সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, March 07, 2018

मनपा आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारणार

Improvement of NMC Health Centers | मनपा आरोग्य केंद्रांचा दर्जा सुधारणारचंद्रपूर/प्रतिनिधी:
 शहरातील सात प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देऊन आरोग्य सुविधांचा आढावा घेण्यात आला. सध्या सुरू असलेल्या सुविधांमध्ये वाढ करून गुणात्मक दर्जा वाढविण्यात येईल, अशी माहिती मनपा स्थायी समितीचे सभापती राहुल पावडे यांनी दिली.
मनपा आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी जबाबदारीने कार्ये करीत आहेत. पण त्यांच्या कार्याला गती नसल्याने शहरातील सर्व आरोग्य केंद्रांची पाहणी करण्याची मोहीम राबविण्यात आली. शासकीय आरोग्य केंद्रातही खासगी आरोग्य केंद्राइतक्याच दर्जेदार सुविधा मिळतात, याची माहिती शहरातील नागरिकांना दिली जात आहे. शहरातील मूल रोड रामनगर, बालाजी वॉर्ड, बगड खिडकी, बाबूपेठ, सुपर मार्केट भिवापूर, इंडस्ट्रियल इस्टेट वॉर्ड येथील सात प्राथमिक आरोग्य केंद्रांना सभापती पावडे यांनी भेट दिली. कर्मचाºयांच्या समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी झोन क्र. १ चे सभापती देवानंद वाढई, वसंत देशमुख, नगरसेविका आशा आबोजवार, छबु वैरागडे, संगीता खांडेकर, ज्योती गेडाम, निलम आकेवार, कल्पना बगूलकर, मंगला सोयाम, नगरसेवक राहुल घोटेकर, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अंजली आंबटकर, डॉ. नरेंद्र जनबंधू, डॉ. जयश्री वाडे, डॉ. अश्वीनी भारत, डॉ. कीर्ती राजूरवार, डॉ. अलका आकुलवार, डॉ. गर्गेलवार, डॉ. विजय खेरा, डॉ. नयना उत्तरवार, नागोसे, सिद्दीकी अहेमद व जनसंपर्क अधिकारी युधिष्ठीर रैच आदी उपस्थित होते. वैद्यकीय अधिकारी डॉ. आंबटकर यांनी आरोग्य केंद्राद्वारे दिले जाणाºया सुविधांची माहिती सादर केली. तसेच सेवा देताना येणाºया अडचणींकडेही त्यांनी लक्ष वेधले. ५० हजार लोकसंख्येला एक केंद्र यानुसार एकूण सात प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू आहेत. मनपाच्या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्राद्वारे शहरात दर महिन्याला ७० लसीकरण शिबिर घेतले जातात. वैद्यकीय अधिकारी तसेच अन्य तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे आठवड्यातून एकदा रुग्णांची तपासणी केली जात आहे. शासनाच्या योजना कागदोपत्री राहू नये, यासाठी आरोग्य केंद्रातील सर्व माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य सध्या जोमाने सुरू आहे. यासाठी नगरसेवकांच्या बैठका घेतल्या जात आहे. लोकप्रतिनिधींनी प्रभागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट देवून सुधारणा सुचविणे व समस्यांच्या निराकरणासाठी पाठपुरावा करावा, अशी सूचना सभापती पावडे यांनी दिली.
आरोग्य केंद्राचे बांधकाम व नुतनीकरण इत्यादी कामांसाठी विशेष अभियंत्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. नवीन केंद्रासाठी मनपाच्या हक्काच्या जागा उपलब्ध व्हावे, या हेतूने पाठपुरावा सुरू आहे. शहरातील विविध वॉर्डांत कार्यरत असणाºया आशा सेविकांसाठी मनपाकडून गणवेश देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. प्रयोगशाळा व काही वॉर्डांत बोअरवेल बांधकामाचा विचार सुरू असल्याची माहिती नागरिकांना देण्यात आली. यावेळी मनपाचे आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.