সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, December 16, 2018

जाळ्यात अडकून चार सोनेरी कमळ पक्ष्याचा मृत्यू

जुनोना तलावात मासोळी पकडण्याच्या जाळ्यात अडकला 

चंद्रपूर - निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या जुनोना तलावात पक्ष्यांचे अस्तित्व धोक्यात आल्याचे गंभीर चित्र जुनोना तलाव मध्ये सध्या दिसत आहे, स्तलांतरित पक्ष्यांचे नंदनवन असलेल्या जुनोना ची ओळख आहे, ह्या तलावात आता शिंगाळ्याची वेळ लावण्यात आले आहे, तलावाचा काही भाग हा वनविभाग व सिंचन विभागाचा आहे, शिंगाळ्याचे वेल वाचविण्यासाठी मासोळ्यांचे जाळे लावण्यात आले आहे, त्या जाळ्यात ब्रॉन्झ विंग जकाना मराठीत त्याला सोनेरी पंखाचा कमलपक्षी, पाणमोर असे म्हणतात .
पक्षी निरीक्षणाला गेले असता दूरवर मासोळ्यांचे जाळे हे थोड्या थोड्या वेळाने हलताना दिसत होते, शहानिशा करण्यासाठी जवळ गेले असता एक पक्षी अडकलेला दिसला तो ब्रॉन्झ विंग जकाना असल्याचे निष्पन्न झाले, असे दोन जाळे होते त्याला वाचवण्यासाठी हॅबिटॅट कॉन्सर्व्हेशन सोसायटी चे शशांक मोहरकर, करण तोगट्टीवार पाण्यात उतरले, पण पाणी खोल असल्याने पोहून जावे लागणार होते, तसा प्रयत्न करण तोगट्टीवार यांनी केला पण वेल व कचरा जास्त असल्याने ते शक्य नव्हते, नाईलाजाने परत जावे लागले, पण पाण्यात उतरल्यावर जाळ्यात आणखी ३ पक्षी अडकल्याचे दिसले, आणि ते पाण्याच्या जवळ अडकलेले असल्याने त्या पक्ष्यांना तग धरून राहता आले नाही परिणामी त्यांचा मृत्यू झाला, जुनोना तलाव भरपूर प्रमाणावर परदेशी पक्षी स्थलांतर करून येतात तिथे चांगल्या प्रमाणात खाद्य असल्याने पक्षी उतरतात पण जर अश्या मासोळींच्या जाळ्यात अडकून पक्ष्याचा मृत्यू होत असेल तर हा अधिवास धोक्यात असलेच दिसते, जुनोना तलावात जिह्यात एकच असलेल्या सारस चे अस्तित्व आहे, ते पण धोक्यात आहे जर असेच जाळे लागत राहिले तर पक्ष्यांचे अस्तित्व कायमचे धोक्यात येईल. हॅबिटॅट कॉन्सर्व्हेशन सोसायटी चे रोहित बेलसरे, ओंकार मत्ते उपस्थित होते .

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.