সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, March 06, 2018

शहरालगत बिबट्याचा मृत्यू

चंद्रपूर/ रोशन दुर्योधन:
चंद्रपूर वनविभागाच्या मुख्यालयापासून काहीच अंतरावर असलेल्या वरवट गावालगत असलेल्या जंगलात दोन ते अडीच वर्षाच्या मादा बिबट मृत अवस्थेत आढळल्याने वनविभागात चांगलीच खळबळ उडाली आहे . या घटनेची घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. या पंचनाम्यात ही मादा बिबटचा मृत्यू २ ते तीन दिवसापूर्वी झाला असावा असा प्राथमिक माहिती वनविभागाकडून वर्तविल्या जात आहे. वनविभागाने मृतदेह शवविच्छेदनासाठी रेस्क्यू सेंटर रामबाग येथे आणला असून मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदना नंतर कळणार आहे. वारंवार होणाऱ्या वाघ व बिबट्याच्या होणाऱ्या मृत्यूमुळे वन्यप्रेमी चिंता व्यक्त केली जात असून यांच्या मृत्यू मागचे गूड शोधून काढायला हवे अन्यथा जंगलाचे संतुलन ढासळायला वेळ लागणार नाही


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.