
या मूक मोर्चामध्ये वेगवेगळ्या नामफलक हातात घेऊन मूकपणे राष्ट्रवादीकाँग्रेसच्या महिला कार्यकर्त्यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला आहे. यामध्ये महिलांविरोधात अत्याचार बंद करा, लगातार बलात्कार फडणवीस सरकार गुन्हेगार, असे फलक हातात घेऊन राज्यशासनाच्या निषेध करण्यात आला.दरम्यान मूक मोर्चा संपन्न झाल्यानंतर राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके म्हनाल्याकी आज देखील महिला सुरक्षित नाहीये. महिलांवरील अत्याचारात वाढ झाली असून ३ वर्षाच्या मुलीपासून तर ६५ वर्षाच्या म्हातारीपरीयंत
कायद्याचा कुणालाही धाक राहिलेला नाही. कारण कायद्याची अंमलबजावणी होतांना दिसत नाही. आपण राज्याचे जबाबदार गृहमंत्री या नात्याने जो कोणी बलात्कारासारखे वाईट कृत्य करत असेल त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हायला पाहिजे अशी तरतूद कायद्यात करणे आवश्यक आहे. जर पुन्हा असा प्रकार घडला तर राष्ट्रवादी महिला काँग्रेस स्वतः कायदा हातात घेऊन त्या नराधमाला जनतेसमोर शिक्षा देऊ असे देखील त्या निवेदानामार्फात म्हणाले,सदर निवेदन चंद्रपूर जिल्हाधिकारी आशितोष सलील यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे.