সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, December 04, 2018

पाण्यावरुन पेटले वाडीत राजकारण

दोन वर्ष होऊनही वाडीतील जलकुंभात पोहचलेच नाही पाणी 
नवीन पाइपलाइनचा प्रस्ताव धुळखात;२९ महीने होऊनही पाइपलाइन अपूर्णच
१o लाख लीटर पाण्याची होत आहे नासाडी
दोन वर्षांत १५ टक्के पाणी गेले वाया,वेणा मध्ये फक्त १४ टक्के पाणी शिल्लक
वाडी(नागपूर)/अरूण कराळे:

वाडी मध्ये पाण्याचा प्रश्न पेटला असुन पाण्याच्या समस्येचे राजकारण होवू लागले आहे . वेणा जलाशय धरणात फक्त १४ टक्के पाणी राहिल्याने वाडी शहराला केवळ अर्धा तास पाणी मिळत आहे.ज्यामुळे वाडीची तहान भागत नाही.वाडी येथील नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पालघर मधील एका कंपनीला दिले होते ते काम १८ महिन्यात पूर्ण करण्याचा करार झाला होता .मात्र २९ महीने होवूनही पाइप लाइन टाकण्याचे काम पूर्ण न झाल्याने वाड़ी च्या जलकुंभात अजुन पाणी पोहचलेच नाही. त्यामुळे दोन वर्षात १५ टक्के पाणी वाया गेले आहे कित्येक वर्षापासुनची जूनी पाइप लाइन असल्याने जीर्ण झाली आहे या पाईप मधून दररोज १० लाख पाण्याची नासडी होत आहे .सध्या वेणा जलाशयात १४ टक्के पानी शिल्लक आहे.

पाइपलाईन टाकण्याचे काम लवकर पूर्ण केले असते तर वेणा जलाशयामध्ये ३५ टक्के पाणी वाचले असते.आज वाडी मध्ये पाण्यासाठी आंदोलन सुरू आहे ते झाले नसते . सरकार ने निधि उपलब्ध करुन न दिल्याने काम पूर्ण होवू शकले नसल्याचे एका अधिकाऱ्यांनी नाव न टाकण्याच्या अटीवर सांगितले.
सदर योजना ही १३ कोटीची मंजुरात आहे. मात्र १७ टक्केच बिल भरल्याने ७ कोटी ९४ लाख मध्ये देण्यात आल्याचे मजीप्राचे अभियंता एस . पी . भंडारकर यानी सांगितले.
वाडी,डिफेन्स ,दवलामेटी परीसरात पाणी टंचाई निर्माण झाली आहे.महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिका-यांनी पाणी नसल्याचे सिग्नल दिले आहेत.
डिसेंबरनंतर वाडीतील पाण्याच्या समस्येस उग्र रूप धारण होऊ शकते .वाडीचे नागरिक महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात पाणी मागणार आहेत. ८२ .३१ किलोमीटर पाइपलाइन टाकायची होती त्यमधुन ८० किलोमीटर काम झाले. २ .३१ किलोमीटर पाइपलाइनचे काम अपूर्ण आहे तेही लवकर पूर्ण होत असल्याचे उपअभियंता नरेश शनवार यांनी सांगितले .

वाडी शहराला वेणापासून पाणीपुरवठा होत आहे.अनेक वर्षांच्या पाइपलाइनमुळे मोठ्या प्रमाणावर पाणी खराब होत आहे.ते वाचविण्यासाठी नवीन पाइप लाइन च्या कामाचे भूमीपूजन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणविस,राज्य पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर व केन्द्रीय मंंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मे २०१६ मध्ये करण्यात आले १८ महिन्यात काम पूर्ण करायचे होते .परंतु २९ महिने होवून सूद्धा काम अर्धवट आहे.त्यामुळे, दोन वर्षांत वेणा पाण्याचे १० टक्के नुकसान झाले आहे . या योजनेवर ७७७ कोटी ९४ लाख रुपये खर्च करायचे होते.ही रक्कम कामाच्या मुदतीपूर्वीच द्यायची होती.परंतु सरकारने दिले नाही.जूलै २०१८ पर्यंत ४२९ कोटी ७० लक्ष रुपये निधी आतापर्यंत मिळाले आहे.त्यानिधीत ८० किलोमीटर पाइप लाइन टाकली .तसेच २.३१ किलोमीटरची पाइपलाइन उर्वरित आहे.१५ नोव्हेंर २०१७ पर्यंत काम पूर्ण करायचे होते.पण तसे झाले नाही. त्यामुळेच आज वाडीत पाणी पेटले आहे असेच म्हणावे लागेल .पाण्याच्या कमतरतेमुळे आणि नवीन पाइपलाइन न तयार केल्यामुळे मजीप्राच्या अधिकार्यांनी वाडीमध्ये पाण्याची समस्या निर्माण केली आहे. धरणातुन सोडताना पाणी फिल्टर वॉटरकमपर्यंत पोहोचले तर १५ ते २० टक्के पाणी खराब होते.एकूण ३५ टक्के पाणी दोन वर्षांत वाया गेले आहे .मजीप्राच्या माध्यमातून आयुध निर्माणी अंबाझरी,दवलामेटी व वाडीला एकूण ११ दशलक्ष लिटर पाणी दिले जात आहे. त्यामध्ये आयुध निर्माणीला ८ दशलक्ष लीटर, वाडीला २ दशलक्ष लीटर,व दवलामेटीला १ दशलक्ष लिटर पाणी मिळत आहे . दररोज वाडीतील २३०० व दवलामेटीतील २२५० ग्राहकांना पाणी मिळत आहे .वेणाच्या पाण्याच्या पातळीची क्षमता २१ दशलक्ष घन मीटरची आहे.जे पूर्ण भरल्यानंतर दोन वर्षापर्यंत काहीच काळजी नसते.परंतु यावर्षी फ्वत ६०० एमएम पाऊस परिसरात झाल्याने नोव्हेंबरमध्ये वेणा जलाशयात फक्त ३ दशलक्ष क्यूबिक मीटर पाणी बाकी आहे.मोठ्या प्रमाणावर पाणीची पातळी कमी होत आहे.प्रत्येक दशकात ३ सें.मी. पर्यंतचे पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे मजीप्रा सुध्दा चिंतित आहे. या बद्दल नगराध्यक्ष प्रेम झाडे यांना विचारले असता त्यांनी सांगीतले की काम न केल्याबद्दल कंत्राटदार जबाबदार आहे.
वाडीची नवीन पाणीपुरवठा १८ महीन्यापर्यंत पूर्ण करणे आवश्यक होती . परंतु ठेकेदाराच्या लापरवाहीमुळे काम पूर्ण होऊ शकले नाही.यावर ठेकेदार जबाबदार आहे. पाइपलाइन टाकण्याचे काम पूर्ण झाले असते तर आज गावाला पाणी मिळाले असते.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.