সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, April 16, 2014

चंद्रपूर गोंडकालीन तलावांत टोलेजंग इमारती

चंद्रपूर गोंडकालीन तलावांत टोलेजंग इमारती
           
          श्रीकांत पेशट्टीवार   (www.facebook.com/shrikantpeshattiwar) 
पाणी व्यवस्थापनाच्या अनुषंगाने तीनशे वर्षांपूर्वी गोंड राजांनी चंद्रपूर शहरात पाच तलाव बांधले. पिण्याचे पाणी व शेती या दोन्ही बाबी डोळ्यासमोर ठेवून या तलावांची निर्मिती झाली. मात्र, कालौघात रामाळा तलाव सोडला, तर अन्य चार तलावांवर झोपड्यांचा पसारा वाढत गेला. प्रारंभी थोड्याबहुत प्रमाणावर असलेल्या या झोपड्यांचे रूपांतर आता मोठमोठ्या इमारतीत होऊ लागले आहे. गोंडकालीन पाणी व्यवस्थापनाचे तलाव काळाच्या उदरात गडप झाले. त्याठिकाणी आता टोलेगंज इमारती बघायला मिळत आहेत.                                                                          (सकाळ चंद्रपूर )
चंद्रपूर-गडचिरोली या जुळ्या जिल्ह्यात गोंडकालीन कार्यकाळात १२ हजार ३८ मोठ्या तलावांची निर्मिती झाली. इतिहासात मतलावांचा प्रदेशङ्क अशी या जुळ्या जिल्ह्यांची ओळख आहे. या तलावांच्या माध्यमातून जवळपास १ लाख ७४ हजार ४०० एकर जमीन qसचनाखाली होती, अशीही इतिहासात नोंद आहे. इतिहासकालीन या नोंदी आता कागदावरच आहेत. इ. स. १४९७ ते १५२२ मध्ये गोंड राजा हिरशहा होऊन गेला. त्याने आपल्या राज्यात लोकोपयोगी अनेक कामे केली. जमीनदारी आणि तुकुमची स्थापना त्याने केली. तुकुम या शब्दावरूनच तुकुम तलावाची निर्मिती करण्यात आली.
तळ्याच्या पाण्याने ओलित होणारी जमीन म्हणजे तुकुम असा त्याचा अर्थ होतो. पूर्वी राजे तळे बांधण्यास उत्तेजन देत. ते बांधून झाल्यावर तलाव बांधणाèया व्यक्तीस तुकूम म्हणजे त्या तळ्याच्या पाण्याने ओलित होणारी जमीन बक्षीस देत. मात्र, तुकुम तलावावरही आता अतिक्रमण झाले
आहे. अनेकांनी येथे झोपड्या बांधल्या आहेत. त्या प्रारंभीही हटविण्यात आल्या नाही. आताही तशीच स्थिती आहे. हा तलाव नष्ट झाला आहे.
राणी हिराईने शहराच्या वायव्य दिशेला हा तलाव बांधला. या तलावाच्या शेजारीच घोड्यांचा रियाला होता. घोडे या तलावाचे पाणी पीत होते.
त्यामुळे या तलावाचे नाव घोडतळे असे पडले. त्यानंतर पुढे घोटतळे आणि नंतर घुटकाळा असे नाव पडले. या तलावाजवळही आता लोकवसाहत झाली आहे. पंधराव्या शतकात गोंडराजा खांडक्या बल्लाळशहाने रामाळा तलाव बांधला. १५८ एकरात या तलावाचे बांधकाम करण्यात आले. ईशान्येस बांधण्यात आलेल्या या तलावातून चंद्रपूरकरांची तहान तेव्हा भागविली जात होती. या तलावाच्या ३० ङ्कूट पाण्याखाली ङ्करसबंदी होती. या तलावातून वाहत जाणारे पाणी अडविण्यासाठी एक तलावही बांधण्यात आला. या तलावाला मलेंडी तलाव असे नाव पडले. या तलावावर आता जलनगर वसले आहे. १६७२-१७३४ च्या कार्यकाळात रामाळा तलावाची डागडुजी गोंडराजा रामशहा याने केली. त्याने या तलावाची डागडुजी केल्यानंतर स्वतःचे नाव या तलावास देऊन टाकले. त्यामुळेच मरामाळाङ्क असे या तलावास नाव पडले. इ. स. १७९० मध्ये व्यंकोजी भोसल्यांनी या तलावाची डागडुजी केली. त्यानंतर इंग्रजांच्या कार्यकाळात या तलावाची डागडुजी करण्यात आली. पाच ङ्केब्रुवारी १९६४ रोजी चंद्रपूरच्या नगराध्यक्षपदी महादेवाqसग ठाकूर (दीक्षित) विराजमान झाले. नगर सुधारणेत त्यांनी रामाळा तलावाची दुरुस्ती केली. याला २२ हजार ३५६ रुपये खर्च आला. रामाळा आणि लेंडीगुडा तलावाचे व्यवस्थापन त्या काळात चांगल्या पद्धतीने झाले. मात्र, गेल्या काही वर्षांत या तलावाला लागूनच झोपड्या वसल्या. रेल्वेस्थानकाकडील भागातून तलावाकडे येणाèया मार्गावर मोठ्या व्यापारी इमारतीही बनत चालल्या आहेत. लेंडी तलावावर आता जलनगर वसले.


राजकीय दबाव
तलावावरीप झोपड्या हटविण्याची जबाबदारी महानगरपालिकेची आहे. मात्र, पालिकेत सत्ता असलेल्यांनी मव्होट बँकेङ्कच्या नावाखाली या झोपड्या कधीच हटवू दिल्या नाही. जेव्हा जेव्हा त्या हटविण्याचा प्रयत्न झाला. तेव्हा अधिकाèयांवर दबाव टाकून ही कारवाई हाणून पाडण्यात आली. नागरिकांना पट्टेही मिळवून देण्याचे प्रयत्न कधीच झाले नाही. 
गोंडकालीन पाण्याचे नियोजन रामाळा तलाव बांधण्यात आल्यानंतर चंद्रपूर शहरात पाणीपुरवठ्याची उत्तम सोय गोंड राजांनी करून दिली होती. शहराला पाणी पुरविण्यासाठी, ठिकठिकाणी त्याच्या साठवणुकीसाठी हतनी बांधल्या. रामाळा तलावातून प्रत्येक हतनीपर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी मातीच्या पायल्या बसवून त्याद्वारे पाणीपुरवठ्याची सोय केली. काही हतनींना लागूनच काही हौद बांधले. त्या हौदांतून लोक पाणी भरत होते. आजही शहरातील दहाच्यावर हतनी इतिहासाची साक्ष देत आहेत. रघुवीर चौक, भानापेठ वॉर्डातील बडवाईक यांनीही ही प्राचीन हतनी सांभाळून ठेवली आहे. इतर ठिकाणच्या हतनीवर नागरिकांनी अतिक्रमण केले, तर काही काळाच्या ओघात नष्ट झाल्या. शहरात उरलेले हौद आणि हतनीची संवर्धन करणे आवश्यक आहे.

राजा खांडक्या बल्लाळशहाचा मुलगा राजा हिरशहा याने बालेकिल्ल्यातच पूर्व बाजूस राजकुटुंबातील खास मंडळींकरिता जलक्रीडा आणि स्नानासाठी एक हौद तयार केला. त्याला मकोहिनूरङ्क असे नाव देण्यात आले. येथे बांधलेल्या हौदाची लांबी ५२५ ङ्कूट आणि रुंदी २२४ होती. गोंडकाळात कोहिनूर तलाव शहराची शान होता. मात्र, या तलावाची आता वाईट अवस्था झाली आहे. एकेकाळी अंघोळीसाठी वापरण्यात येणाèया तलावात आता मनपा क्रीडा स्पर्धा घेत आहे. दरवर्षीच महानगरपालिका, विविध क्रीडा मंडळांच्या स्पर्धा येथे नित्यनेमाने होत आहेत. महाकाली देवीच्या यात्रा कालावधीत येथे भाविक राहतात. त्यांची वाहनेही येथे असतात. कोहिनूर तलावाजवळ अनेकांनी घरे बांधली आहेत. त्यांनीही तलावाची जागा हळूहळू गिळंकृत करणे सुरू केले आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.