সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, March 17, 2018

रामटेक बाजार समीतीच्या गोदामासह दुकानगाळयांचा लोकार्पण सोहळा रविवारी

*पालकमंत्री येणार* आमदार केदारांना न बोलावल्याने समर्थक नाराज
रामटेक तालुका प्रतिनिधी:
मुख्य प्रशाकाच्या जागी अपात्र व्यक्तिची वर्णी लावल्याने आधीच चर्चेत असलेल्या रामटेक कृषी  उत्पन्न बाजार समीतीच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या गोदामासह दुकान गाळयांच्या दिनांक 18 मार्च 2018 रोजी होत असलेल्या लोकार्पण सोहळयालाही अपषकुन झाला आहे. उपरोक्त कार्यक्रमाला नागपुर जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती राहणार असून रामटेकचे आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राहतील.गोंडवाना गणतंत्र पक्षाचे राज्याध्यक्ष राजे वासुदेव शहा टेकाम,सहकार नेते श्रीराम आष्टणकर व माजी सभापती बालचंद बादुले हे यावेळी विशेष अतिथी म्हणूण हजर राहणार आहेत.हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता बाजार समीतीच्या नवनिर्मीत दुकान गाळे परीसरांत संपन्न होणार आहे.
रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीची गेल्या 2014 पासून निवडणूक झालेली नाही.या बाजार समीतीचे 2014 साली विभाजन करून रामटेक व मौदा अशा दोन बाजार समीत्यांची निर्मीती करण्यात आली.रामटेकच्या बाजार समीतीवर बालचंद बादुले यांच्या नेतृत्वात अशासकीय प्रशासक मंडळ नेमण्यात आले.सरकारच्या या विभाजन प्रक्रियेला तत्कालीन सभापती लक्ष्मण उमाळे यांनी उच्च न्यायालयांत आव्हान दिले होते.उमाळे यांच्या याचीकेवर उच्च न्यायालयाने सरकारने केलेल विभाजन रद्द केले व पुन्हा एकदा ही बाजार समीती जैसे थे झाली.अविभाजित बाजार समीतीवर पुन्हा एकदा राज्य सरकारने अषासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केली व बादुले यांचीच सभापतीपदावर वर्णी लावण्यांत आली.दरम्यान राज्य सरकारने पुन्हा या बाजार समीतीचे विभाजन केले व रामटेक मौदा अशा दोन बाजार समीत्या निर्माण केल्या.यावेळी मात्र अशासकीय प्रशासक मंडळाची नेमणूक करताना बादुले यांना संधी देण्यात आली नाही.रामटेकच्या आदर्श विद्यालयात शिक्षक असलेले अनिल कोल्हे यांना या बाजार समीतीचे मुख्यप्रशासक नेमण्यात आले.किशोर रहांगडाले हे उपमुख्यप्रशासक व अन्य 14 प्रषासकांची नियुक्ती करण्यात आली.या विभाजनालाही शेतकरी संघर्ष समीतीचे संयोजक सचिन किरपान यांनी उच्च न्यायालयांत आव्हान दिले आहे.सदर याचिका उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठांत प्रलंबित आहे.दरम्यान कोल्हे हे नोकरी करीत असल्याने ते या पदावर राहण्यास अपात्र आहेत व त्यांनी या पदावर नियुक्तीसाठी दिलेल्या शपथपत्रांत आपण शेतकरी असल्याचे नमूद करून शासनाची दिषाभूल केली असा आरोप दणका युवा संघटनेने केला व त्यांना पदावरून हटवावे व पोलीसांत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.यासाठी दोन दिवस दणकाचे रामटेक तालुकाध्यक्ष अजय किरपान यांनी आमरण
उपोशण केले मात्र पंधरा दिवसांत कारवाई करू असे आश्वासन पालकमंत्री बावनकुळे यांनी दिल्याने हे उपोशण संपले.मात्र महीनाभरानंतरही कारवाई न झाल्याने पुन्हा उपोषण करण्याचा निर्धार अजय किरपान यांनी व्यक्त केला होता मात्र पालकमंत्री यांनी पुन्हा काही कालावधी द्यावा असे सांगीतल्याने उपोषण लांबणीवर टाकण्यात आल्याचे किरपान यांनी सांगीतले.
आज होत असलेल्या कार्यक्रमाला सहकार नेते व सावनेरचे आमदार सुनिल केदार यांना बोलविण्यांत न आल्याने त्यांचे समर्थक कमालीचे नाराज आहेत.रामटेक बाजार समीतीवर सातत्याने केदारांचा प्रभाव राहीला आहे व त्यामुळे त्यांना या कार्यक्रमाला बोलावणे  आवश्यक होते मात्र त्यांना बोलाविण्यांत आले नाही यावर त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत.सरकार व स्थानीक आमदारांची ही मनमानी असल्याचे अनेकांनी खाजगीत बोलतांना सांगीतले.केदारांना न बोलविण्यामागचे नेमके राजकारण कोणी व कषासाठी केले याविषयी अनेक प्रकारच्या चर्चा केल्या जात आहेत. याप्रकरणी ज्यांनी हे राजकारण केले त्यांना याची किंमत सव्याज चुकवावी लागेल असा  ईशारा शेतकरी संघर्ष समीतीचे संयोजक सचिन किरपान यांनी दिला आहे.
‘गोदामासह दुकान गाळे’ असे या कामाचे नाव आहे प्रत्यक्षात येथे 22 दुकान गाळे बांधण्यात आले आहेत.गोदामाचा मात्र पत्ता नाही याबद्दलही येथे अनेक प्रकारची चर्चा केली जात आहे.शेतकऱ्यांच्या  सोयाीसाठी येथे एकही गोदाम बाजार समीतीने अद्याप बांधले नाही मात्र दुकान गाळे बांधून त्यातून पैसा उभा करणे हा व्यापारी धंदा बाजार समीती करीत असल्याचे दिसून येते.प्राप्त माहीतीनुसार उपरोक्त दुकान गाळे हे बांधकामापुर्वीच लोकांना 30  वर्षासाठी  लिजवर देण्यात आले असे समजते व यासाठी प्रत्येकी 6 लक्ष रूपये बाजार समीतीच्या खजिन्यात जमा झालेत.या रकमेतूनच या 22 दुकानगाळयाचे बांधकाम फक्त 66 लक्ष रूपयांत करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.मग उर्वरीत रकमेत शेतकरी बांधवांच्या सोयाीसाठी गोदाम व निवास कां बांधण्यात आले नाही असा प्रश्न विचारला जात आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.