
चंद्रपूर/
(ललित लांजेवार):
(ललित लांजेवार):
दैनंदिन कर्तव्यादरम्यान पोलीस मुख्यालय परीसरात ज्या वैशिष्ट्य ठिकाणी हत्यारांची दैनंदिन सफाई/तपासणी करण्यात येते त्या ठिकाणी सोमवारी सकाळी 07 वाजता दरम्यान पोहवा पुरोशत्तम येरमे व पो. शी शंकर चौधरी हे दोघेही पोलीस कर्मचारी कर्तव्यासाठी असलेले हत्यार/रायफल दैनंदिन देखभाल व सफाई करीत असताना अचानक अपघात होवुन रायफलमधुन गोळी सुटली. गोळी सिमेंटच्या छताला (स्लॅब) लागल्याने छताचा लहानसा तुकडा खाली पडला त्यामुळे पोहवा पुरोशत्तम येरमे व पो.शी शंकर चौधरी हे दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत. किरकोळ जखमी कर्मचारी यांचेवर तात्काळ प्राथमिक उपचार करण्यात आले असुन ईतर कोणतीही हानी झालेली नाही,घटनेची माहीती मिळताच वरिष्ठांनी तात्काळ घटनाठिकाणी भेट देवुन घटनेबाबत माहीती घेतली.