मागील वर्षभरात कार्यकर्त्यांचे 348 दिवस श्रमदान
चंद्रपूर प्रतिनिधी:
`
`
चंद्रपूर शहर ऐतीहासीक गोंडकालीन किल्ला, समाध्या व मंदीरे साठी ओळखला जातो. या शहरात जवळपास 500 वर्ष जुना गोंडकालीन किल्ला-परकोट असुन आजही भक्कम स्थितीत उभा आहे. या परकोटाची लांबी जवळपास 11 किमी लांब असुन 4 दरवाजे 5 खिडक्या आणी 39 बुरूजे आहेत. याकडे बरीच वर्ष दुर्लक्ष झाल्याने यावर मोठी-मोठी झाडे, वृक्ष-वेली, झाडी-झुडपे वाढल्याने याला खंडहर स्वरूप प्राप्त झालेले होते. संपुर्ण परकोटावर अस्वच्छता व घाणीचे साम्राज्य पसरले होते. हा संपुर्ण किल्ला-परकोट स्वच्छ व साफ करण्याच्या दृष्टीने 1 मार्च 2017 रोजी इको-प्रो संस्थेच्या कार्यकत्र्यानी चंद्रपूर किल्ला-परकोट स्वच्छता अभियानाची सुरूवात केली होती. आज 1 मार्च 2018 रोजी या अभियानास एक वर्ष पुर्ण झाले असुन या वर्षभरात एकुण 348 दिवस प्रत्यक्ष श्रमदान करून किल्ला स्वच्छ करण्याचा प्रयत्न सुरू ठेवलेला आहे.
किल्ला स्वच्छता अभियानास एक वर्ष पुर्ण झाल्याचे निमीत्त साधुन आज किल्ला-परकोटावरील विठोबा खिडकी ते बिनबा गेट मधील बुरूज क्रं. 25 वर आज छोटेखानी कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला होता. यात प्रमुख उपस्थिती शहरातील जेष्ठ इतीहास अभ्यासक आचार्य टी टी जुलमे उपस्थिती होती. सोबत इको-प्रो चे बंडु धोतरे, प्रा डाॅ योगेश दुधपचारे, प्रा डाॅ मिलींद जांभुळकर, संदीप जेउरकर, रवी झाडे, धनजंय शास्त्रकार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी अभियानास 1 वर्ष पुर्ण झाल्याचे निमीत्ताने यावेळी केक कापण्यात आला. यांनतर उपस्थित पाहुणे आणी जनता महाविदयालयाचे विदयाथ्र्याना किल्लाचा परीसराची फेरी म्हणजेच ‘हेरीटेज वाॅक’ करवुन किल्लाची माहीती देण्यात आली. या अभियान अंतर्गत कशा पध्दतीने श्रमदान करून स्वच्छता राबविण्यात आली याची माहीती देण्यात आली. इको-प्रोच्या अनेक कार्यकत्र्याच्या सातत्यपुर्ण योगदानामुळे सदर अभियान यशस्वी होत असल्याची माहीती यावेळी देण्यात आली.

आजच्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी इको-प्रो चे रविद्र गुरनुले, नितीन बुरडकर, नितीन रामटेके, बिमल शहा, अनिल अडगुरवार, राजु काहीलकर, संजय सब्बनवार, अमोल उटट्लवार, सुधीर देव, हरीदास कोराम, किशोर वैदय, हरीश मेश्राम, वैभव मडावी, रोशन धोतरे, विनोद दुधनकर, सुमीत कोहळे, आशीष मस्के, विशाल रामेडवार, प्रतीक बदद्लवार, सचिन धोतरे, हेमंत बुरडकर, कपील चौधरी आदीनी सहकार्य केले.