मनोज चिचघरे/भंडारा(पवनी):
मानेक नगर रोड देव्हाडी येथील गायत्री म्याग्निज कारखान्यात महिला कामगारांचे प्लांट व्यवस्थापकाकडून त्या एकूण २६ महिला कामगारांना ८ दिवसांपासून कामावरून बंद करण्यात आले होते या कामगारांवर होत असलेल्या अन्यायाची माहिती मिळताच भारतीय कामगार सेनेच्या वतीने कंपनीमध्ये जाऊन प्लांट व्यवस्थापकासोबत तेथे काम करत असलेल्या सर्व महिला कामगारांच्या मागण्यानुसार चर्चा करण्यात आली. कामगारांना दोन वर्षांपासून १३० रोजी होती परंतु त्यांच्या रोजीमध्ये अजूनपर्यंत वाढ करण्यात आली नव्हती त्यांच्या रोजीमध्ये २० रुपये वाढ करून एकूण १५० रुपये रोजी देण्यात यावे व आठवळ्यातून एक सुट्टी जाहीर करावी अशी मागणी करण्यात आली आहे. प्लांट मालकाने सध्या रोजीमध्ये १० रुपये वाढ केली असून येणाऱ्या ६ महिन्याच्या आत पुन्हा १० रुपये वाढ करण्याचे ठरविले तसेच आठवड्यातून एक दिवस सुट्टी देण्याचे जाहीर केले असून महिला कामगारांनी मान्य झालेल्या मागण्यावर आनंद व्यक्त केला. यावेळी भारतीय कामगार सेनेचे विभाग प्रमुख किसन सोनवाने, वाहतूक सेनेचे जिल्हा अध्यक्ष दिनेश पांडे, शिवसेना जिल्हा कार्यालयीन प्रमुख अमित एच. मेश्राम, युवासेना जिल्हा समन्वयक मनोज चौबे, वाहतूक सेनेचे उपजिल्हाप्रमुख जगदीश त्रिभुवनकर, तालुका अध्यक्ष गुड्डू डहरवाल, बाल्या मिश्रा, शरणम नागदेव सह महिला कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.