সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, March 01, 2018

विदर्भ राज्य आंदोलन समितीचे होळीच्या पर्वावर ‘डिग्री जलाओ’ आंदोलन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
भाजपाने निवडणुकीच्या वेळी दरवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देण्याची घोषणा केली होती. मात्र, नोटाबंदी व जीएसटीनंतर दोन कोटींहून अधिक लोक बेरोजगार झाले. याच्या निषेधार्थ विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीतर्फे होळीच्या पर्वावर आज विदर्भातील अकराही जिल्हास्तरावर तसेच तालुका स्तरावर ‘डिग्री जलाओ’ आंदोलन केले.
महाराष्ट्रात सरकारी नोकऱ्यातील १९ लाख ५० हजार पदे रिक्त आहेत. यापैकी २ लाख ५९ हजार पदे पाच वर्षात न भरल्यामुळे नेहमीसाठी निरस्त झाली आहेत. पगार द्यायला पैसे नाहीत म्हणून तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची भरती बंद केली आहे. आता तर पुन्हा ३० टक्के नोकरीची पदे कमी केली जाणार आहेत. सरकारचे असेच धोरण राहिले तर सुशिक्षित बेरोजगार युवकांनी त्यांच्या डिग्रीचे काय करायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बेरोजगार युवक रस्त्यावर उतरून डिग्रीची होळी करून दोन कोटी नोकऱ्या कुठे आहेत, असा सवाल भाजपाला विचारला आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.