षाची सजा आणि एक हजार रूपयांचा दंड ठोठावला. या खटल्यात विशेष सरकारी वकील म्हणून संजय मुनघाटे यांनी काम सांभाळले.