नागपूर : विदर्भ साहित्य संघाच्यावतीने दरवर्षी प्रदान करण्यात येणाऱ्या वाङ्मयीन पुरस्काराची घोषणा करण्यात आली आहे. विदर्भातील नामवंत साहित्यिकांच्या स्मरणार्थ प्रदान करण्यात येणाऱ्या महत्त्वाच्या पुरस्कारांच्या व्यतिरिक्त नवोदित लेखकांनाही यानिमित्ताने पुरस्कृत केले जात असून यावर्षी अशा १८ मानकऱ्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. वि.सा. संघाच्या वर्धापन दिन समारंभात ९२ व्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणा ढेरे यांच्याहस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्यावतिने देण्यात आली आहे.
येत्या १४ जानेवारी २०१९ रोजी वि.सा. संघाचा ९६ वा वर्धापन दिन साजरा करण्यात येत आहे. त्या समारंभात हे पुरस्कार मान्यवरांना देण्यात येतील. यामध्ये ज्येष्ठ लेखिका सुप्रिया अय्यर यांना पु.य. देशपांडे स्मृती कादंबरी पुरस्कार, श्रीपाद कोठे यांना मिराशी स्मृती वैचारिक वाङ्मय पुरस्कार, डॉ. शिरीष देशपांडे यांना अण्णासाहेब खापर्डे स्मृती आत्मचरित्र लेखन पुरस्कार, डॉ. अमृता इंदुरकर यांना कुसुमानिल स्मृती समीक्षा लेखन पुरस्कार, इरफान शेख यांना सर्वोत्कृष्ट काव्य लेखन पुरस्कार, वसंत बाहोकर यांना वा.कृ. चोरघडे स्मृती कथालेखन पुरस्कार, डॉ. विजया फडणीस यांना य.खु. देशपांडे स्मृती शास्त्रीय लेखन पुरस्कार, डॉ. संजय नाथे यांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्मृती लेखन पुरस्कार, गंगाधर ढोबळे यांना संत गाडगेबाबा स्मृती लेखन पुरस्कार, डॉ. प्रमोद गारोडे यांना मा.गो. देशमुख स्मृती संत साहित्य पुरस्कार पुरस्कार प्रदान करण्यात येईल. याशिवाय अविनाश पोईनकर व संघमित्रा खंडारे यांना नवोदित लेखन पुरस्कार, डॉ. हृषिकेश गुप्ते, बरखा माथुर, दा.गो. काळे, डॉ. प्रवीण महाजन, प्रमोद वडनेरकर यांना विविध पुरस्कार प्रदान करण्यात येतील. विदर्भ साहित्य संघाच्या बुलडाणा शाखेला सर्वोत्कृष्ट शाखेचा पुरस्कार घोषित करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त विशेष पारितोषिक यावर्षी देण्यात येणार असून छायाचित्रकार शेखर सोनी यांना हा पुरस्कार देण्यात येईल.Wednesday, December 12, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
गट ग्रामपंचायत चांपा तर्फे आयोजित हळदी-कुंकू कार्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसादअनिल पवार/उमरेड:गट ग्रामपंचायत चांपा यांच्यावतीने आयोजित मकरसंक्रांत निमित्ताने हळदी-कुंकुच्या कार्
पाच रुपयात मिळणार १० लिटर पाणीमिनरल वॉटर एटीएममुळे विद्यार्थी, प्रवासी, नागरिकांना सुविधा : मनपा परिवहन विभाग व जोसेब इंडियाचा उप
पंतप्रधान आवास योजनेच्या एक्स्पोला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसादपाच हजार नागरिकांनी केली नोंदणी मनपा आणि क्रेडाई,नागपूर मार्फत आयोजित एक्स्पोचा समारोपनागपूर/
ताजुद्दीन बाबावर तामिळमध्ये पुस्तकनागपूर- तामिळनाडू च्या चेन्नई निवासी श्रीमती रमा देवी* यांनी *महाराजा ऑफ नागपूर ट्रस्ट च्या सहकार्य
राष्ट्रपती श्री. रामनाथ कोविंद गडचिरोलीत चार्मोशी येथे दौरा असल्याची प्रशासकीय माहिती चामोर्शी तालुका मुख्यालयापासून जवळच असलेल्या वैनग
विमाशिसंघाचे प्रलंबीत मागण्या संदर्भात धरणे आंदोलननागपूर / अरूण कराळे:राज्यातील खाजगी व स्थानिक स्वराज्य संस्थेअंतर्गत माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेत
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য