সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, March 02, 2018

मद्यधुंद दुचाकीस्वाराने चढविली पोलिसांच्या अंगावर गाडी

 चंद्रपूर/रोषन दुर्योधन:
होळी निमीत्य कोणताही अनुचित प्रकार घडू याने यासाठी गुरवारी संध्याकाळपासून शहरात पोलिसांचा  चोख बंदोबस्त असतांना धुलीवंदनाच्या दिवशी सकाळी चंद्रपूर पोलीस ट्रिपल सीट वाहन चालविणे,दारू पिऊन वाहन चालविणे,अश्यासाठी कारवाई करत असतांना  जटपुरा गेट येथे मद्यधुंद  ट्रिपल सीट  दुचाकी चालकांनी भरधाव दुचाकी पोलिसांच्या अंगावर चढवली. यात पोलीस थोडक्यात बचावले असून त्यां तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
होळीला दारू पिऊन गाडी चालविणे हा प्रकार जास्त असल्या कारणाने जील्ह्यात दारुबंदी असतांना होळीला दारू पिऊन गाडी चालविणाऱ्याला अटक करून त्यांची वैद्यकीय तपासणी करून यांचेवर गुन्हे दाखल करण्यात येत आहे.असे शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून अनेक वाहनचालकांवर  पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे.
या बंदोबस्तात पोलीस उपविभागीय अधिकारी सुशीलकुमार नायक, वाहतून पोलीस निरीक्षक संपत चव्हाण व पोलीस दलातील कर्मचारी उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.