সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, March 28, 2018

आमडीच्या यादव ढाबा घटनेतील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल; पाच आरोपींना अटक,31 पर्यंत पोलीस कोठडी
रामटेक तालुका प्रतिनिधी:

रामटेक पोलीस ठाणे हद्दीतील राष्ट्रीय  महामार्ग क्रमांक 7 वर मनसरनजिकच्या आमडी येथील यादव ढाबा येथे तेथील नोकर सत्येन पांडे यांस आरोपींनी जबर मारहाण केल्याची घटना दिनांक 25 मार्च रोजी घडली . होती.जखमीस नागपुरच्या मेडीकल कॉलेजमध्ये उपचारासाठी भ्रती करण्यांत आले होते.मात्र त्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला.रामटेक पोलीसांनी याप्रकरणी आतापर्यंत एकूण पाच आरोपींना गजाआड केले असून सहाव्या
आरोपीचा  शोध  सुरू आहे.अटक आरोपींना 31 मार्च 2018 पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यांत आली आहे.
याप्रकरणी रामटेक पोलीसांनी सांगीतल्याप्रमाणे आमडी येथे सतिराम रामबरत यादव यांचा ढाबा आहे.त्यांचा नोकर सत्येन्द्र धरमराज पांडे हा मूळचा मध्यप्रदेशातील होता मात्र तो ढाब्यावरच राहात होता दिनांक 25 मार्च
2018 रोजी आमडी येथील पंकज उर्फ पप्पू गडे,राधेशाम श्रीपत बादुले,संजय मुन्नाप्रसाद यादव व हेटीटोला मनसर येथील प्रकाश शंभू वरखडे व विकास उर्फ विक्की शंभू वरखडे व अन्य एक साथीदार यांनी सत्येन्द्र पांडे  यांस ढाब्यावर येवून लाथाबुक्यांनी मारहाण केली नंतर त्यास आपल्या टाटा सुमो वाहनात बसवून घेवून गेले तासाभराने त्याला पुन्हा ढाब्यावर आणले व मारहाण करून जखमी अवस्थेत सोडून आरोपी टाटा सुमोने पसार झाले.या घटनेबाबत ढाबामालक सतिराम यादव यांनी रामटेक पोलीसांना दिलेल्या तक्रारीवरून पोलीसांनी भादंवीच्या 307,143,147,148,149 व 367 या कलमांखाली गुन्हा नोंदविला व पाचही आरोपींना अटक करण्यांत आली.
दरम्यान जखमी पांडे यांस नागपुरच्या शासकीय मेडीकल कॉलेज व रूग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यांत आले होते.दिनांक 27 मार्च 2018 रोजी उपचारादरम्यान सतेंद्र पांडे यांचा मृत्यू झाला.त्याच्या मृत्यूनंतर 
आरोपींवर दाखल गुन्हयात 302 या कलमांची भर घालण्यांत आली.मृतक हा मध्यप्रदेशातील असल्याने त्याचे नातेवाईकांनी त्याचे पार्थिव आपल्या मुळ गावी नेले.रामटेक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक 
वंजारी हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
ढाबामालकांच्या वर्चस्वाच्या लढाईतून उपरोक्त घटना घडली की अन्य कुठले कारण आहे याबाबत अद्याप माहीती मीळाली नाही. नाही.पोलीस तपास करीत आहेत व तपासांत सत्य पुढे येईल.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.