সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, March 31, 2018

कमल स्पोर्टींग क्लब च्या वतीने महाकाली यात्रेकरूंना मसाला भात वितरण

कमल स्पोर्टींग क्लब च्या वतीने महाकाली यात्रेकरूंना मसाला भात वितरण

चंद्रपूर/प्रतिनिधी:

 कमल स्पोर्टींग क्लबचे संस्थापक स्व. कालीदास गं. अहीर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री हनुमान जयंतीच्या शुभपर्वावर दि. 31 मार्च रोजी श्री महाकाली यात्रेकरूंना मसाला भात वितरीत करण्यात आले. या कार्यक्रमाचा शुभारंभ भाजपाचे जिल्हा सरचिटणीस राहूल सराफ व कमल स्पोर्टींग क्लबचे जिल्हाध्यक्ष रघुवीर अहीर यांच्या शुभहस्ते करण्यात आला. 
या मसाला भात वितरण कार्यक्रमास भाजपा किसान आघाडीचे जिल्हा महामंत्री राजू घरोटे, भाजयुमोचे युवा नेते मोहन चैधरी यांचेसह राजेंद्र कागदेलवार, पूर्व नगरसेवक शंकर वाकोडे, महेश अहीर, शामल अहीर, विनय अहीर, अजेय अहीर, तेजा सिंह, राजेश वाकोडे, स्वप्नील मून, अभिनव लिंगोजवार, राहूल बोरकर, अरविंद जामुनकर, जितू शर्मा, मयुर झाडे, विपीन मेंढे, प्रविण वाकोडे, पियुष बुरांडे, जितू वासेकर, ललीत गुलानी यांचेसह कमल स्पोर्टींग क्लबचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. 
कमल स्पोर्टींग क्लबच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून महाकाली यात्रेकरूंना मसाला भात वितरण करून आपले सामाजिक कर्तव्य पार पाडले जात आहे. यंदाही कमल स्पोर्टींग क्लबने महाकाली यात्रेकरूंसाठी मसाला भात वितरण करून सामाजिक कार्यात योगदान देण्याचा प्रयत्न केला आहे. 
चंद्रपूर विभाग एसटी नियंत्रकपदी राजेंद्र पाटील

चंद्रपूर विभाग एसटी नियंत्रकपदी राजेंद्र पाटील

chandrapur bus stand साठी इमेज परिणामचंद्रपूर/ललित लांजेवार:

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे राज्यातील 15 विभाग नियंत्रकांच्या बदल्या केल्या आहेत. यात औरंगाबादचे राजेंद्र पाटील यांची चंद्रपूर येथे बदली करण्यात आली आहे, तर यामिनी जोशी यांच्याकडे पुणे विभागाची, तर नगरचे नितीन मैंद यांच्याकडे नाशिक विभागाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.


बदली करण्यात आलेल्या विभाग नियंत्रकांकडे देण्यात आलेले विभाग असे
पुण्याचे श्रीनिवास जोशी- मुंबईच्या मध्यवर्ती कार्यालयात शिवशाही बससेवा कक्ष,    
यवतमाळचे अशोक वरठे- नागपूर,
रत्नागिरीच्या अनघा बारटक्के- रायगड, 
सिंधुदुर्गचे चेतन हासबनीस- पुण्याची द्वितीय आवेदन समिती,
जळगावच्या चेतना खिरवाडकर- वर्धा, 
औरंगाबादचे राजेंद्र पाटील-चंद्रपूर, 
बुलडाण्याचे अनिल म्हेत्तर- रत्नागिरी, 
धुळेचे राजेंद्र देवरे- जळगाव,
साताराच्या अमृता ताम्हणकर- सांगली,
सांगलीचे शैलेंद्र चव्हाण- ठाणे,
जालनाचे प्रशांत भुसारी- औरंगाबाद, 
रायगडचे विजय गिते-नगर,
अकोलाचे रोहन पलंगे- कोल्हापूर.
यामधील चव्हाण, मैंद, भुसारी, गिते, पलंगे, श्रीमती ताम्हणकर यांची विनंती बदली करण्यात आली आहे. हासबनीस यांना उपमहाव्यवस्थापक पदाच्या बदल्यात बदली देण्यात आली आहे.
कामावरून काढलेल्या कामगाराने केली आत्महत्या

कामावरून काढलेल्या कामगाराने केली आत्महत्या

Worker suicide committed by work | कामावरून काढलेल्या कामगाराची आत्महत्याचंद्रपूर/प्रतिनिधी:
जीएमआर पॉवर प्लॅन्ट या कंपनीत कार्यरत असलेल्या व नंतर त्याला कामावरून कमी केलेल्या कामगाराने गळफास लावून आत्महत्या केली. सदर घटना गुरुवारी रात्री घडली.अक्षय आंबटकर (२३) रा. बाबुपेठ असे सदर कामगाराचे नाव आहे.
न्याय मागण्यासाठी आंदोलन केले, याची शिक्षा म्हणून वरोरा येथीलजीएमआर पॉवर प्लॅन्ट व्यवस्थापनाने तब्बल ८६ कामगारांना कामावरुन काढून टाकले. कंपनीच्या या कामगार विरोधी धोरणाच्या विरोधात लढा देणाऱ्या जीआर पॉवर प्लॅन्ट कामगार संघटनेच्या तक्रारीवरुन हे प्रकरण मंत्रालयात पोहचले होते. ८६ कामगारांना एकाच वेळी कामावरुन कमी करुन टाकल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या विरोधात अनेकदा जिल्हाधिकारी, जिल्हा कामगार आयुक्तांकडे जीएमआर पॉवर प्लांट कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश चोखारे यांच्या नेतृत्वात दाद मागितली. मात्र कुणीही कामगारांच्या तक्रारीची दखल घेतली नाही. यासंबंधीची तक्रार विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांच्याकडे देण्यात आली आहे. दरम्यान, या कामगारांपैकी अक्षय आंबटकर याने गुरुवारी रात्री गळफास लावून आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच जीएमआर पॉवर प्लांट कामगार संघटनेचे अध्यक्ष दिनेश चोखारे यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. पोलिसांनी याप्रकरणी मर्ग दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Friday, March 30, 2018

चंद्रपुर पोलीस शिपाई भरती-2018

चंद्रपुर पोलीस शिपाई भरती-2018

दिनांक 04 एप्रिल 2018 रोजी
chandrapur police साठी इमेज परिणाम
चंद्रपुर पोलीस शिपाई भरती-2018 मध्ये लेखी परिक्षेकरीता पात्र उमेदवांराची यादी दिनांक 24/03/2018 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली होती. त्यावर आक्षेप दिनांक 27/03/2018 पर्यंत नोंदविण्यास कळविण्यात आलेले होते. त्याबाबत समर्पक आक्षेप या कार्यालयास प्राप्त न झाल्याने दिनांक 24/03/2018 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली लेखी परिक्षेकरीता पात्र उमेदवारांची यादी कायम ठेवण्यात आलेली आहे.
लेखी परिक्षेकरीता पात्र उमेदवारांची लेखी परिक्षा ही दिनांक 04/04/2018 रोजी घेण्यात येणार आहे. करीता पात्र उमेदवार यांनी दिनांक 04/04/2018 रोजी सकाळी 04ः00 वाजता पोलीस कवायत मैदान पोलीस मुख्यालय चंद्रपुर येथे न चुकता हजर राहावे. वेळेनंतर येणाऱ्या उमेदवारांना प्रवेश नाकारल्या जाईल याची नोंद घ्यावी.
लेखी परिक्षेकरीता महत्वाच्या सुचना
➢ लेखी परिक्षेला येतांना पोलीस भरतीचे पिवळया रंगाचे ओळखपत्र सोबत आणावे.
➢ सोबत हॉल टिकीट व पाण्याची बॉटल आणावी.
➢ परिक्षेला येतांना कोणत्याही प्रकारचे इलेक्टंानिक साहित्य ,कॅलक्युलेटर, मोबाईल फोन, कॅमेरा,लॅपटॉप, टॅबलेट, तसेच इतर मौल्यवान वस्तु इ.सोबत आणु नये.
➢ उशिराने येणाऱ्या उमेदवारांना लेखी परिक्षेकरीता प्रवेश देण्यात येणार नाही.पोलीस विभागातर्फे असे आवाहन करण्यात येत आहे की, पोलीस भरती प्रक्रिया निपःक्षपातीआणि अत्यंत पारदर्शक पध्द्तीने होत असुन उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभणास किंवा आमिशाला बळीपळु नये. पोलीस भरतीमधील उमेदवार यांना कोणत्याही टप्प्यावर काही शंका किंवा माहिती असल्यास त्यांनी त्वरीत भरती प्रक्रियेतील वरिष्ठ अधिकारी यांना समक्ष भेटुन संपर्क करावा.
संपर्क क्रमांक पोलीस नियंत्रण कक्ष चंद्रपुर 07172-251200/263100/2732581

                                                                                                     (ललित लांजेवार )
महाकालीच्या दर्शनाकरिता येणा-या भाविकांसाठी जोरगेवार सरसावले:यात्रेकरूंनी मानले आभार

महाकालीच्या दर्शनाकरिता येणा-या भाविकांसाठी जोरगेवार सरसावले:यात्रेकरूंनी मानले आभार

चंद्रपूर/प्रतिनिधी:
                 सध्या चंद्रपूर शहरात माता महाकालीच्या यात्रेची धुम चालू आहे. यात्रेकरिता बाहेर जिल्ह्यातून भक्त येतात पण याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. यात्रेकरूंना इथे अतिशय अल्पशी सोय महानगर पालीकेकडून करून देण्यात आली आहे. या माता महाकाली मंदिरा लगत ठिकाणी पवित्र असलेली झरपट नदी आहे. त्या नदीच्या पात्रामध्ये लाखो भाविक स्नान करून मातेच्या दर्शनाकरिता जातात. भाविक उघड्यावर स्नान करतात पण त्यांना तिथे पुरेशी अशी स्नानगृहाची व्यवस्था सुद्धा मनपाप्रशासनाकडून करून देण्यात आलेली नाही. काल शिवसेना नेते किशोर जोरगेवार यांनी महाकाली मंदिर परिसर गाठून भाविकांशी संवाद करून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व यात्रेकरूंची पाहणी केली असता झरपट नदीच्या पात्रामध्ये लाखो महिला भाविक उघड्यावर स्नान करत होते त्यांना मनपा प्रशासनाकडून स्नान गृह सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले नाही त्यासाठी जोरगेवार यांनी ताबडतोब त्या ठिकाणी महिलांसाठी तात्पुरते स्नानगृह उपलब्ध करून दिले. त्यासाठी यात्रेकरूंनी किशोर जोरगेवार यांचे आभार मानले.
              मातेच्या दर्शनाकरिता येणारे यात्रेकरू दुषित पाण्यामध्ये स्नान करतात ते पाणी सुद्धा मनपा कडून स्वच्छ करून देण्यात आले नाही. त्याचप्रमाणे यात्रेकरूंना शौचालयाची सुद्धा व्यवस्था करून देण्यात आलेली नाही उघड्यावर शौचास बसाव लागत आहे हे दुर्दैव आहे. दर्शनाकरिता येणा-या महिलांना आपली आब्रू उघड्यावर टाकून इथे राहावे लागत आहे. यात्रेसाठी येणा-या माता भगिनीच्या आब्रुचे सुद्धा रक्षण मनपा करु शकत नाही असे जोरगेवार म्हणाले . एकीकडे आपण चंद्रपूर शहराचा विकास होत आहे कुठलाही निधी जिल्ह्यासाठी कमी पडू देणार अस म्हणतो हे विकासाच एक दृश्य येथील महाकाली मातेच्या यात्रेसाठी येणा-या भाविकांना दिसत आहे. हागणदारी मुक्त मनपा कडून बोलल्या जाते त्याचप्रमाने शहरात ठिकठीकाणी स्वच्छतेचे फलक लावण्यात आले पण या नदीच्या पात्रामध्ये कच-याचे ढिगारे दिसत होते. त्या धीगा-याचे सुद्धा काही विल्हेवाट मनपा कडून करण्यात आले नाही असा आरोप जोरगेवारांकडून करण्यात आला .  .
चंद्रपूरच्या सैनिक शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण

चंद्रपूरच्या सैनिक शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण

विद्यार्थी व्यसनांच्या आहारी गेल्याने शिक्षा दिल्याचे स्पष्टीकरण
चंद्रपूर/प्रतिनिधी:
 सन्मित्र सैनिक शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पीडित मुलांनी शाळेची भिंत ओलांडून पळून जात फोनवरुन पालकांना ही माहिती दिल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, विद्यार्थी व्यसनांच्या आहारी गेल्याने थोडी शिक्षा दिल्याचे स्पष्टीकरण शाळेने दिले आहे.
चंद्रपूर येथील सन्मित्र सैनिकी शाळेतील घटनेने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे. या शाळेतील इयत्ता नववीच्या मोहीत उज्वलकर आणि जगजितसिंग भट्टी यांनी शाळेची भिंत ओलांडून पळ काढला. शाळेतील सैनिकी शिस्तीचे कमांडंट सुरिंदर राणा यांनी आपल्याला आणि बहुतांश विद्यार्थ्यांना अनावश्यक मारहाण केली, असा आरोप या मुलांनी केला आहे. या मुलांनी पळून गेल्यावर महामार्गालगत असलेल्या एका हॉटेलातून पालकांशी संपर्क साधला. यांनतर ही घटना उजेडात आली. 
या मुलांना घेऊन पालक थेट चंद्रपूरच्या रामनगर पोलीस ठाण्यात पोहचले. कमांडंट राणा मुलांना सिगरेट आणण्यासाठी दबाव आणत होते. त्यातूनच ही मारहाण झाली आहे. इयत्ता नववीची एक प्रश्नपत्रिका फुटल्याचा या विद्यार्थ्यांवर केलेला आरोप, हे अन्य कारण असल्याचे मुलांचे म्हणणे आहे. या मुलांना झाडाला बांधून दंडुक्याने मारहाण करण्यात आली असून, विद्यार्थ्यांनी त्याचे वळ देखील दाखवले.
सन्मित्र सैनिकी शाळेच्या कमांडंटचे हे कृत्य अमानूष आहे. त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या असून, या व्यक्तीविरोधात गुन्हे दखल करून कारवाई करावी. तसेच सन्मित्र सैनिकी शाळेची मान्यता रद्द करण्याची मागणी संतप्त पालकांनी यावेळी केली आहे. 
सन्मित्र सैनिकी शाळेशी या संदर्भात संपर्क साधला असता त्यांनी हे २ विद्यार्थी व्यसनाच्या आहारी गेले होते. यांच्याजवळ सिगरेट असल्याची माहिती पालकांनी फोनवरून व्यवस्थापनाला दिली होती. त्यानंतर घेतलेल्या झडतीत त्यांच्या पेटीत सिगरेट - तंबाखू- खर्रा आढळला होता. त्यानंतर त्यांच्यावर सैनिकी शाळेच्या शिस्तीनुसार थोडी शिक्षा करण्यात आली. मात्र, त्यात कुठलाही अमानुषपणा नव्हता, असे प्राचार्यांनी सांगितले. आम्ही या घटनेची चौकशी करत असून, पोलिसांना देखील सहकार्य करत असल्याचेही त्यांनी सांगितले. 
चंद्रपूरच्या शैक्षणिक क्षेत्रात एक नावाजलेली शाळा म्हणून सन्मित्र सैनिकी शाळेची ओळख आहे. अशा शाळेसंदर्भात मारहाण आणि विद्यार्थी पलायनाचे प्रकरण पुढे आल्याने घटनेतील सत्यता पुढे यावी, अशी आग्रही मागणी केली जात आहे.

Thursday, March 29, 2018

५० शेळ्यांचा मृत्यू

५० शेळ्यांचा मृत्यू

चंद्रपूर/प्रतिनिधी:
चंद्रपूर ब्रह्मपुरी तालुक्यातील मेंडकी येथे साथीच्या आजाराने जवळपास  ५० शेळ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती पुढे येत आहे.
गेल्या १० ते १२ दिवसांपासून मडकी येथे शेळ्यांवर अज्ञात रोगाणे हल्ला चढविला आहे.  एका पाठोपाठ एक अशा आत्तापरीयंत तब्बल ५० शेळ्या मृत्यूमुखी पडल्या  आहे. या प्रकाराची माहिती पं.स.सदस्य थानेश्वर कायरकर यांना मिळताच त्यांनी इकडे तिकडे धावाधाव सुरू केली. त्यांनी ब्रम्हपुरी पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. उदय कोराने यांच्यासोबत संपर्क साधला. डॉ. कोराने त्यांनी आपल्या चमूसह मेंडकी गावात भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली व औषधोपचार सुरू केला.त्यानंतर तात्काळ मडकी येथे पशूंच्या तपासण्या कारण्याबाबद शिबिराचे आयोजन करण्यात आले. 
आश्रमशाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीने दिला मुलीला जन्म

आश्रमशाळेतील दहावीच्या विद्यार्थिनीने दिला मुलीला जन्म

aadivasi girl pregnant साठी इमेज परिणामगडचिरोली/प्रतिनिधी:
 अहेरी तालुक्यातील वेलगूरच्या राजे धर्मराव आश्रमशाळेत दहावीला शिकत असलेली विद्यार्थिनी चक्क  एका सुदृढ मुलीला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी संस्थेने आश्रमशाळेचे मुख्याध्यापक तसेच महिला व पुरूष अधीक्षकांना तडकाफडकी निलंबित केले.
विशेष म्हणजे सदर विद्यार्थिनीने दहावीची परीक्षाही दिली. पण तरीही तिच्याबद्दल कोणत्याही शिक्षकाला, अधीक्षकांना साधा संशयही आला नाही,  आपल्याच वर्गात शिकणाऱ्या गावाकडच्या विद्यार्थ्यासोबत तीन वर्षांपासून प्रेमसंबंध असल्याची कबुली   देऊन आपली कोणाबद्दलही काही तक्रार नसल्याचे बयाणात म्हटले आहे. ती आणि तिचा प्रियकर दोघेही दहावीत असले तरी ते २० वर्ष वयाचे आहेत. यापूर्वी दुसऱ्या गावातील आश्रमशाळेत दोघेही काही वर्ष नापास झालेले आहेत,  
या विद्यार्थिनीला प्रसूतीच्या वेदना होऊ लागल्यानंतर सुरूवातीला अहेरी व नंतर गडचिरोलीला भरती करण्यात आले. गडचिरोलीत तिने एका मुलीला जन्म दिला. विशेष म्हणजे तिची ‘नॉर्मल डिलीव्हरी’ झाली आहे. रक्ताची कमतरता असल्यामुळे नंतर तिला चंद्रपूरला हलविण्यात आले. यासंदर्भातील तक्रार संस्थेकडून आल्यानंतर अहेरी येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाने त्या मुलीचे बयाण घेतले. दरम्यान राजे धर्मराव शिक्षण संस्थेने मुख्याध्यापक एम.एस. कुर्वे, अधीक्षक आर.बी. पोलोजीवार व महिला अधीक्षिका डोंगरे यांना निलंबित केले.

वैद्यकीय तपासणीच होत नाही
घडलेल्या संपूर्ण प्रकरणावरून आता विध्यार्थ्यांच्या शारीरिक तपासणीचा मुद्दा समोर आला. आश्रमशाळेतील विद्यार्थ्याची वर्षातून किमान तीन वेळा वैद्यकीय तपासणी होणे आवश्यक असते. ही तपासणी फिरते वैद्यकीय पथक किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राचे पथक करते, पण प्रत्यक्षात अशी तपासणी केलीच जात नसल्याचे या प्रकारावरून स्पष्ट होते.

Wednesday, March 28, 2018

आमडीच्या यादव ढाबा घटनेतील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

आमडीच्या यादव ढाबा घटनेतील जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल; पाच आरोपींना अटक,31 पर्यंत पोलीस कोठडी
रामटेक तालुका प्रतिनिधी:

रामटेक पोलीस ठाणे हद्दीतील राष्ट्रीय  महामार्ग क्रमांक 7 वर मनसरनजिकच्या आमडी येथील यादव ढाबा येथे तेथील नोकर सत्येन पांडे यांस आरोपींनी जबर मारहाण केल्याची घटना दिनांक 25 मार्च रोजी घडली . होती.जखमीस नागपुरच्या मेडीकल कॉलेजमध्ये उपचारासाठी भ्रती करण्यांत आले होते.मात्र त्यात त्याचा दुर्दैवी अंत झाला.रामटेक पोलीसांनी याप्रकरणी आतापर्यंत एकूण पाच आरोपींना गजाआड केले असून सहाव्या
आरोपीचा  शोध  सुरू आहे.अटक आरोपींना 31 मार्च 2018 पर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यांत आली आहे.
याप्रकरणी रामटेक पोलीसांनी सांगीतल्याप्रमाणे आमडी येथे सतिराम रामबरत यादव यांचा ढाबा आहे.त्यांचा नोकर सत्येन्द्र धरमराज पांडे हा मूळचा मध्यप्रदेशातील होता मात्र तो ढाब्यावरच राहात होता दिनांक 25 मार्च
2018 रोजी आमडी येथील पंकज उर्फ पप्पू गडे,राधेशाम श्रीपत बादुले,संजय मुन्नाप्रसाद यादव व हेटीटोला मनसर येथील प्रकाश शंभू वरखडे व विकास उर्फ विक्की शंभू वरखडे व अन्य एक साथीदार यांनी सत्येन्द्र पांडे  यांस ढाब्यावर येवून लाथाबुक्यांनी मारहाण केली नंतर त्यास आपल्या टाटा सुमो वाहनात बसवून घेवून गेले तासाभराने त्याला पुन्हा ढाब्यावर आणले व मारहाण करून जखमी अवस्थेत सोडून आरोपी टाटा सुमोने पसार झाले.या घटनेबाबत ढाबामालक सतिराम यादव यांनी रामटेक पोलीसांना दिलेल्या तक्रारीवरून पोलीसांनी भादंवीच्या 307,143,147,148,149 व 367 या कलमांखाली गुन्हा नोंदविला व पाचही आरोपींना अटक करण्यांत आली.
दरम्यान जखमी पांडे यांस नागपुरच्या शासकीय मेडीकल कॉलेज व रूग्णालयांत उपचारासाठी दाखल करण्यांत आले होते.दिनांक 27 मार्च 2018 रोजी उपचारादरम्यान सतेंद्र पांडे यांचा मृत्यू झाला.त्याच्या मृत्यूनंतर 
आरोपींवर दाखल गुन्हयात 302 या कलमांची भर घालण्यांत आली.मृतक हा मध्यप्रदेशातील असल्याने त्याचे नातेवाईकांनी त्याचे पार्थिव आपल्या मुळ गावी नेले.रामटेक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दिपक 
वंजारी हे या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
ढाबामालकांच्या वर्चस्वाच्या लढाईतून उपरोक्त घटना घडली की अन्य कुठले कारण आहे याबाबत अद्याप माहीती मीळाली नाही. नाही.पोलीस तपास करीत आहेत व तपासांत सत्य पुढे येईल.
 गायी कोंबून नेणारी टाटासुमो पकडली;चालक फरार

गायी कोंबून नेणारी टाटासुमो पकडली;चालक फरार

रामटेक तालुका प्रतिनिधी:

रामटेक तालुक्यांतील देवलापार पोलीस ठाणे हद्दीत देवलापार गोरक्षण समोर भरधाव वेगाने व टाटा सुमो या वाहनातून सहा गायी नेत असंतांना गाडी व गायी असा मुद्देमाल पोलीसांनी हस्तगत केला मात्र या सुमोचा चालक पळून गेला.
याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की,देवलापार पोलीसांनी भरधाव टाटा सुमोत गायीची वाहतूक करीत असलेल्या
चालकास थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र त्याने भरधाव वाहन पळविले नंतर तो थांबला व पाठलागावर असलेल्या पोलीसांना येण्यापुर्वीच तिथून पळून गेला. दिनांक 28 मार्च 2018 रोजी ही घटना घडली.देवलापार पोलीसांनी टाटा सुमो क्रमांक एम.पी.50.डी.0305 याला थांबण्याचा ईशारा दिला असतां तो सरकारी पोलीस जीपला डाव्या बाजुने धडक देवून भरधाव वेगाने समोर गेला. लगेच त्याचा पठलाग केला मात्र पुढे  जावून त्याने आपले वाहन गोरक्षणसमोर ठेवून पळून गेला.
पोलीसांनी सुमो व सहा गायाी ताब्यात घेतल्या आहेत.याप्रकरणी आरोपीवर प्राण्यांना निर्द्रयतेने वागवणे व महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व अन्य कलमांखाली अज्ञात चालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी देवलापार पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Tuesday, March 27, 2018

कोळसा खाणीत भीषण आग

कोळसा खाणीत भीषण आग

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 चंद्रपूर येथील रयतवारी कोळसा खाणीतील कोळसा वाहून नेणाऱ्या मशीनच्या लोडींग बेल्टला अचानक मोठी आग लागल्याने खान प्रशासनात व  परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे. या आगीमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ही आग चांगलीच रौद्ररूप धारण करू लागली.

मंगळवारी पहाटे 4 वाजताच्या सुमारास रयतवारी कोळसा खाणीतील कोळसा वाहून नेणाऱ्या लोडींग बेल्टला मोठी आग लागली. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जात असून, आगीवर नियंत्रण ठेवण्यासाठी अग्निशामक दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. 
या आगीमुळे सध्या खाणितील कोळसा उत्पादन बंद ठेवण्यात आला आहे. मात्र बेल्ट तुटल्याने आत मोठ्या प्रमाणात कोळसा पडून आहे.त्यामुळे  एखादा गैरप्रकार झाकण्यासाठी ही आग लावण्यात आल्याची देखील चर्चा परिसरात सुरू आहे.

Monday, March 26, 2018

हत्यार सफाई दरम्यान बंदुकीतून सुटली गोळी;पोलीस जखमी

हत्यार सफाई दरम्यान बंदुकीतून सुटली गोळी;पोलीस जखमी


चंद्रपूर/
(ललित लांजेवार):
दैनंदिन कर्तव्यादरम्यान पोलीस मुख्यालय परीसरात ज्या वैशिष्ट्य ठिकाणी हत्यारांची दैनंदिन सफाई/तपासणी करण्यात येते त्या ठिकाणी सोमवारी सकाळी 07 वाजता दरम्यान पोहवा पुरोशत्तम येरमे व पो. शी  शंकर चौधरी हे दोघेही पोलीस कर्मचारी कर्तव्यासाठी असलेले हत्यार/रायफल दैनंदिन देखभाल व सफाई करीत असताना अचानक अपघात होवुन रायफलमधुन गोळी सुटली. गोळी सिमेंटच्या छताला (स्लॅब) लागल्याने छताचा लहानसा तुकडा खाली पडला त्यामुळे पोहवा पुरोशत्तम येरमे व पो.शी शंकर चौधरी हे दोघेही किरकोळ जखमी झाले आहेत. किरकोळ जखमी कर्मचारी यांचेवर तात्काळ प्राथमिक उपचार करण्यात आले असुन ईतर कोणतीही हानी झालेली नाही,घटनेची माहीती मिळताच वरिष्ठांनी तात्काळ घटनाठिकाणी भेट देवुन घटनेबाबत माहीती घेतली.

ए.टी.एम फोडून २३ लाख ६२ हजाराची रक्कम लंपास

ए.टी.एम फोडून २३ लाख ६२ हजाराची रक्कम लंपास

atm hayjak साठी इमेज परिणामवरोरा/प्रतीनिधी:
महिनाभरापुर्वी आनंदवन चौकात  असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ए.टी.एम मधून २३ लाख ६२ हजार रुपये लंपास केल्याची घटनातबब्ल महिनाभरानंतर आज उघडकीस आली .
मिळालेल्या महितिनुसार  ९ मार्च २०१८ या कालावधीत मशीन मध्ये छेडछाड झाल्याची माहिती समोर आली पण ए.टी.एम मशीनचे एक्सपर्ट उपलब्ध नसल्याने वरोरा शाखेच्या बँक अधिकाऱ्यांनी वरिष्ठांना या बाबत माहिती दिली. आणि तब्बल १ महिन्या नंतर सॉफ्टवेअर एक्सपर्ट  वरोरा येथे आले असता त्यांनी मशीन खोलून बघताच    ए.टी.एमचे लोक हायज्याक करून २३ लाख ६२ हजाराची रक्कम लंपास झाल्याचे सांगितले .त्यावरून वरोरा पोलीसात गुन्हा दाखल केला आहे.मात्र हे काम एक्सपर्ट माणसाने केले असून यात बँकेच्या कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांचा हात तर नाही ना अशी चर्चा आता शहरात रंगू लागली आहे
माजी विद्यार्थ्यांनी तयार केला शाळा नुतनीकरणाचा आराखडा

माजी विद्यार्थ्यांनी तयार केला शाळा नुतनीकरणाचा आराखडा

चंद्रपूर/प्रतिनिधी:
 फेब्रुवारी महिन्यामध्ये ज्युबिली हायस्कूलच्या काही माजी विद्यार्थ्यांनी स्वछता मोहीम हाती घेऊन शाळेच्या दुरवस्थेवर मात करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. यावेळी जि.प.अध्यक्ष देवराव भोंगळे, मनपा सभापती राहुल पावडे यांनीसुद्धा पुढाकार घेतला. दरम्यान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शाळेच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेला दिले होते. याचाच पहिला टप्पा म्हणून जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता नरेंद्र बुरांडे यांच्या कक्षात शाळेच्या माजी विद्यार्थ्यांची नियोजन बैठक नुकतीच पार पडली. शाळेचे माजी विद्यार्थी जयंत मामीडवार यांनी समन्वय करून ही बैठक घडवून आणली.
यावेळी अभियंता बुरांडे यांनी शाळेच्या नुतनीकरणाचा नियोजन आराखडा सर्व माजी विद्यार्थ्यांच्या अवलोकनार्थ सादर केला. यावेळी माजी विद्यार्थ्यांनी आराखड्यामध्ये काही दुरुस्ती व जोड सुचवली. शाळेच्या सभोवताल असलेली सुरक्षा भिंतीची डागडूजी करून उंची वाढवणे, शाळेच्या उजव्या परिसरात खेळाचे पटांगण, व्यायामशाळा तसेच सुशोभीकरण इत्यादी बाबीमध्ये सुधारणा सुचवण्यात आली. शाळेच्या नुतनीकरणाच्या प्रस्तावाचे अंदाजपत्रक साधारण ७ कोटी रुपयांचे तयार करण्यात आले. यामध्ये मुख्य इमारतीच्या नुतनीकरणासाठी साडे पाच कोटी रुपये, वसतिगृह नुतनीकरणासाठी एक कोटी रुपये तसेच संपूर्ण सुरक्षा भिंतीच्या बांधकामासाठी ५० लाख रुपयांची तरतुद असल्याचे बुरांडे यांनी सांगितले.
ज्युबिली हायस्कूलच्या नुतनीकरणाचा प्रस्ताव नागपूर येथील रचनाकाराने तयार केला आहे. यामध्ये शाळेच्या संपूर्ण इमारतीची मूळ संरचना कायम ठेवून वर्गखोल्या व प्रयोगशाळा यांचे आधुनिकीकरण करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
शाळेच्या मूळ ऐतिहासिक वास्तुचे जतन व्हावे, ही सर्व माजी विद्यार्थ्यांची इच्छा लक्षात घेऊनच आराखडा तयार करण्यात आला आहे. या आराखड्याच्या सूक्ष्म नियोजनासाठी पुढील महिन्यात आणखी एक बैठक आयोजित करण्यात येणार असून त्यामध्ये माजी विद्यार्थी व शाळेचे मुख्यध्यापक यांचे मत विचारात घेण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता बुरांडे यांनी दिली.
इमारतीच्या नूतनीकरणासोबतच शाळेतील इतर सोयी तसेच शैक्षणिक दर्जा पुनर्स्थापणासाठी माजी विद्यार्थ्यांनी शाळेचे मुख्याध्यापकांसोबत चर्चा करुन उपाययोजना सुचविल्या.
ब्रह्मपुरीत होणार अद्ययावत सांस्कृतिक सभागृह

ब्रह्मपुरीत होणार अद्ययावत सांस्कृतिक सभागृह

वडेट्टीवार साठी इमेज परिणामब्रह्मपुरी/प्रतिनिधी:
शैक्षणिक, सांस्कृतिक व नाट्यकलावंतांचे माहेरघर म्हणून ब्रह्मपुरीची ओळख आहे. मात्र सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी एकही सांस्कृतिक व नाट्य सभागृह या शहरात नव्हते. त्यामुळे आमदार विजय वडेट्टीवार यांनी पाठपुरावा करीत नगरविकास विभागाला वारंवार लेखी निवेदन देऊन चर्चा केली होती. तसेच पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडेही निवेदन दिले होते. त्यांच्या प्रयत्नांना यश आले असून शहरात सर्वसोयीयुक्त असे वातानुकुलीत सांस्कृतिक व नाट्य सभागृहासाठी चार कोटींच्या निधीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
सांस्कृतिक व नाट्य सभागृहाच्या बांधकामाकरिता नगर परिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत ब्रह्मपुरी नगर परिषदेला चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निर्णयामुळे ब्रह्मपुरी क्षेत्रातील विद्यार्थी, पालक व नाट्य रसिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. सन १८७४ मध्ये ब्रह्मपुरी तालुक्याची निर्मिती करण्यात आली. शैक्षणिक, सांस्कृतिक व नाट्यकलावंतांचे माहेरघर म्हणून मागील कित्येक दशकापासून प्रसिद्ध आहे. दरवर्षी शहरात अनेक सांस्कृतिक व नाटकांचे कार्यक्रम होतात. काही नाट्य कलावंतांनी आमदार विजय वडेट्टीवार यांना भेटून यासंदर्भात निवेदन दिले असता आमदार वडेट्टीवार यांनी दोन वर्षाच्या आत सांस्कृतिक व नाट्य सभागृहाचे बांधकाम करून देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार आमदार वडेट्टीवार यांनी जिल्हाधिकारी, पालकमंत्री, प्रधान सचिव नगरविकास मंत्रालय मुंबई यांच्याकडे निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता. जिल्हाधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून विदर्भ वैधानिक मंडळास देण्यात आलेली जागा त्यांच्या उपयोगी नसल्यामुळे ती जागा सांस्कृतिक व नाट्य सभागृहाच्या बांधकामासाठी देण्यात यावे, आणि ती जागा नगर परिषदेला हस्तांतरित करण्यात यावी, अशी मागणी केली होती. आता ती जागा नगर परिषदेला देल्याने सांस्कृतिक सभागृहाचे बांधकाम करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तारांकित प्रश्नातून वेधले होते लक्ष
जागेच्या पत्रासह आमदार वडेट्टीवार यांनी पुन्हा नगर विकास विभागाला लेखी निवेदन देवून सतत पाठपुरावा सुरू केला. विधानसभेत तारांकित प्रश्न, कपात सूचना सादर करून शासनाचे लक्ष वेधले. त्यांच्या प्रयत्नाला यश आले असून सांस्कृतिक व नाट्य सभागृहाच्या बांधकामासाठी चार कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या कामाला प्रशासकीय मंजुरीसुद्धा प्राप्त झाली आहे.

Sunday, March 18, 2018

 रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या दुकान गाळयांचे लोकार्पण

रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या दुकान गाळयांचे लोकार्पण

कोल्हे यांच्या नियुक्तीचे आमदारांकडून समर्थन
रामटेक तालुका प्रतिनिधी- 
रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार  समीतीच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या 22 दुकानगाळयांचे लोकार्पण पालकमंत्री यांच्या हस्ते होणार होते मात्र ऐनवेळी ते नआल्याने आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी यांच्या हस्ते ही वास्तु लोकार्पीत करण्यात आली.
यावेळी जेष्ठ सहकार नेते श्रीराम  अस्टनकर,माजी सभापती बालचंद बादुले,नगराध्यक्ष दिलीप देशमुख,तालुका भाजपाध्यक्ष ज्ञानेश्वर ढोक, मुख्यप्रशासक अनिल कोल्हे,उपमुख्यप्रशासक किशोर रहांगडाले,नगरसेवक विवेक तोतडे,बाजार समीतीचे सर्व प्रशासक व तालुक्यातील शेतकरी मोठया संख्येत यावेळी उपस्थित होते.
यावेळी संबोधित करतांना आमदार रेड्डी म्हणाले की,बाजार समीचे मुख्यप्रशासक अनिल कोल्हे हे अतिशय अभ्यासू व्यक्ती असून सहकार क्षेत्रांत त्यांनी भरीव कामगीरी केली आहे. संजिवनी सहकारी पत संस्था व कालीदास सहकारी पतसंस्था स्थापन करण्यापासून त्या नावारूपास आणण्यात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याची स्तुतीसुमने त्यांनी उघळली. कोल्हे यांच्या बाजार समीतीच्या मुख्यप्रशासक पदावर केलेल्या निवडीचे त्यांनी यावेळी समर्थन केले.श्रीराम अस्टनकर,बालचंद बादुले यांचीही यावेळी समयोचित भाषणे  झाली.
यावेळी बाजार समीतीचे अनिल कोल्हे यांनी प्रास्ताविकातून बाजार समीतीच्या विकास कामांची माहीती दिली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी बाजार समीतीचे सचिव हनुमंता महाजन,लेखापाल निक्की महाजन,उमराव मेश्राम,विकास महाजन,प्रकाश लेंडे,अष्विनी उईके,शिल्पा शेंडे  व अन्य सर्व कर्मचारी यांनी परीश्रम घेतले.
रामटेक बाजार समीतीचे मुख्यप्रशासक कोल्हेंची नियुक्ती रद्द करा

रामटेक बाजार समीतीचे मुख्यप्रशासक कोल्हेंची नियुक्ती रद्द करा

युवक कॉंग्रेसने केली घोषणाबाजी,पालकमंत्र्यांचा पुतळा जाळला 
रामटेक तालुका प्रतिनिधी-
नियमबाहय नियुक्ती रद्द झालीच पाहीजे,नही चलेगी....नही चलेगी तानाषाही नही चलेगी,पालकमंत्री मुर्दाबादच्या घोषणा देत रामटेक विधानसभा युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रामटेकच्या कृषी उत्पन्न बाजार समीती कार्यालयाच्या आवारासमोर दिनांक 18 मार्च 2018 रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास सुमारे अर्धा तास प्रचंड घोषणाबाजी केली.यानंतर युकॉंचे जिल्हा महासचिव सचिन किरपान यांच्या नेतृत्वात पालकमंत्री यांच्या पुतळयाचे दहन करण्यात आले.   
         याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की, रामटेक कृषी उत्पन्न बाजार समीतीचे मुख्यप्रशासक अनिल लक्ष्मणजी कोल्हे हे व्यवसायाने शिक्षक आहेत मात्र त्यांनी आपण शिक्षक असल्याची माहीती शासनाला सादर केलेल्या शपथपत्रातून लपविली व त्यामुळे त्यांची नियुक्ती मुख्यप्रशासक या पदावर करण्यांत आली.त्यांनी आपला धंदा शेती असल्याची अर्धसत्य माहीती देवून हे पद लाटले या प्रकरणाची चौकशी नागपुरचे जिल्हा उपनिबंधक यांचे आदेशानुसार रामटेकच्या सहायक निबंधक भारती काटुळे यांनी चौकशी केली व तसा अहवाल जिल्हाउपनिबंधक नागपुर यांना पाठविण्यांत आला मात्र कारवाई झाली नाही.एका संघटनेने यासाठी दोन दिवस आमरण उपोशनेही केले मात्र पारदर्षक कारभार असल्याचा दावा करनाऱ्या या राज्य सरकारने कोल्हे यांना हटविले नाही याप्रकरणी स्थानीक आमदार व पालकमंत्री कोल्हे यांना अभय देत असल्याचा आरोप किरपान यांनी यावेळी पत्रकारांशी बोलतांना केला.आम्ही पालकमंत्री यांना भेटण्यासाठी आलो होतो मात्र ते येणार नसल्याचे कळलेकदाचित आम्ही आंदोलन करणार हे कळल्याने ते आले नसावेत त्यामुळे आम्ही याठीकाणी त्यांच्या पुतळयाचे प्रतिकात्मक दहन करून निदर्षने केल्याचे किरपान यांनी यावेळी सांगीतले.
 रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीवर निवडणूक न घेता वारंवार प्रशासक मंडळ लादण्याचाही त्यांनी यावेळी निषेध केला.विद्यमान परीस्थितीत या भागातील शेतकरी अतिशय अडचणीत आहेत.त्यांना या सरकारने मदतीचा हात दिला पाहीजे मात्र हे सरकार शेतकऱ्यांना  न्याय देवू शकले नसल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.यावेळी सवश्री देवेंद्र डोंगरे,मनोज नौकरकर,चेतन ईखार,स्वप्नील श्रावणकर व संदीप ईनवाते यांचेसह रामटेक विधानसभा क्षेत्रांतील युवक कॉगेंसचे कार्यकर्ते हजर होते. 
 

रामटेक बाजार समितीचे मुख्यप्रशासक कोल्हेंची नियुक्ती रद्द करा

रामटेक बाजार समितीचे मुख्यप्रशासक कोल्हेंची नियुक्ती रद्द करा

पालकमंन्न्यांचा पुतळा जाळला


रामटेक तालुका प्रतिनिधी--नियमबाहय नियुक्ती रद्द झालीच पाहीजे,नही चलेगी....नही चलेगी तानाषाही नही चलेगी,पालकमंत्री मुर्दाबादच्या घोशणा देत रामटेक विधानसभा युवक काॅगेंसच्या कार्यकत्र्या ंनी रामटेकच्या कृशि उत्पन्न बाजार समीती कार्यालयाच्या आवारासमोर दिनांक 18 मार्च  2018 रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास सुमारे अर्धा तास प्रचंड घोशणाबाजी केली.यानंतर युकाॅंचे  जिल्हा महासचिव सचिन किरपान यांच्या न ेतृत्वात पालकमंत्री यांच्या पुतळयाचे दहन करण्यात आले याप्रकरणी सविस्तर वृत्त असे की, रामटेक कृशि उत्पन्न बाजार समीतीचे मुख्यप्रषासक अनिल लक्ष्मणजी कोल्हे हे व्यवसायाने षिक्षक आहेत मात्र त्यांनी आपण षिक्षक असल्याची माहीती षासनाला सादर केलेल्या षपथपत्रातून लपविली व त्यामुळे त्यांची नियुक्ती मुख्यप्रषासक या पदावर करण्यांत आली.त्यांनी आपला धंदा षेती असल्याची अर्धसत्य माहीती देवून हे पद लाटले या प्रकरणाची चैकषी नागपुरचे जिल्हा उपनिबंधक यांचे आदेषानुसार रामटेकच्या सहायक निबंधक भारती काटुळे यांनी चैकषी केली व तसा अहवाल जिल्हाउपनिबंधक नागपुर यांना पाठविण्यांत आला मात्र कारवाई झाली नाही.एका संघटनेने यासाठी दोन दिवस आमरण उपोशणही केले मात्र पारदर्षक कारभार असल्याचा दावा करणाÚया या राज्य सरकारने कोल्हे यांना हटविले नाही याप्रकरणी स्थानीक आमदार व पालकमंत्री कोल्हे यांना अभय देत असल्याचा आरोप किरपान यांनी यावेळी पत्रकारांषी बोलतांना केला.आम्ही पालकमंत्री यांना भेटण्यासाठी आलो होतो मात्र ते येणार नसल्याचे कळलेकदाचित आम्ही आंदोलन करणार हे कळल्याने ते आले नसावेत त्यामुळे आम्ही याठीकाणी त्यांच्या पुतळयाचे प्रतिकात्मक दहन करून निदर्षने केल्याचे किरपान यांनी यावेळी सांगीतले.रामटेक तालुका कृशि उत्पन्न बाजार समीतीवर निवडणूक न घेता वारंवार प्रषासक मंडळ लादण्याचाही त्यांनी यावेळी निशेध केला.विद्यमान परीस्थितीत या भागातील षेतकरी अतिषय अडचणीत आहेत.त्यांना या सरकारने मदतीचा हात दिला पाहीजे मात्र हे सरकार षेतकÚयांना न्याय देवू षकले नसल्याचा
आरोपही त्यांनी यावेळी केला.यावेळी सवश्री देवेंद्र डोंगर े,मनोज नौकरकर,चेतन ईखार,स्वप्नील श्रावणकर व संदीप ईनवाते यांचेसह रामटेक विधानसभा क्षेत्रांतील युवक काॅगेंसच े कार्यकर्ते हजर होते.
दिनदयाल थालीच्या माध्यमातून गरीबांसाठी पवित्र कार्य

दिनदयाल थालीच्या माध्यमातून गरीबांसाठी पवित्र कार्य

  •  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
  • मेयोत दिनदयाल थाली लोकार्पण कार्यक्रम
नागपूर, दि. 18 : पंडीत दिनदयाल उपाध्याय यांनी गरीबांच्या सेवेला इश्वराची सेवा मानली. अंत्योदयाचे व्रत त्यांनी दिले. एकात्म मानव दर्शन घडविले. मराठी नवर्षात श्री सालासर सेवा समितीच्या माध्यमातून मेयोमध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी नाममात्र शुल्क आकारुन दिनदयाल थालीच्या माध्यमातून पवित्र कार्य हाती घेण्यात आले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

आज (दि.18) इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे दिनदयाल थालीचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला, यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार सर्वश्री गिरीष व्यास, विकास कुंभारे, डॉ. मिलिंद माने, कृष्णा खोपडे, माजी मंत्री रमेश बंग, माजी महापौर प्रविण दटके, उपमहापौर दिपराज पारडीकर, संदीप जोशी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे यांची उपस्थिती होती.

समाजातील शेवटच्या घटकातील व्यक्तीच्या जीवनात परिवर्तन कसे करता येईल याचा ध्यास पंडीत दिनदयाल यांना होता, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, पिडीत, वंचीत व रुग्णांच्या नातेवाईकांना एक आधार म्हणून ही थाली सुरु केली आहे. नाममात्र दहा रुपये घेऊन रुग्णांच्या नातेवाईकांना पोटभर जेवण या थालीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. समितीने मोफत भोजन देण्याचा निर्णय घेतला होता. परंतु जे मोफत मिळत असते त्याचे महत्त्व नसते. समितीने निशुल्क भोजन न देता किंवा नफा न कमावता केवळ टोकण म्हणून नाममात्र शुल्क घ्यावेत अशी सूचना आपण समितीच्या पदाधिकाऱ्यांना सुरुवातीला भेटीप्रसंगी केली होती. त्यानुसार नाममात्र शुल्क आकारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

फडणवीस पुढे म्हणाले, यापूर्वी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दिनदयाल थाली सुरु करण्यात आली. आता मेयोत सुध्दा ही थाली सुरु करण्यात आली आहे. लवकरच डागा रुग्णालयात सुध्दा रुग्णांच्या नातेवाईकांसाठी दिनदयाल थाली ही व्यवस्था करण्यात येणार आहे. मेयोत येणाऱ्या रुग्णांसाठी सिटी स्कॅन व एमआरआयची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून निधीसुध्दा लवकरच देण्यात येईल. त्यामुळे इथल्या आरोग्य सेवेत मोठा बदल झालेला दिसेल, असे सांगून श्री. फडणवीस पुढे म्हणाले ही रुग्णालये गरीबांसाठी आश्रयस्थान आहे. मागील तीन वर्षात मेयोचा कायापालट करण्यात आला असून इथल्या विकासासाठी आपण प्रयत्नशिल असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) च्या अधिष्ठाता डॉ. अनुराधा श्रीखंडे यांनी मनोगत व्यक्त केले. प्रारंभी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिनदयाल थालीचा शुभारंभ करुन थालीचा आस्वाद घेतला. कार्यक्रमाला श्री सालासर सेवा समितीचे पदाधिकारी, मेयोचे विभाग प्रमुख, प्राध्यापक वर्ग, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, वैद्यकीय महाविद्यालयाचे विद्यार्थी व रुग्णांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री सालासर सेवा समितीचे राधेश्याम सारडा यांनी केले. संचालन दयाशंकर तिवारी यांनी केले. उपस्थितांचे आभार आमदार गिरीष व्यास यांनी मानले.

Saturday, March 17, 2018

जलसंपदा विभागाने केलेली पाण्याचे वाटप जलसंपत्ती प्राधिकरणाला अमान्य

जलसंपदा विभागाने केलेली पाण्याचे वाटप जलसंपत्ती प्राधिकरणाला अमान्य

आशिष जयस्वाल यांनीही घेतले आक्षेप 
नागपूर/प्रतिनिधी:
पेंच प्रकल्पाचे पाण्याचे घरघुती, औद्योगिक व सिंचन प्रवर्गात वाटप सूत्रानुसार करावे असे आदेश जलसंपदा विभागाला महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने दिले होते. त्यानुसार अधीक्षक अभियंता श्री इंगळे यांनी धरणाची साठवणूक क्षमता ९६५ द.ल.घ.मी. ग्राह्य धरून नागपूर शहरासाठी घरघुती वापरासाठी १३० द.ल.घ.मी. औद्योगिक प्रयोजनासाठी ८७ द.ल.घ.मी.व सिंचनासाठी ६५२ द.ल.घ.मी. पाण्याचा कोटा निश्चित केला व यावर्षी पाण्याची तूट असल्याने नागपूर शहराला ११४ द.ल.घ.मी., कोरडी व खापरखेडा ५५ द.ल.घ.मी.व सिंचनाला २८३ द.ल.घ.मी. पाणी असा पाणी वाटपाचा कोटा निश्चित केला. त्यानुसार नागपूर शहराच्या १९० द.ल.घ.मी.मागणीच्या तुलनेत ११४ द.ल.घ.मी. पाणी अनुज्ञेय केले. या आदेशात वापरलेले शब्द हे योग्य नसल्याचे सांगून प्राधिकरणाने स्थगित केले. ११४ द.ल.घ.मी. पाणी देखील निकषापेक्षा जास्त असल्याचे सांगून श्री.आशिष जयस्वाल यांनी या वाटपा वर हरकत घेतली व धरणाची साठवणूक क्षमता जरी ९६५ द.ल.घ.मी. असली तरी प्रत्यक्षात महाराष्ट्राचा पाण्याचा हक्क हा फक्त २५ TMC (700द.ल.घ.मी.) आहे. त्यामुळे १३० द.ल.घ.मी.घरघुती वापरासाठी ठेवता येत नाही तर १५ टक्के म्हणजे १०५ द.ल.घ.मी. हे हक्क महाराष्ट्राला २५ TMC पाणी मिळाल्यास देता येईल. मात्र जर तुटीचे वर्ष असेल तर ७०-८० द.ल.घ.मी. पेक्षा जास्त पाणी देता येत नाही, असा आक्षेप घेतला. 
तसेच नागपूर शहराला ३०० वर्ष झाली व १९८१ पासून पेंच प्रकल्पातून शहराला पाणी जात आहे. याचा अर्थ १९८१ पूर्वी असलेल्या सर्व स्रोतातून मिळणाऱ्या पाण्याचा विचार करावा व इतर सर्व नवीन स्रोत विचारात घेऊन फक्त वाढीव लोकसंख्येलाच पेंच प्रकल्पातून पाणी देता येईल, असा युक्तिवाद आशिष जयस्वाल यांनी केला. तसेच पेंच प्रकल्पातून महसूल पम्पिंग स्टेशन पर्यंत पाईप लाईन टाकल्याने वाचलेले ८१ द.ल.घ.मी. पाणी तसेच कोराडी खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पाला मनपाचे प्रक्रिया केलेले ४० द.ल.घ.मी. पाणी दिले जात असल्याने ठरल्याप्रमाणे ८१+४०=१२१ द.ल.घ.मी. पाणी सिंचनाला न देता नागपूर व कोराडी खापरखेडा जास्तीचे पाणी घेऊन शेतकऱ्यांचा हक्क डावलत असल्याचा मुद्दा आशिष जयस्वाल यांनी उपस्थित केला. त्यावर प्राधिकरणाने हे मुद्दे मान्य केले व यानुसार परत प्रत्येकाला त्याच्या हक्कानुसार पाणी वाटप करावे, अश्या सूचना दिल्या. त्याशिवाय शहराच्या लोकसंख्येमध्ये वेगवेगळे कॉलोनी च्या नावाने जास्तीचे पाणी साठवून ठेवल्याचे निदर्शनास आणून ही कॉलोनी शहराच्या अधिकृत लोकसंख्येचाच भाग असल्याचे स्पष्ट केले. 
प्राधिकरणाच्या आदेशापेक्षा जास्तीचे पाणी जर वापरले गेले असेल व शहरामध्ये पिण्याच्या नावाखाली घेतलेले पाणी लघु उद्योग व व्यावसायिक कामासाठी वापरले जात असल्याने याचा हिशोब करून दंडात्मक दराने वसुली करावी असे देखील प्राधिकरणाने निर्देश दिले. कोराडी व खापरखेडा औष्णिक वीज प्रकल्पाला देखील दिले जात असलेले पाणी प्राधिकरणाच्या सुत्रानुसारच देऊन कमी करावे व पुढील १० एप्रिल पर्यंत पुन्हा नव्याने सूत्रानुसार प्रत्येकाचे पाण्यावरील हक्क जाहीर करावे, असे प्राधिकरणाने सांगितले. त्यामुळे सूत्रानुसार पाणी वाटप झाल्यास शेतकऱ्यांना पुन्हा अधिकचा पाणी मिळेल व त्यांच्यावरील अन्याय दूर होईल, असा विश्वास आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला.
रामटेक  तालुकास्तरीय मुद्रा कर्ज मेळाव्यात 45 लाभार्थिंना 62 लक्ष 20 हजार रुपयांचे कर्जवाटप

रामटेक तालुकास्तरीय मुद्रा कर्ज मेळाव्यात 45 लाभार्थिंना 62 लक्ष 20 हजार रुपयांचे कर्जवाटप

खासदार तुमाने यांचे हस्ते धनादेशांचे वितरण
mudra loan के लिए इमेज परिणामरामटेक ( ललित कनोजे )-
प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत रामटेक तहसील कार्यालयात दिनांक 17 मार्च 2018 रोजी तालुकास्तरीय मुद्रा कर्ज मेळावा आयोजीत करण्यात आला होता.यावेळी रामटेक लोकसभा क्षेत्राचे खासदार कृपाल तुमाने यांचे हस्ते लाभार्थींना कर्ज रकमेचे धनादेश वितरीत करण्यात आले.यावेळी रामटेकचे तहसीलदार धर्मेश फुसाटे,गटविकास अधिकारी बाळासाहेब यावले,संबधित सर्व बॅंकाचे व्यवस्थापक हजर होते.रामटेक तालुक्यात मुद्रा कर्ज मेळावा अतिशय यशस्वी करण्यात आला.विविध बॅंकाच्या 12 शाखांनी 45 लाभार्थींची निवड केली होती या सर्वांना 62 लक्ष 20000 रुपयांचे धनादेश यावेळी वितरीत करण्यात आले.तहसिलदार यांनी पुढाकार घेत एवढ्या मोठ्या प्रमाणावर मुद्रा कर्ज योजनेअंतर्गत कर्जवाटप करण्यात आल्याचे फुसाटे यांनी सांगीतले.याच कार्यक्रमात राष्ट्रिय कुटूंब लाभ अर्थसहाय्य योजनेतील चार लाभार्थींना प्रत्येकी 20000 प्रमाणे 80 हजार  धनादेश देण्यात आले.
रामटेक बाजार समीतीच्या गोदामासह दुकानगाळयांचा लोकार्पण सोहळा रविवारी

रामटेक बाजार समीतीच्या गोदामासह दुकानगाळयांचा लोकार्पण सोहळा रविवारी

*पालकमंत्री येणार* आमदार केदारांना न बोलावल्याने समर्थक नाराज
रामटेक तालुका प्रतिनिधी:
मुख्य प्रशाकाच्या जागी अपात्र व्यक्तिची वर्णी लावल्याने आधीच चर्चेत असलेल्या रामटेक कृषी  उत्पन्न बाजार समीतीच्या वतीने नव्याने बांधण्यात आलेल्या गोदामासह दुकान गाळयांच्या दिनांक 18 मार्च 2018 रोजी होत असलेल्या लोकार्पण सोहळयालाही अपषकुन झाला आहे. उपरोक्त कार्यक्रमाला नागपुर जिल्हा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची उपस्थिती राहणार असून रामटेकचे आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी हे कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी राहतील.गोंडवाना गणतंत्र पक्षाचे राज्याध्यक्ष राजे वासुदेव शहा टेकाम,सहकार नेते श्रीराम आष्टणकर व माजी सभापती बालचंद बादुले हे यावेळी विशेष अतिथी म्हणूण हजर राहणार आहेत.हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता बाजार समीतीच्या नवनिर्मीत दुकान गाळे परीसरांत संपन्न होणार आहे.
रामटेक तालुका कृषी उत्पन्न बाजार समीतीची गेल्या 2014 पासून निवडणूक झालेली नाही.या बाजार समीतीचे 2014 साली विभाजन करून रामटेक व मौदा अशा दोन बाजार समीत्यांची निर्मीती करण्यात आली.रामटेकच्या बाजार समीतीवर बालचंद बादुले यांच्या नेतृत्वात अशासकीय प्रशासक मंडळ नेमण्यात आले.सरकारच्या या विभाजन प्रक्रियेला तत्कालीन सभापती लक्ष्मण उमाळे यांनी उच्च न्यायालयांत आव्हान दिले होते.उमाळे यांच्या याचीकेवर उच्च न्यायालयाने सरकारने केलेल विभाजन रद्द केले व पुन्हा एकदा ही बाजार समीती जैसे थे झाली.अविभाजित बाजार समीतीवर पुन्हा एकदा राज्य सरकारने अषासकीय प्रशासक मंडळाची नियुक्ती केली व बादुले यांचीच सभापतीपदावर वर्णी लावण्यांत आली.दरम्यान राज्य सरकारने पुन्हा या बाजार समीतीचे विभाजन केले व रामटेक मौदा अशा दोन बाजार समीत्या निर्माण केल्या.यावेळी मात्र अशासकीय प्रशासक मंडळाची नेमणूक करताना बादुले यांना संधी देण्यात आली नाही.रामटेकच्या आदर्श विद्यालयात शिक्षक असलेले अनिल कोल्हे यांना या बाजार समीतीचे मुख्यप्रशासक नेमण्यात आले.किशोर रहांगडाले हे उपमुख्यप्रशासक व अन्य 14 प्रषासकांची नियुक्ती करण्यात आली.या विभाजनालाही शेतकरी संघर्ष समीतीचे संयोजक सचिन किरपान यांनी उच्च न्यायालयांत आव्हान दिले आहे.सदर याचिका उच्च न्यायालयाच्या नागपुर खंडपीठांत प्रलंबित आहे.दरम्यान कोल्हे हे नोकरी करीत असल्याने ते या पदावर राहण्यास अपात्र आहेत व त्यांनी या पदावर नियुक्तीसाठी दिलेल्या शपथपत्रांत आपण शेतकरी असल्याचे नमूद करून शासनाची दिषाभूल केली असा आरोप दणका युवा संघटनेने केला व त्यांना पदावरून हटवावे व पोलीसांत गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.यासाठी दोन दिवस दणकाचे रामटेक तालुकाध्यक्ष अजय किरपान यांनी आमरण
उपोशण केले मात्र पंधरा दिवसांत कारवाई करू असे आश्वासन पालकमंत्री बावनकुळे यांनी दिल्याने हे उपोशण संपले.मात्र महीनाभरानंतरही कारवाई न झाल्याने पुन्हा उपोषण करण्याचा निर्धार अजय किरपान यांनी व्यक्त केला होता मात्र पालकमंत्री यांनी पुन्हा काही कालावधी द्यावा असे सांगीतल्याने उपोषण लांबणीवर टाकण्यात आल्याचे किरपान यांनी सांगीतले.
आज होत असलेल्या कार्यक्रमाला सहकार नेते व सावनेरचे आमदार सुनिल केदार यांना बोलविण्यांत न आल्याने त्यांचे समर्थक कमालीचे नाराज आहेत.रामटेक बाजार समीतीवर सातत्याने केदारांचा प्रभाव राहीला आहे व त्यामुळे त्यांना या कार्यक्रमाला बोलावणे  आवश्यक होते मात्र त्यांना बोलाविण्यांत आले नाही यावर त्यांचे समर्थक संतप्त झाले आहेत.सरकार व स्थानीक आमदारांची ही मनमानी असल्याचे अनेकांनी खाजगीत बोलतांना सांगीतले.केदारांना न बोलविण्यामागचे नेमके राजकारण कोणी व कषासाठी केले याविषयी अनेक प्रकारच्या चर्चा केल्या जात आहेत. याप्रकरणी ज्यांनी हे राजकारण केले त्यांना याची किंमत सव्याज चुकवावी लागेल असा  ईशारा शेतकरी संघर्ष समीतीचे संयोजक सचिन किरपान यांनी दिला आहे.
‘गोदामासह दुकान गाळे’ असे या कामाचे नाव आहे प्रत्यक्षात येथे 22 दुकान गाळे बांधण्यात आले आहेत.गोदामाचा मात्र पत्ता नाही याबद्दलही येथे अनेक प्रकारची चर्चा केली जात आहे.शेतकऱ्यांच्या  सोयाीसाठी येथे एकही गोदाम बाजार समीतीने अद्याप बांधले नाही मात्र दुकान गाळे बांधून त्यातून पैसा उभा करणे हा व्यापारी धंदा बाजार समीती करीत असल्याचे दिसून येते.प्राप्त माहीतीनुसार उपरोक्त दुकान गाळे हे बांधकामापुर्वीच लोकांना 30  वर्षासाठी  लिजवर देण्यात आले असे समजते व यासाठी प्रत्येकी 6 लक्ष रूपये बाजार समीतीच्या खजिन्यात जमा झालेत.या रकमेतूनच या 22 दुकानगाळयाचे बांधकाम फक्त 66 लक्ष रूपयांत करण्यात आल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.मग उर्वरीत रकमेत शेतकरी बांधवांच्या सोयाीसाठी गोदाम व निवास कां बांधण्यात आले नाही असा प्रश्न विचारला जात आहे.
प्रा. जैमिनी कडू  यांचे निधन

प्रा. जैमिनी कडू यांचे निधन

नागपूर - बहुजन चळवळीतील विचारवंत प्रा. जैमिनी कडू हे ओला कॅबने दिलेल्या धडकेत जखमी झाले होते. सोमवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास वर्धा मार्गावरील 'रेडिसन ब्लू' परिसरात हा अपघात घडला. या अपघातात कडू यांच्या डोक्याला व चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर त्यांना शहरातील ट्रामा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना न्यूरॉन रुग्णालयात हलविण्यात आले होते.
प्राध्यापक कडू हे सोमवारी रात्री स्वत:च्या दुचाकीने घराकडे जात होते. त्यावेळी हॉटेल रेडिसन ब्लू जवळआले असता, ओला कॅबने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्या धडकेने कडू हे जखमी झाले. त्यावर कॅब चालकाने तात्काळ त्यांना जवळच्या रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र, कडू यांची प्रकृती गंभीर दिसल्याने तेथील डॉक्टरांनी त्यांना दुसऱ्या रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. त्यानंतर त्या चालकाने कडू यांना न्यूरॉनमध्ये दाखल केले. मात्र आज त्यांचे निधन झाले.

Wednesday, March 14, 2018

जमिनीच्या वादातुन पोलीसाला मारहाण

जमिनीच्या वादातुन पोलीसाला मारहाण

आरोपींच्या विरूद्ध गुन्हा दाखल
पोलिसांना मारहाण साठी इमेज परिणामरामटेक तालुका प्रतिनिधी: 
रामटेक तालुक्यातील मौजा भंडारबोडी येथे शेतजमीनीची मोजणी करतेवेळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या पोलीस हेड काॅंस्टेबल संजय रामलाल तिवारी व त्यांच्यासोबतच्या महीला पोलीस कर्मचारी यांना आरोपींनी मारहाण केल्याची गंभीर घटना घडली.दिनांक 14 मार्च 2018 चे दुपारी 1.30 वाजता ही घटना घडली.
याप्रकरणी अधिक वृत्त असे की,भंडारबोडी येथील शेतजमीन मोजणी प्रकरणात रीतसर अर्ज व संबधित रकमेचा भरणा करुन पोलीस बंदोबस्ताची मागणी केली होती.सरकारी आदेशानुसार तिवारी व महीला पोलीस कर्मचारी भंडारबोडी येथे कर्तव्यावर हजर असतांना तिथे त्याच गावातील रामराव सोमा कुथे,इंदिरा कुथे,निर्मला नाकाडे,राजकुमार नाकाडे,अरुण नाकाडे व रंजना कुथे यांनी मोजणी करणारे कर्मचारी यांचेशी हुज्जत घातली.त्पामुळे तिवारी व त्यांच्या सहकारी पोलीस कर्मचारी यांनी त्यांना समजविण्याचा प्रयत्न केला मात्र ऊपरोक्त आरोपी हे काहीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.त्यंनी मध्यस्थी करीत समजूत घालण्याचा प्रयत्न करीत असलेल्या पोलीसांना मारहाण केली.
तिवारी यांचे तक्रारीवरुन आरोपींविरूद्ध भादंवी च्या 332,353 व 143 कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला व काही आरोपींना ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.पो.ऊपनिरीक्षक मल्हारी ताळीकोटे पुढील तपास करीत आहेत.
 आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याचे निधन

आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्याचे निधन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
सत्य शोधक समाजाचे जिल्हा महासचिव, भारीप बहुजन महासंघाचे जेष्ठ कार्यकर्ते, जेष्ठ विचारवंत, विदर्भ राज्य आंदोलन समितीचे कोअर कमिटी सदस्य, प्रा. डाॅ. एस. टी. चिकटे. यांचे आज हृदयविकाराने  निधन झाले.  ते 61 वर्षाचे होते. 15 /3/2018 गुरवारी सकाळी 11  वा. त्यांच्या पार्थीवावर अंत्यसंस्कार होणार आहे. त्याच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली, सुन,नातवंड व बराच मोठा परिवार आहे.

शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार:मुनगंटीवार

शिवसेना-भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार:मुनगंटीवार

मुंबई/काव्यशिल्प ऑनलाईन:
bjp shivsena साठी इमेज परिणाम
"शिवसेना आणि भाजप पुढच्या निवडणुका एकत्रच लढणार’, असा थेट दावा राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेतच केला आहे.‘शिवसेनेच्या मुखपत्रात काय छापून येतं याकडे लक्ष देऊ नका. पण पुढची निवडणूक सेना - भाजप एकत्र लढणार.’ असा दावा मुनगंटीवार यांनी विरोधकांना उद्देशून केला.‘उत्तरप्रदेश पोटनिवडणुकीच्या निकालानंतर विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काहींना तर मंत्री बनण्याची घाई झाली आहे. मात्र पुन्हा सत्ता आमचीच येणार.’ असा टोला त्यांनी विरोधकांना हाणला,आमच्यात किती ही वाद झाले तरी आमचे आमही बघून घेऊ . काँग्रेस-राष्ट्रवादी 1999 मध्ये असेच भांडले आणि नंतर एकत्र झाले होते. आता तुम्हाला एकमेकांची गरज असल्याने एकत्र आलात त्यामुळे आम्हीही वेगळं न लढता एकत्र येऊ.’ असा विश्वास मुनगंटीवार यांनी सभागृहात विरोधकांना प्रत्युत्तर देताना व्यक्त केला.
एकीकडे शिवसेनेनं 2019 लोकसभा आणि विधानसभा स्वबळावर लढवण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वीच जाहीर केला होता. अशावेळी मुनगंटीवार यांनी थेट सभागृहात आपण एकत्र लढणार असल्याचं म्हटल्याने राजकीय वर्तुळात नव्या चर्चेला तोंड फुटलं आहे. त्यामुळे शिवसेना आता नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.
नवरगाव परिसरात वाघाची दहशद कायम;RFO फोनच उचलेना

नवरगाव परिसरात वाघाची दहशद कायम;RFO फोनच उचलेना

tiger साठी इमेज परिणामनवरगाव/प्रतिनिधी:
गिरगाव व नवरगाव वनविभागाच्या तळोधी व सिन्देवाही वनपरिक्षेत्राच्या हद्य निश्चित करणाच्या परिसरात 5 वाघ कॅमेरात कैद झाले असून यात एक वाघीण व चार बछडे असल्याची सिंदेवाही वनपरिक्षेत्राधिकारी गौंड यांची माहीती शनिवारला दिली होती.
     मागील सहा दिवसापासून होत असलेल्या वाघाच्या घटनाक्रमात मात्र तळोधी वनपरिक्षेत्राधिकारी पत्रकाराचा फोन उचलण्यास टाळाटाळ करीत असल्याने घटनेच्या घडामोडी कशा कळणार , जनतेच्या वाघासंदर्भातील घटनेबाबत त्यांचे पर्यत माहीती कशी पोहचणार ही समस्या उद्भवली आहे. घटनाक्रमाच्या दिवसात एकदाही फोन उचललेला नाही. त्यामुळे त्या परिसरातील घटनेच्या विविध बाबीची माहीती कळू न शकल्याने   पुण्यनगरी प्रतिनिधी अमर बुध्दारपवार यांनी भ्रमनध्वनीवर संपर्क साधून सदर तळोधी क्षेत्राधिकारी सोनटक्के यां भ्रमनध्वनी उचलत नसल्या संदर्थात वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना माहीती सांगितली.राज्याचे वनमंत्री सुधिरभाऊ मुनगंटीवार फोन उचलतात. वनपरिक्षेत्राधिकारी ह्या पत्रकाराचे फोन न उचलण्याचे कारण अजुनही कळले नाही. पत्रकाराविषयी यांना अॅलर्जी का ? 
तळोधी आरएफओ सोनटक्के मॅडम यांना घटनाक्रम विचारण्यासाठी ६ दिवसापासून कित्येकदा कॉल करूनही फोन उचलत नसल्याचे वनमंत्री यांना भ्रमनध्वनीवर कळविण्यात आल्यानंतर घटनेचे गांभिर्य लक्षात घेत मंत्रालय प्रतिनिधींनी या संदर्थात सीसीएफ यांना तळोधी क्षेत्राधिकारीची तक्रार सांगितले असल्याचे सदर प्रतिनिधी अमर बुध्दारपवार यांना भ्रमनध्वनीवर कळविण्यात आले.
“कळी उमलतांना” कार्यक्रमातून ३०० मुलींशी आरोग्यविषयक संवाद

“कळी उमलतांना” कार्यक्रमातून ३०० मुलींशी आरोग्यविषयक संवाद

महानिर्मितीचा स्तुत्य उपक्रम
कोराडी/प्रतिनिधी: 
मुलींना शारीरिक वाढ, पाळी व अनुषंगिक ज्ञान हे सहसा आईकडून मिळते किंवा अर्धवट ज्ञान मैत्रिणी किंवा वेग
वेगळ्या माध्यमांतून मिळते. अनेकवेळा गैरसमजातून दुष्परिणामाचे प्रसंग व पर्यायाने आरोग्यविषयक तक्रारी देखील उद्भवतात त्यामुळे प्रत्येक मुलीला याबाबत वैद्यकीय ज्ञान असणे गरजेचे असल्याचे  मत डॉ. माया ब्राम्हणे यांनी व्यक्त केले.  कोराडी वीज केंद्राच्या विद्युत विहार वसाहतीतील क्लब नंबर एक येथे जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित ‘कळी उमलताना’ या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.  
मंचावर  स्त्रीरोग तज्ञ डॉ.माया ब्राम्हणे, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक संगीता बोधलकर, अधीक्षक अभियंते  श्याम राठोड, संजय रहाटे, प्रागतिक विद्यालयाचे मुख्याद्यापक शेंडवारे विशेषत्वाने उपस्थित होते.  अध्यक्षस्थान मुख्य अभियंता अभय हरणे यांनी भूषविले. 
याप्रसंगी डॉ. माया ब्राम्हणे म्हणाल्या कि, मुलींच्या शरीराची अंतर्गत रचना, वयात येताना शरीरात होणारे बदल, पाळीच्या संबंधातील सर्व प्रकारचे त्रास,स्वभाव व आवाजातील बदल,विकार, सॅनेटरी नॅपकीनची माहिती-वापर, स्वच्छता, पोषक आहार, प्रसूती, वयोपरत्वे येणारे आरोग्यविषयक प्रश्न याबाबत प्रत्येक मुलीला माहिती असणे गरजेचे आहे. डॉ.ब्राम्हणे यांनी याप्रसंगी उपस्थित मुलींशी खाजगी आरोग्यविषयक चर्चा केली. विशेष म्हणजे मुलींनी देखील मनमोकळेपणाने प्रश्न विचारून शास्त्रीय माहिती जाणून घेतली व गैरसमज दूर करून घेतले. वयात येणाऱ्या प्रत्येक मुलीला शारीरिक वाढ, होणारे बदल, लैंगिक शिक्षण याची वैद्यकीय माहिती देण्यासाठी महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक विद्युत केंद्राने सामाजिक बांधिलकीच्या नात्याने खास स्त्री रोगतज्ञ डॉ. माया ब्राम्हणे यांना बोलविण्यात आले होते. कोराडी येथील प्रागतिक विद्यालय व विद्यामंदिर शाळेच्या  सातवी ते नववीच्या सुमारे ३००  विद्यार्थिनींनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला. 
अध्यक्षीय भाषणातून अभय हरणे म्हणाले कि, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विकासात्मक उपक्रम घेऊन येथील रहिवाश्यांचा जीवनस्तर उंचावण्यासाठी कोराडी वीज केंद्र सातत्याने प्रयत्नशील आहे व त्यासाठी महानिर्मिती कटिबद्ध आहे.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन विद्या सोरते यांनी केले. 
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्कृती राहाटे,अरुणा भेंडेकर,सीमा शंखपाळे, प्रांजली कुबडे, विद्या मंदिर व  प्रागतिक विद्यालयाचे महिला कर्मचारीवृंद, कल्याण अधिकारी प्रसाद निकम, प्रवीण बुटे, समाधान पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले.  
रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) चे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन

चंद्रपूर/प्रतिनिधी:
विविध मागण्यांना घेऊन आज रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. त्रिपुरा येथील क्रांतिकारक लेनिन यांच्या पुतळ्याची विटंबना, मेरठ मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना व तामिळनाडू येथील पेरियार स्वामी नायकर यांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या समाज कंटकांना त्वरित अटक काण्यात यावी. भीमा कोरेगाव येथे जातीय दंगल घडविणाऱ्या संभाजी भिडे व मिलिंद एकबोटे यांना तात्काळ अटक करावी, राज्यातील शेतकऱ्यांचे कर्ज बिनशर्त माफ करण्यात यावे, शासकीय कार्यालयातील नोकरभरती ठेकेदारी पद्धतीने बंद करण्यात यावी,पेट्रोल डिझेल वर जीएसटी लागू करण्यात यावी,वीज बिलातील विजेशिवाय इतर आकारणी कमी करण्यात यावी.चार वर्षांपासून बंद केलेली विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती पुन्हा सुरु करण्यात यावी. यासह इतर विविध मागण्यांना घेऊन आज  रिपब्लिकन पक्ष (खोरिपा) च्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या धरणे आंदोलनात देशक खोब्रागडे, सत्यजित खोब्रागडे, जीवन बागडे,संतोष रामटेके यांच्या सह इतर नागरिकांची उपस्थिती होती. यावेळी आंदोलनकर्त्या शिष्टमंडळांनी जिल्ह्याधिकाऱ्यांची भेट घेत त्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
पोलीस भरती उमेदवारांकरीता महत्वाच्या सुचना

पोलीस भरती उमेदवारांकरीता महत्वाच्या सुचना

police bharti chandrapur साठी इमेज परिणाम
चंद्रपूर/प्रतिनिधी:

चंद्रपुर जिल्हा पोलीस भरती प्रक्रिया दिनांक 08/03/2018 रोजी पासुन पोलीस मुख्यालय येथे सुरू आहे. दिनांक 08/03/2018 ते दिनांक 14/03/2018 पावेतो मैदानी चाचणीकरीता पात्र
उमेदवारांचे नांव, गुण, जन्मतारीख, जात प्रवर्ग व समांतर आरक्षण याबाबत माहिती प्रसिध्द करण्यात येत आहे. याबाबत काही आक्षेप असल्यास दिनांक 17/03/2018 रोजी सांयकाळी 05ः00 वाजता पर्यंत पोलीस अधीक्षक चंद्रपुर यांना पोलीस मुख्यालय चंद्रपुर येथे समक्ष भेटावे. यानंतर येणारे आक्षेप
विचारात घेतले जाणार नाहीत व मैदानी चाचणीचे गुणांसह प्रसिध्द केलेली माहिती बरोबर असल्याचे गृहित धरल्या जाईल याबाबत सर्व उमेदवारांनी नोंद घ्यावी.
पेंच व्याघ्र प्रकल्पातील त्या 16 आरोपींची धरपकड सुरू,एकास अटक

पेंच व्याघ्र प्रकल्पातील त्या 16 आरोपींची धरपकड सुरू,एकास अटक

वाघ शिकार पेंच साठी इमेज परिणामरामटेक तालुका प्रतिनिधी:
पेंच व्याघ्र प्रकल्पक्षेत्रांत वाघांच्या शिकारप्रकरणातील त्या 16 आरोपींना गजाआड करण्याची मोहीम वन्यजिव विभागाने हाती घेतली आहे.दिनांक 13 मार्च 2018 रोजी यापैकी एका आरोपीस पकडण्यात आल्याचे याप्रकरणाचे तपास अधिकारी वनक्षेत्रपाल पांडुरग पाखले यांनी सांगीतले.
भीमराव परतेती असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव असुन तो कोलीतमारा येथील रहिवासी आहे.मध्यप्रदेशातील खमारपाणी जवळच्या सालई येथून परतेती यांना पाखले यांच्या नेतृत्वातील चमुने पकडले.अन्य 15 आरोपींचा सर्वत्र शोध घेतला जात आहे.
    ऊपरोक्त शिकार प्रकरणात एकूण 17 आरोपींना अटक करण्यात आली होती.यातील महादेव ऊईके या आरोपीने वनकोठडीतून पलायन केले होते व आठवडाभरानंतर त्यांचा मृतदेह ढवळापूरच्या जंगलात सापडला होता.त्यांच्या मृत्यूप्रकरणाने या भागातील आदीवासींनी वन्यजिव विभागाच्या विरोधात प्रचंड रोष व्यक्त करीत निदर्शनेही केली होती.तपास अधिकारी एसीएफ गीता नन्नावरे व वनक्षेत्रपालद्वय निलेश गावंडे ,पांडूरंग पाखले यांचेवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवावा अशी मागणी करण्यात आली होती.राज्यभर हे प्रकरण गाजले होते.
रामटेकच्या प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांनी या शिकार प्रकरणातील आरोपींची जामीनावर मुक्तता केली होती.मात्र त्यास वन्यजिव विभागाने जिल्हा सत्र न्यायालय व नागपुर ऊच्च न्यायालयात आव्हान दिले होते.ऊच्च न्यायालयाने या सर्व 16 आरोपींचा जामीन रद्द केला व सर्वांचे विरूद्ध गैरजमानती वारंट जारी केल्याने वन्यजिव विभागाने पुन्हा या आरोपींची धरपकड सुरु केली आहे.
दरम्यानच्या काळांत पाखले तीन महीने प्रशिक्षणासाठी गेले होते व गावंडे याची नागपूर प्रादेशिक वनविभागात बदली करण्यात आल्याने हे प्रकरण थंडावले होते.पाखले हे प्रशिक्षण आटोपून परत आपल्या पदावर रूजू झाल्याने याप्रकरणी नव्याने गती आली आहे.
मनपाचा ४०२ कोटींचा अर्थसंकल्प;विरोधकांचा आक्षेप

मनपाचा ४०२ कोटींचा अर्थसंकल्प;विरोधकांचा आक्षेप

chandrapur municipal corporation images building साठी इमेज परिणामचंद्रपूर/प्रतिनिधी:
२०१८-१९ या वर्षासाठी मनपाचा ४०२ कोटींचा वार्षिक अर्थसंकल्प आयुक्त संजय काकडे यांनी स्थायी समितीला मंगळवारी सादर केला. यात २०.३५ कोटींच्या अतिरीक्त नाविण्यपूर्ण कामांची शिफारस करून स्थायी समितीने मंजुरी प्रदान केली. हा अर्थसंकल्प मंजूरीसाठी सर्वसाधारण सभेत ठेवण्यात येणार असला तरी याला विरोधकांनी आक्षेप नोंदविला आहे.
आयुक्त काकडे यांनी सादर केलेल्या ४०२ कोटींच्या अर्थसंकल्पात १ कोटी रुपयांची मनपाची बचत दाखविण्यात आली आहे. तर संपती करासहीत अन्य कराच्या माध्यमातून ५८.२३ कोटी रुपये महसूल मिळणे अपेक्षित असून २३९ कोटी रूपये सरकारकडून अनुदान स्वरूपात अपेक्षित असल्याची माहिती मनपाचे स्थायी समिती सभापती राहुल पावडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी महापौर अंजली घोटेकर, उपमहापौर अनिल फुलझेले, सभागृह नेता वसंता देशमुख, अतिरिक्त आयुक्त भालचंद्र बेहरे, उपायुक्त विजय देवळीकर, मुख्य वित्त अधिकारी गजानन बोखडे आदी उपस्थित होते.
माहिती देताना राहुल पावडे म्हणाले, मनपा अर्थसंकल्पात पालकमंत्री प्रशिक्षण कार्यक्रमासाठी १५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात एमपीएससी व अन्य स्पर्धा परीक्षेची तयारी करणाºयांना मदत केली जाणार आहे. शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी महिला व पुरूषांसाठी अत्याधुनिक पद्धतीचे शौचालय बांधकाम करण्यात येणार असून यासाठी ३० लाख रुपये तर पालकमंत्री धनलक्ष्मी योजने अंतर्गत ‘सब पढे, सब बढे’, ‘स्कूल चले हम’ मिशन, पालकमंत्री शुध्द पेयजल व शिष्यवृत्ती योजनेसाठी ५० लाखांची तरतूद करण्याची शिफारस करण्यात आली आहे. महिला बचत गटांसाठी रोजगार संमेलन व मंच स्थापित करण्यासाठी ३० लाख, कर्मचाºयांच्या प्रशिक्षणासाठी १० लाख, शहरातील मटन, मच्छी, चिकन मार्केटच्या विकासासाठी १ कोटी, कांजी हाऊससाठी ५० लाख, महत्त्वपूर्ण मोठे पूल बांधण्यासाठी १ कोटी, आरोग्य केंद्राच्या विकासासाठी १ कोटी, मनपा पदाधिकारी व नगरसेवकांना प्रशिक्षण अभ्यास दौºयासाठी ३० लाख, मनपा झोन कार्यालयाच्या अत्याधुनिकीकरणासाठी ५० लाख रूपयांची तरतूद अर्थसंकल्पात असल्याची माहिती सभापती पावडे यांनी दिली.
ऐतिहासिक संग्रहालय उभारणीसाठी २० लाख, स्वर्गरथ वाहनाच्या खरेदीसाठी १५ लाख, सराई मार्केट विकासासाठी ७ कोटी, मनपा कामकाजाची माहिती पुस्तिका छपाईसाठी ५ लाख, महापुरूषांच्या पुतळ्यांचे सौंदर्यीकरण करण्यासाठी ३० लाख, मनपाच्या योजनांचा प्रचार, प्रसारासाठी ३० लाख, मनपा क्षेत्रात सामाजिक कार्य करणाऱ्या नागरिकांना सन्मानित करण्यासाठी १० लाख, समाज प्रबोधन संमेलनासाठी १० लाख, स्पर्धा परीक्षा केंद्राची स्थापना करण्यासाठी १० लाख, विद्यार्थिनींना सॅनेटरी नॅपकिन वितरीत करण्यासाठी १० लाख, कला क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी १० लाख, महिलांनी सुचविलेल्या नाविन्यपूर्ण कामाकरिता ५० लाख, महापौर, सभापती जनता दरबार कार्यक्रमासाठी ५ लाख, दिव्यांगाचे विवाह संमेलन आयोजनासाठी ३० लाख तसेच शहरातील चार चौकांचे सौंदर्यीकरणासाठी ७० लाख रूपये अशा २०.३५ कोटींच्या कामांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आल्याचे सभापती पावडे यांनी सांगितले.
पदाधिकाऱ्यांनाही खर्चासाठी तरतूद
अर्थसंकल्पात महापौर, सभापती यांच्या आकस्मिक खर्चासाठी ५० लाख, मनपा पदाधिकारी आकस्मिक खर्चासाठी १० लाख, मनपा आपत्कालीन खर्चासाठी १० लाख, महापौर, सभापती सहायता कल्याण निधीसाठी १० लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. याबाबत माध्यमांनी प्रश्न उपस्थित केला असता, राहुल पावडे यांनी आपत्कालीन खर्च गरजूंना मदतीसाठी ठेवण्यात आला आहे. अनेकदा मदतीची इच्छा असतानाही आर्थिक तरतूद नसते, असे सांगितले.
महिलांना कराटे व ड्रायव्हिंग प्रशिक्षण
महापौर तेजस्वी अभियानासाठी ५० लाख रुपयांची शिफारस स्थायी समितीने केली आहे. या निधीतून शहरातील युवती व महिलांना आत्मरक्षणासाठी कराटे प्रशिक्षण तसेच ड्रायव्हींग प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
महापौर तक्रार निवारण केंद्राची उभारणी
मनपा अर्थसंकल्पात महापौर तक्रार निवारण केंद्रासाठी २५ लाखांची शिफारस करण्यात आली आहे. या केंद्रात नागरिकांच्या तक्रारी जाणून घेत त्या लवकर सोडविण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहे. या केंद्राच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्यांचा लवकर निपटारा होण्यास मदत होईल, असे पावडे यांनी म्हटले.

कोणत्याही नगरसेवकांच्या सूचना, दुरूस्ती ऐकून न घेता आयुक्तांनी स्थायी समितीत बजेट सादर केला. राष्ट्रीय लेखा संहिता पद्धतीने बजेट सादर होणे आवश्यक असताना याकडे दुर्लक्ष करण्यात आले. बजेटमध्ये अनेक चुका व घोळ असून यावर आपला आक्षेप आहे.
- नंदू नागरकर, नगरसेवक तथा माजी स्थायी समिती सभापती.
जिल्हा प्रशासनाच्या ‘शोध नाविन्याचा’ स्पर्धेचा शुभारंभ

जिल्हा प्रशासनाच्या ‘शोध नाविन्याचा’ स्पर्धेचा शुभारंभ

चंद्रपूर/प्रतिनिधी:
राज्याचे वित्त, नियोजन व वनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या मार्गदर्शनात जिल्हाधिकारी कार्यालयाने ‘खोज’ अर्थात ‘शोध नाविन्याचा’ या अभिनव स्पर्धेला प्रारंभ केला आहे. यासाठी कल्पक संकल्पना पाठविण्याचे आवाहन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे.
शेती, उपजिवीका विकास, पर्यटन विकास व प्रशासन प्रक्रियेतील सुधारणा संदर्भात नागरिकांच्या भन्नाट आयडीया ३१ मार्चपर्यंत जिल्हा प्रशासनाने मागितल्या आहेत. आॅफलाईन, आॅनलाईन पद्धतीने या स्पर्धेत सहभागी होता येणार असून सेतू केंद्र ते ग्रामपंचायत येथे या संदर्भातील अर्ज उपलब्ध करण्यात आले आहेत.
ग्रामीण व शहरी भागातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाºया नागरिकांकडे अनेक कल्पकता असते. काही प्रयोग त्यांनी स्वत:च्या अनुभवातून सिध्द केले असतात. तर अनेकांना आपल्याकडे सत्ता, प्रशासकीय अधिकार असते तर, असे बदल केले असते, एका दिवसात सगळं बदलून टाकलं असतं, अशी महत्त्वाकांक्षा असते. अशा स्वानुभवातून केलेल्या प्रयोगांना किंवा अफलातून सूचनांना थेट प्रशासनात अंमलात आणण्याचे धाडस जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी दाखविले ‘हॅलो चांदा’ नंतर एका नव्या संकल्पाच्या उत्सवाला जिल्हयात सुरुवात झाली आहे. यासाठी १ लाख २ हजार रुपयांच्या रोख पुरस्काराचे नियोजन असून एका विशेष कार्यक्रमात  हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. यासाठी आॅनलाईन अर्ज करता येणार आहेत. याशिवाय अधिक माहितीसाठी हॅलो चांदा १८००-२६६-४४०१ या टोल फ्री क्रमांकावरही माहिती घेता येणार आहे. मंगळवारी जिल्हा प्रशासनाने जिल्हाभरात फिरण्यासाठी तयार केलेल्या चित्ररथाला जिल्हाधिकारी आशुतोष सलिल यांनी हिरवी झेंडी दाखवली.

Monday, March 12, 2018

हुक्का पार्लरवर छापा

हुक्का पार्लरवर छापा

नागपूर/प्रतिनिधी:
Raid on Hukka Parlors in Yashodharnagar, Nagpur |  नागपूरच्या  यशोधरानगरातील हुक्का पार्लरवर कारवाई
यशोधरानगरातील एका इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर सुरू असलेल्या हुक्का पार्लरमध्ये छापा घालून पोलिसांनी तेथून ३८ जणांना अटक केली. रविवारी पहाटेला डीसीपी सुहास बावचे यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधरानगरचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कामगिरी बजावली.या परिसरात एक व्यक्ती  हुक्का पार्लर चालवीत असल्याची माहिती पोलिसांना रविवारी पहाटे मिळाली. तेथे मोठ्या संख्येत हुक्का शौकिन बसून धूर उडवत असल्याचेही पोलिसांना समजले. 
                        त्यावरून डीसीपी बावचे यांनी यशोधरानगर पोलिसांना सोबत घेऊन पार्लरवर छापा घातला. तेथे सुमारे ३८ जण हुक्क्याचा धूर उडवताना आढळले. पोलिसांनी त्यांना तसेच हुक्का पार्लरच्या खाली असलेल्या तीन कार, दोन डझनपेक्षा जास्त दुचाकी आणि हुक्क्यासह सुमारे २७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला.


सहावीच्या विद्यार्थिनीला शिक्षिकेची मारहाण

सहावीच्या विद्यार्थिनीला शिक्षिकेची मारहाण

मीरारोड(ऑनलाईन काव्यशिल्प ):
The teacher was assaulted by a sixth student as he did not give up on math solving | गणित सोडवताना हाच्चा दिला नाही म्हणून सहावीच्या विद्यार्थिनीला शिक्षिकेची मारहाण
 मीरा भार्इंदर महापालिकेच्या मुर्धा गावातील मराठी शाळेत एका सहावीच्या विद्यार्थीनीने हाच्चा दिला नाही म्हणून शिक्षिकेने काठीने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी भार्इंदर पोलिसांनी शिक्षिकेविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.
मुर्धा गावात महापालिकेची मराठी शाळा असून सदर शाळेत शिकणारी ११ वर्षाची विद्यार्थिनी ही ६ वी इयत्तेत शिकते. सकाळी ११ ते सायंकाळी ५ अशी शाळेची वेळ आहे. आज सोमवारी नेहमीप्रमाणे ही विद्यार्थीनी शाळेत गेली. दुपारी वर्ग शिक्षिका सायली पिंपळे या गणिताची चाचणी घेत होत्या. त्यावेळी फळ्यावर गणित सोडवण्यास सदर विद्यार्थिनीस सांगितले असता भागाकार करताना हाच्चा लिहायाचे राहिले जेणे करुन संपूर्ण गणित चुकले. याने संतप्त झालेल्या पिंपळे यांनी काठी विद्यार्थिनीच्या दंडावर जोरात मारली. तसेच तिच्या डोक्यावर देखील मारहाण केली.
शाळा सुटेपर्यंत ती विद्यार्थिनी वर्गात हात दुखत असताना देखील तशीच बसून होती. तिच्या दंडावर मारहाणीमुळे मोठा व्रण आला होता. सायंकाळी शाळा सुटल्यावर मुलगी घरी गेली असता घडला प्रकार आईला कळला. अखेर पालकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा नोंदवला आहे. त्या शिक्षिकेस आम्ही पोलीस ठाण्यात बोलावले असून चौकशीनंतर पुढील कार्यवाहीचे ठरेल असे पोलीस सुत्रांनी सांगितले.
पद्मशाली समाजाला एसबीसी आरक्षनाचा पूर्ण लाभ मिळावा-पद्मशाली फॉउंडेशन ची मागणी

पद्मशाली समाजाला एसबीसी आरक्षनाचा पूर्ण लाभ मिळावा-पद्मशाली फॉउंडेशन ची मागणी

समाज प्रबोधन मिळावे घेवून करणार जन जागृती;शासनाला देणार निवेदन
 सावली
(प्रतिनिधी):
पद्मशाली समाज एसबीसी प्रवर्गात मधे असूनही आज इंजीनियरिंग व डॉक्टर साठी आरक्षणाचा  2 %लाभ हा मिळत नाही त्यामुळे आराक्षनाचा पूर्ण लाभ मिळावा अशी मागणी पद्मशाली फॉउंडेशन च्या वतीने शासनाला केली आहे.
समाज  एक संघटित होवून समाज एकत्रित करण्यासाठी व आरक्षण ची आवश्यकता का? ही भूमिका समाजाला समजावून सांगण्यासाठी पुढील महिन्यापासुन पद्मशाली फॉउंडेशन तर्फे तालुका व जिल्हा स्तरावर समाज प्रबोधन मिळावे आयोजित करण्यात येणार आहे व  त्यानंतर आंदोलनात्मक भूमिका घेणाऱ्या समाजसेवकांच्या पाठीशी खंबीर उभे राहु असे आज संपन्न झालेल्या सभेमधे ठरविन्यात आले.
दिनांक ११ मार्च  ला सावली येथील अमोल नाडमवार यांच्या कार्यालयात पद्मशाली फाउंडेशनची सभा घेण्यात आली.प्रारंभी सभेची सुरुवात महामुनी मार्कडेश्वर ऋषि यांच्या प्रतिमेला पुष्पांजली व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. पद्मशाली फाउंडेशन चे संचालक स्व.अमोल कोंडबतुनवार यांना श्रदांजली वाहन्यात आली.  या सभेच्या अध्यक्षस्थानी पद्मशाली फॉउंडेशन चे अध्यक्ष सुरज बोम्मावार होते.यावेळी उपाध्यक्ष लोकेश परसावार,सचिव किशोर आंनदवार,सहसचिव साई अल्लेवार,कोषाध्यक्ष संतोष गोटमुकुलवार,डॉ. बंडू आकनुरवार,सुभाष कुर्रेवार,तुलसीदास तुम्मे यांचा सह इतर संचालक उपस्तित होते. प्रास्ताविक करतांना फाउंडेशनचे सचिव किशोर आनंदवार यांनी फॉउंडेशनचे कार्य व सभेची आवश्यकता व पुढील कार्यक्रमाची रूपरेषा सांगितले. संचालक डॉ. बंडू आकनुरवार यांनी 2 टक्के आरक्षण व पुणे येथील धरणे आंदोलन याबाबत सविस्तर माहिती दिली. विषयवार सविस्तर चर्चा करून,एसबीसी आरक्षण विषयी समाज जनजागृती व  दोन दिवसीय अखिल भारतीय वधुवर परीचय,विवाह व समाज मेळावा दिनांक 5व6जानेवारी 2019ला चंद्रपूर येथे आयोजित करण्याचे ठरविन्यात आले. त्यात पहिल्या दिवशी सर्व क्षेत्रातील गुणवंत चा सत्कार, समाज प्रबोधन कार्यक्रम,विद्यार्थी वर्गाला मार्गदर्शन व सांस्कृतिक कार्यक्रम घेणे व दुस-या दिवशी परिचय व सामूहिक विवाह मेळावा घेण्याचे ठरविण्यात आले. 
                            त्याचप्रमाणे प्रत्येक तालुक्यात जाऊन आरक्षण बाबत जनजागृती व प्रबोधन मेळावे आयोजित करणे,व्यक्तिमत्व विकास तसेच स्पर्धा परीक्षा  ची तयारी साठी विद्यार्थीयांना योग्य व्यक्तीची निवड करून मार्गदर्शन करणे गरजू विद्यार्थी व समाजातील लोकांना मदत करणे, विद्यार्थी सत्कार,  इतर विषयावर चर्चा करण्यात आली.या कार्यक्रमात स्टॉप सिलेक्शन कमीशन तर्फे पोलिस उपनिरीक्षक पदी निवड झालेल्या मुकेश दिवाकर मुळेवार, एसबीसी संघर्ष विदर्भ उपाध्यक्ष पदी निवड झालेल्या डॉ. बंडू आकनुरवार ,यवतमाल जिल्हा पद्मशाली समाज अध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल सुभाष कुरेवार यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन पद्मशाली फॉउंडेशन चे कोषाध्यक्ष संतोष गोटमुकूलवार यांनी तर आभार  पद्मशाली फाउंडेशन  उपाध्यक्ष लोकेश परसावार यांनी मानले. या सभेला विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यातील व तालुक्यातील पद्मशाली फॉउंडेशन चे संचालक उपस्तित होते.  वंदेमातरम गीत घेऊन कार्यक्रमाची व सभेची सांगता करण्यात आली.

आणखी एका वाघाचा मृत्यू

आणखी एका वाघाचा मृत्यू

रामटेक ( तालूका प्रतिनीधी):
पेंच व्याघ्र प्रकल्पातील पुर्व पेंच वनपरिक्षेञातील गाभा क्षेञात वाघाच्या चार महीने वयाच्या छावाचा मृतदेह आढळुन अाल्याने प्रकल्प व्यवस्थापनात चांगलीच खळबळ उडाली .
हा छावा काही दिवसांपूर्वी गस्तीवरील वनकर्मचार्‍यांना एकांतात दिसुन अाला होता. आईने त्याला सोडल्याने अशक्त होऊन अंत झाल्याची चर्चा अाहे .या छावाच्या मृत्यूने माञ पेंच व्याघ्र प्रकल्पातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले. 
माञ , राञी उशिरा प्राप्त झालेल्या वनविभागाच्या प्रसिध्दीपञानुसार हा छावा आईपासून वेगळा झाला होता . तो खात पित नव्हता त्याला खाद्यान्न पुरविण्यात अाले .हालचाली व्यवस्थित होत्या .परंतु ९ मार्चनतंर त्याची हालचाल थांबली आॅनकॅमेरा वनाधिकारी , कर्मचार्‍यांनी राबविण्यात अालेल्या या मोहिमेनंतर तो मृत अाढळल्या अाजुबाजूच्या परिसरात काही गायींचाही मृत्यू झाल्याचे दिसले . हा छावा मध्य प्रदेशातील एका वाघिणीचा असल्याची नोंद मिळाली अाहे .चालू वर्षांच्या सुरुवातीच्या अवघ्या दोन महिन्यातच तब्बल २१ वाघांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आलीय. यानंतर वाघ स्थलांतरासाठी ठोस निर्णय आवश्यक असल्याचा अभिप्राय तज्ज्ञांनी दिला आहे. देशात वाघ मृत्यूची पुढे आलेली ताजी आकडेवारी वन्यजीवप्रेमींच्या चिंता वाढविणारी ठरली आहे. देशभर मागील दशकात 'वाघ वाचवा' अभियान धडाक्यात राबविण्यात आले. त्याची फळे पुढे येत असतानाच आता मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तराखंड राज्यातून पहिल्या दोन महिन्यात वाघ मृत्यूची आणि अवयव गवासल्याची आकडेवारी धोक्याचा इशारा समजली जात आहे.