সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, March 07, 2018

ग्रामगीता महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र

चिमुर तालुका प्रतिनीधी:
        मॉर्डन परस्पेक्टीव्ह ऑफ लाईफ या विषयावर ग्रामगीता महाविद्यालय चिमुर राष्ट्रपिता महात्मा गांधी कला विज्ञान महाविद्यालय नागभीड, मोहनसिनभाई जव्हेरी कलावाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वडसा यांच्या संयुक्त विद्यमाने व महाराष्ट वन विभाग बिरबल सावीत्री सहानी फाँडेशन लखनौ यांच्या सहकार्याने दोन दिवसीय चर्चासत्राचे आयोजन दिनांक ९ व १० मार्च ला करन्यात आले आहे.
         जिवन विज्ञानाच्या आधुनिक दृष्ट्रीक्षेपावर प्रकाश टाकणाऱ्या या चर्चासत्रासाठी मुख्य अतिथी म्हणुन सेमाना विद्या व वन प्रशिक्षण मंडळगडचिरोली चे माजी राज्यमंत्री व आम.ब्रम्हपुरी विधान सभा क्षेत्र चे विजय वडेट्टीवार, किशोर वनमाळी अध्यक्ष मनोहरभाई शिक्षण प्रसारक मंडळ आरमोरी, जैनुद्धीन जव्हेरी बल्लारपुर सेवा समिती बल्लारपुर डॉ.एन एस कोकोडे,अधीष्ठाता विज्ञान विभाग गोंडवाणा विद्यापीठ गडचिरोली हे कार्यक्रमाला उपस्थित राहनार असून कुलसचिव डॉ.एन व्ही कल्याणकर यांच्या हस्ते सदर परिसंवादाचे उद्घाटन होनार आहे यावेळी मानद पाहूने म्हणुन आयएआरआय नवी दिल्ली चे प्रा. सि डी माई, चंद्रपुर मुख्य वन संरक्षक डॉ व्हि एस शेळके पर्यावरण मंत्रालय भारत सरकार चे आरइसी सदस्य डॉ सुरेश चोपणे उपस्थीत राहणार आहेत.
        तोडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या कुशीत वसलेल्या चिमुर तालुक्यातील बहुतेक गावांना निर्सगाचा वारसा लाभ लेला आहे. त्याअनूसंघाने तालुक्यातील संशोधन करनाऱ्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना लाभ मिळावा या उदात्त हेतुने चिमुर येथे राष्ट्रीय विज्ञान परिषदेचे आयोजन केले असल्याची माहिती ग्रामविचे प्राचार्य डॉ अमीर धम्मानी यांनी दिली. यावेळी आरएमजी कॉलेज नागभीड चे प्राचार्य डॉ अनिल कोरपेनवार, एम झेड कॉलेज देसाईगंज प्राचार्य सुरेश रेवतकर, हे उपस्थित राहनार आहेत.
        सहभागी होनाऱ्या विद्यार्थी व शिक्षकांना त्यांचे शोधप्रबंध सादर करन्याची अंतीम तारीख १ मार्च होती त्याकरीता जवळपास शंभर शोध प्रबंधकाची नोंदणी झाली असून चिमुर तालुक्यातील होतकरू व वैद्यज्ञानीक विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरनारी मोलाची संधी प्राप्त झाली आहे. सदर चर्चासत्रातुन विद्यार्थी व शिक्षकांना आपल्या योजना, मते, दृष्टीकोन, संसोधन सादर करनेही प्रमूख संकल्पना आहे. यामुळे राष्ट्र बांधनीसाठी वैद्यज्ञानिक नवा व्यासपीठ उभा ठाकनार आहे.त्याही पलीकडे जिवनात येनाऱ्या नावीन्यपूर्ण संकल्पनासाठी हा उपक्रम युवकांसाठी मैलाचा दगड ठरनार आहे.

 जैवविवीधता (बायोडावरसीटी ) अॅन्थो बॉटनी, (बाह्यवनस्पतीशास्त्र) पॉलीओबॉटनी ( रूपीकी ) पालीनोलॉजी बहुजैवशास्त्र, मायक्रोबियल  (सुक्ष्मजैवविवीधता ) ,फुड अन्ड इंडस्ट्रीयल मायक्रोबायलाजी (अन्न व औद्योगिक शुक्ष्मजिवशास्त्र ), इंवांरमेन्टल मायक्रोबायलाजी ( पर्यावरण सुक्ष्म जिवशास्त्र ), अॅग्रीकल्चर मायक्रोबायलाजी ( कृषी सुक्ष्म जिवशास्त्र ) मेडीकल मायक्रोबायलाजी ( वैद्यकीय सुक्ष्मजीवशास्त्र ) आणी रोग प्रतीकारशास्त्र, पर्यावरण प्रदुषण, आपत्ती नियोजन ग्रीन इकानॉमी आदी विषयावर संशोधनपर पोष्टर प्रदर्शनीचे आयोजन आले असुन उत्कृष्ठ तीन पोष्टरना पारीतोशिक देन्यात आहे. त्याचबरोबर सहभागी शिक्षक व विद्यार्थांना प्रमानपत्र व विजेत्यांना पारीतोशीक देन्यात येनार आहे.
      यामध्ये पेपर पब्लीश, पोष्टर पब्लीश प्रेजेंटेशन होनार असुन ग्रामीन संशोधक विद्यार्थ्यांना लाभ मिळनार आहे पत्रकार परिषदेला प्राचार्य धम्मानी, प्राचार्य डॉ अनिल कोरपेनवार, प्राचार्य डॉ सुरेश रेवतकर, डॉ जि डी देशमुख, डॉ ए एस नागपुरे, प्रा. उमेश आनंदे, डॉ संदीप सातव, डॉ.आर जी रूळे,डॉ संदीप मेश्राम, प्रा. वरदा खटी, प्रा सी बी रूळे प्रा. राजु रामटेके आदी उपस्थित होते.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.