সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, March 29, 2018

आश्रमशाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीने दिला मुलीला जन्म

aadivasi girl pregnant साठी इमेज परिणामगडचिरोली/प्रतिनिधी:
 अहेरी तालुक्यातील वेलगूरच्या राजे धर्मराव आश्रमशाळेत दहावीला शिकत असलेली विद्यार्थिनी चक्क  एका सुदृढ मुलीला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संस्थेने आश्रमशाळेचे मुख्याध्यापक तसेच महिला व पुरूष अधीक्षकांना तडकाफडकी निलंबित केले.
विशेष म्हणजे सदर विद्यार्थिनीने दहावीची परीक्षाही दिली. पण तरीही तिच्याबद्दल कोणत्याही शिक्षकाला, अधीक्षकांना साधा संशयही आला नाही,  आपल्याच वर्गात शिकणाऱ्या गावाकडच्या विद्यार्थ्यासोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची कबुली   देऊन आपली कोणाबद्दलही काही तक्रार नसल्याचे बयाणात म्हटले आहे. ती आणि तिचा प्रियकर दोघेही दहावीत असले तरी ते २० वर्ष वयाचे आहेत. यापूर्वी दुसऱ्या गावातील आश्रमशाळेत दोघेही काही वर्ष नापास झालेले आहेत,  
या विद्यार्थिनीला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्यानंतर सुरूवातीला अहेरी व नंतर गडचिरोलीला भरती करण्यात आले. गडचिरोलीत तिने एका मुलीला जन्म दिला. विशेष म्हणजे तिची ‘नॉर्मल डिलीव्हरी’ झाली आहे. रक्ताची कमतरता असल्यामुळे नंतर तिला चंद्रपूरला हलविण्यात आले. यासंदर्भातील तक्रार संस्थेकडून आल्यानंतर अहेरी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने त्या मुलीचे बयाण घेतले. दरम्यान राजे धर्मराव शिक्षण संस्थेने मुख्याध्यापक एम.एस. कुर्वे, अधीक्षक आर.बी. पोलोजीवार व महिला अधीक्षिका डोंगरे यांना निलंबित केले.

वैद्यकीय तपासणीच होत नाही
घडलेल्या संपूर्ण प्रकरणावरून आता विध्यार्थ्यांच्या शारीरिक तपासणीचा मुद्दा समोर आला. आश्रमशाळेतील विद्यार्थ्याची वर्षातून किमान तीन वेळा वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक असते. ही तपासणी फिरते वैद्यकीय पथक किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक करते, पण प्रत्यक्षात अशी तपासणी केलीच जात नसल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.