वाहतुक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर होणार कडक कार्यवाही
होळी सण सर्वांना आंनदाने साजरा करण्यात यावा म्हणुन पोलीस विभाग बंदोबस्त आखणीसह सज्ज झाला आहे. आगामी होळी सण शांततेत व सौदार्यहपुर्ण वातावरणात पार पडावा या करीता पोलीस अधीक्षक यांनी वेगवेगळया मोहीमा तयार करून त्या राबविल्या आहेत. दारूबंदी जिल्हा असल्याने होळी सणाच्या काळात दारूच्या कारवाईवर विषेश भर देण्यात आला आहे.
आगामी होळी सणाच्या पार्ष्वभुमीवर निर्ढावलेल्या दारू विक्रेते, सराईत गुन्हेगार व सणाच्या काळात ज्या इसमांकडुन शांततेत भंग होऊ शकतो अशा इसमाचा गुन्हेगारी पुर्वईतिहास पडताळुन पोलीस स्टेशन मुल अंतर्गत गुन्हेगारी पार्ष्वभुमी असलेल्या 02 आरोपींवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 561⁄4अ1⁄2 अन्वये तडीपारीचे आदेश करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्हयातील पोलीस स्टेशन अंतर्गत प्रभावी प्रतिबंधक कार्यवाही करण्यात आली असुन त्यामध्ये सीआरपीसी कलम 107/116(3) अन्वये 584, कलम 110 अन्वये 76, कलम 93 दारूबंदी कायदा अन्वये 168, सीआरपीसी कलम 144(3) अन्वये 466, कलम 91 महाराष्ट्र दारूबंदी कायदा अन्वये 27, सीआरपीसी कलम 109 अन्वये 04, कलम 56 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये 02, सीआरपीसी कलम 149 अनव्ये 43 आणि सीआरपीसी कलम 1511⁄431⁄2 अन्वये 22 अशा एकुण 1392 इसमांविरूध्द प्रतिबंधक कार्यवाहीकरण्यात आली आहे. तसेच या उत्सवाच्या पार्ष्वभुमीवर विषेश मोहिमेदरम्यान दारूबंदी कायदयातंर्गत एकुण 522 केसेस करण्यात आल्या व त्यामध्ये 2 कोटी 76 लक्ष रू चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे होळी/रंगपंचमी चे दिवशी मोटारवाहन अधिनियमांचे उल्लंघन होणार नाही.याकरीता चंद्रपुर पोलीस दलातील वाहतुक विभाग सुध्दा सज्ज असुन मुख्य चौकांमध्ये ब्रेथ अॅनालाईजर द्वारे वाहनचालकाची तपासणी करण्यात येणार आहे. त्याचबरोबर रॅष ड्रायविंग,टिंपल सिट,स्टंट मारणारे दुचाकीस्वार यांचे विरूध्द नियमानुसार कडक कायदेशीर कार्यवाही करण्यात येणार आहे.
त्यामुळे आपल्याकडुन कोणत्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन होणार नाही तसेच आपल्या कृत्यामुळे इतरांना नाहक त्रास होवुन शांतता भंग होणार नाही या दृश्टीने सर्वांनी नियमांचे पालन करून होळी सण आनंदाने साजरा करावा. असे पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक श्रीमती नियति ठाकर यांच्या मार्गदर्शनात अपर पोलीस अधीक्षक श्री.हेमराजसिंह राजपूत यांच्या नेतृत्वात बंदोबस्ता करीता 6 उपविभागिय पोलीस अधिकारी, 18 पोलीस निरीक्षक,110 साहायक पोलीस निरीक्षक/पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे अधिकारीसह 01 एस.आर.पि. एफ ची कंपनी, बंदोबस्त कामी तैनात करण्यात आली असुन या व्यतिरीक्त 400 होमगार्ड, आर.सि.पि. चे 02 पथक,सी-60 चे 2 पथकासह 1550 पोलीस कर्मचारी बंदोबस्तात तैनात करण्यात आले आहे.

