সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, December 11, 2018

सामान्य माणसाच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मानवाधिकाराचा उपयोग व्हावा:डॉ कुणाल खेमनार

सामान्य माणसाच्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी
मानवाधिकाराचा उपयोग व्हावा : जिल्हाधिकारी
मानवाधिकाराच्या प्रचारासाठी चंद्रपूरमध्ये विद्यार्थ्यांची  रॅली

 चंद्रपूर /प्रतिनिधी:
सामान्य माणसांविरुध होणारा अन्याय व या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी वेगवेगळ्या प्रचलित कायद्यासोबतच मानवाधिकार आयोग आपले कार्य बजावत असते. या मानवाधिकार आयोगाच्या कार्याबद्दल जनमानसामध्ये प्रचार आणि प्रसार करणे गरजेचे असल्याचे, प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ .कुणाल खेमनार यांनी आज येथे केले.

दरवर्षी 10 डिसेंबरला मानवाधिकार दिन साजरा केला जातो. मानवाधिकार दिनानिमित्त चंद्रपूर येथील जुबिली हायस्कूलमध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या आयोजनानंतर जुबिली हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शहरातील गांधी चौक पर्यंत रॅली काढून सामान्य जनतेला मानवाधिकार बद्दल माहिती दिली. एक विशेष रॅली काढली. या रॅलीमध्ये मानवाधिकाराच्या संदर्भातील नारे देण्यात आले. विद्यार्थ्यांनी या मानवाधिकाराच्या संदर्भातील माहिती देणारे फलक आपल्या हातामध्ये घेतले होते. तसेच यासंदर्भातील माहिती देणा देणारे बॅचेस आपल्या गणवेषावर लावले होते. शहराच्या मध्यवर्ती भागात निघालेल्या या रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

तत्पूर्वी झालेल्या एका कार्यक्रमामध्ये जिल्‍हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी विद्यार्थ्यांना संबोधित केले. आपल्यावर होणाऱ्या कोणत्याही अन्यायाला वाचा फोडण्याची ताकद मानवाधिकार आयोगामध्ये आहे. आपल्या देशामध्ये मानवाधिकाराचा प्रचंड आदर केला जातो. सगळ्या यंत्रणांमार्फत मानवाधिकार भंग होणार नाही याबाबतची काळजी घेतली जाते. तथापि,कोणत्याही परिस्थितीत सामान्यातील सामान्य माणसाच्या हक्काचे रक्षण झाले पाहिजे. यासाठी मानवाधिकार आयोगाची स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी त्यांनी मानवाधिकार आयोगाच्या स्थापनेबाबत माहिती दिली. 10 दिसेंबर 1948 रोजी मानवी अधिकार यांची घोषणा संयुक्त राष्ट्र परिषदेमध्ये करण्यात आली. सयुक्त राष्ट्र संघटनेच्या स्थापनेनंतर संपूर्ण मानव जातीला चांगले आणि शांततामय जीवन जगता यावे, यासाठी 58 देशांनी मानवी हक्क प्रस्तावाला मान्यता दिली होती. भारतात मानवी हक्क संरक्षण कायदा संमत होऊन 1993 रोजी मानवी हक्क आयोगाची स्थापना झाली. महाराष्ट्रात 6 मार्च 2001 मध्ये मानवाधिकार आयोग स्थापन करण्यात आला.

या कार्यक्रमामध्ये जुबिली हायस्कूलची विद्यार्थिनी कुमारी मयुरी आलम हिने देखील मानवाधिकार संदर्भात उपस्थित विद्यार्थ्यांना माहिती दिली. यावेळी मयुरी आलम व गौरव गोगे यांना प्रातिनिधिक स्वरूपात प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. रॅलीनंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी देखील विद्यार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप केले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षणाधिकारी माध्यमिक श्री दोरलीकर यांच्या नेतृत्वात जुबिली हायस्कूलचे व्ही एम तोडासे. श्रीमती खान, श्रीमती एस पी वाघमारे, एम. आर. भारसाकडे ,पी.सी कोटेवार, एम. डी. मोरे, एस .टी. बर्डे, ए. पी.सुरपाम,एच.पी. धनेवार,एस .डी. बोंडे,एस. यु. उरकुडे,पी.पी मुडेवार, कोमल वारदे, वैशाली परसोडकर, अभिजीत कृष्णापूरकर, गोविंद प्रसाद बनवाल आदींनी प्रयत्न केले. कार्यक्रमाचे संचालन एम.आर. बारसाकडे यांनी केले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.