সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, April 27, 2014

ब्रह्मपुरीत पारा ४४ अंशावर

ब्रह्मपुरी :
 ब्रह्मपुरीच्या भौगोलिक परिस्थितीमुळे शहराचे तापमान दरवर्षी कमाल अंशापेक्षा जास्त पटीने वाढत असते. उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरीत घेतल्या गेली आहे. काल २५ एप्रिलला ४४ अंश तापमानाची नोंद तर आज २६ एप्रिलला ४३ अंश एवढी नोंद घेण्यात आली आहे. उन्हाच्या काहिलीने नागरिकांनी दुपारच्या वेळेस घराबाहेर निघणे बंद केले आहे. त्यामुळे दुपारी रस्ते ओस पडल्याचे चित्र पहावयास मिळाले.
शहराची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता ब्रह्मपुरी शहर कणखर अशा मुरमाळी दगडावर वसलेले आहे. त्यामुळे पडणार्‍या सुर्यकिरणांनी दगड लवकर तापते. दुपारच्या वेळेस सूर्यकिरणे सरळे रेषेत पडत असल्यामुळे तापमान अधिकच प्रखरपणे जाणवते. शहराच्या सभोवताल पसरलेल्या अनेक राईस मिलमधून निघणारा धूर व कोंढय़ाचे बारीक कण यामुळे वातावरण दूषित होते. त्यामुळेही तापमानात अधिक वाढ होते. 
यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वाधिक तापमान २५ एप्रिलला ४४ अंश तर आज २६ एप्रिलला ४३ अंश एवढी नोंद करण्यात आली. वाढलेल्या तापमानामुळे शहरातील नागरिकांचे हाल होत आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.