चंद्रपूर/प्रतिनिधी:

गेल्या १० ते १२ दिवसांपासून मडकी येथे शेळ्यांवर अज्ञात रोगाणे हल्ला चढविला आहे. एका पाठोपाठ एक अशा आत्तापरीयंत तब्बल ५० शेळ्या मृत्यूमुखी पडल्या आहे. या प्रकाराची माहिती पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर यांना मिळताच त्यांनी इकडे तिकडे धावाधाव सुरू केली. त्यांनी ब्रम्हपुरी पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. उदय कोराने यांच्यासोबत संपर्क साधला. डॉ. कोराने त्यांनी आपल्या चमूसह मेंडकी गावात भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व औषधोपचार सुरू केला.त्यानंतर तात्काळ मडकी येथे पशूंच्या तपासण्या कारण्याबाबद शिबिराचे आयोजन करण्यात आले.