সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, March 03, 2018

कारची दुचाकीला जबर धडक...!

अपघातात वडील मृत ... तर मुलगा गंभीर जखमी..!

गोंडखैरी परिसरातील घटना

-----------------------------------------

गजेंद्र डोंगरे
बाजारगाव-प्रतिनीधी-(दि.२/मार्च) 

  महामार्ग क्रमांक सहा वर गोंडखैरी परिसरात टोलनाका चांदविम कंपनी जवळच काल दि.२/मार्च सायंकाळी साडेपाच दरम्यान धूळवडीच्या दिवशी कार व दुचाकीची जबर धडक होऊन त्यात बाईकवर स्वार असलेल्या एकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला.   

        याबाबत सविस्तर वृत्त असे की गोंडखैरी निवासी घनश्याम केशव शिंदे वय ५२ वर्षे हे आपला  मुलगा अवि घनशाम शिंदे वय २० वर्षे यांचेसह त्यांचे डिस्कव्हर दुचाकी क्रमांक एमएच-४०-एजे-५८२१ घेऊन व्याहाड(पेठ) येथे रंग खेळायला त्यांचे नातेवाईक राजेश बाबूराव काळे यांच्याकडे गेले होते.तिथून रंग खेळून वापस परत येताना गोंडखैरी येथील टोलनाक्याजवळच्या चांदविम कंपनी लगत त्याच दिशेने मागून येणाऱ्या एमएच-३१-ईयू-०४५८ क्रमांकाच्या भरधाव आयटेन कारने त्यांना मागून धडक दिली.  ही धडक एवढी जबरदस्त होती की त्यामुळे दोन्ही मोटरसायकलस्वार वर हवेत उडून जमीनीवर आपटले व पन्नास फूट फरफटत गेले.घटनास्थळी कारचा टायर फुटला त्यात वडील घनश्याम शिंदे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला व मुलगा गंभीर जखमी झाला.

       अपघात घडल्यावर कारचा टायर फुटूनही कार चालकाने कार वळवून परत भरधाव वेगाने पळ काढला. काही प्रत्यक्षदर्शिंनी कारचा नंबर घेऊन पाठलाग करुन पकडण्याचा प्रयत्न केला मात्र कारचालक कार व्याहाड प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील परिसरातील शेतात लपवून पसार होण्यात यशस्वी झाला.

      व्याहाड(पेठ) परिसरातील लोकांनी पंचर कार टायरडिक्सवर टायर मध्यून आग(विस्तव) निघत असताना पाहून भरधाव कारला चालवित असतांना स्थानिक ग्रामस्थांना संशय आला.व परिसरात काही अपघात झाला असावा असा जोर धरु लागला.तात्काळ परिसरात अपघाताची माहीती पसरतात तोपर्यंत कारचालक कार शेतात ठेऊन पसार होण्यास यशस्वी झाला.

     जखमी मुलगा अवि शिंदे ह्यास वाडी येथील वेल-ट्रीट या खाजगी रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले.घटनेची माहीती मिळताच कळमेश्वर पोलीसांनी घटनास्थळ गाठून मृतकास उत्तरीय तपासणी करीता कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयात    नेण्यात आले.कळमेश्वरचे ठानेदार चंद्रशेखर बहादूरे यांचे नेतृत्वात पिएसआय शुभांगी ढगे,पिएसआय चंदा दंडवते,काँन्स्टेबल काकडे,सोमकुवर,शेरे त्यांच्या सहकाऱ्यांसह पुढील तपास करीत आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.