विविध
मागण्यांना घेऊन आज रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) च्या वतीने जिल्हाधिकारी
कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्रिपुरा येथील क्रांतिकारक लेनिन
यांच्या पुतळ्याची विटंबना, मेरठ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या
पुतळ्याची विटंबना व तामिळनाडू येथील पेरियार स्वामी नायकर यांच्या
पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाज कंटकांना त्वरित अटक काण्यात यावी. भीमा
कोरेगाव येथे जातीय दंगल घडविणाऱ्या संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना
तात्काळ अटक करावी, राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज बिनशर्त माफ करण्यात यावे,
शासकीय कार्यालयातील नोकरभरती ठेकेदारी पद्धतीने बंद करण्यात यावी,पेट्रोल
डिझेल वर जीएसटी लागू करण्यात यावी,वीज बिलातील विजेशिवाय इतर आकारणी कमी
करण्यात यावी.चार वर्षांपासून बंद केलेली विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती
पुन्हा सुरु करण्यात यावी. यासह इतर विविध मागण्यांना घेऊन आज रिपब्लिकन
पक्ष (खोरिपा) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात
आले. या धरणे आंदोलनात देशक खोब्रागडे, सत्यजित खोब्रागडे, जीवन
बागडे,संतोष रामटेके यांच्या सह इतर नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी
आंदोलनकर्त्या शिष्टमंडळांनी जिल्ह्याधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना आपल्या
मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
Wednesday, March 14, 2018
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
बीआरएसपीचे मनपासमोर आंदोलन चंद्रपूर/प्रतिनिधी: मनपाने अन्यायकारक लादलेला कर आणि शिवशंकर होंडा शोरूम संचालकांकडून सुर
दारूच्या बाटलीवर भाजपच्या 'कमळ'चा लोगो नागपूर/प्रतिनिध
चंद्रपूरात मनसे आक्रमक:इंग्रजीतील दुकानावरील फलके फाडून फेकली चंद्रपूर प्रतिनिधी : चंद्रपुरात मराठी पाट्यांच्या मुद्द्यावरून मनसे पुन्हा एकदा आक्रमक झाली आहे.शह
उच्चशिक्षित युवक-युवतीचे शिवसेनेच्या नेतृत्वात "पकोडा" आंदोलन चंद्रपूर/प्रतीनिधी: भाजपने 2 कोटी युवकांना रोजगार देऊ, असे आश्वासन निवडणुकीदरम्यान दिले होते. म
"राष्ट्रवादी"च्या महिला आक्रमक;महिला सुरक्षिततेसाठी महिलादिनी आंदोलन चंद्रपूर/प्रतिनिधी: इकीकडे जगभरात जागतिक महिला दिन सर्वत्र साजरा केला जात असतांना मात्र दुसर
वन्यजीवामुळे शेतकऱ्यांना होणाऱ्या नुकसानाची त्वरित भरपाईचा प्रशन शासनदरबारी लावून धरणार -- आमदार अँड संजय धोटे उपोषणकर्त्या शेतकऱ्यांची घेतली भेट चंद्रपूर/प्रतिनिधी: दिवसेंदिवस जंगल नष्ट होत असल्यामुळे वन्यजी
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য