সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, July 09, 2013

प्रा. राजेश कात्रटवार याचा अटकपूर्व जामीन मंजूर

जवान विनोद किरंगे खून प्रकरण 

चंद्रपूर - गडचिरोली जिल्हा पोलिस दलाच्या नक्षलविरोधी अभियानातील जवान विनोद किरंगेच्या खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार नगरसेवक प्रा. राजेश कात्रटवार याचा अटकपूर्व जामीन ऊच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंजूर केला.
सावली तालुक्याच्या टोकावरील वैनगंगा नदीच्या काठावर असलेल्या एका बिअरबारमध्ये सी-६0 जवान विनोद किरंगे याचा गळा आवळून खून करण्यात आल्याची घटना ४ जूनला उजेडात आली. या खूनप्रकरणात बारमध्ये काम करणार्‍या दोघांना पोलिसांनी अटक केल्यानंतर आरोपी असलेला बारमालक तथा गडचिरोली नगरपालिकेचा नगरसेवक प्रा.राजेश कातट्रवार, अँड.संजय भट, जिल्हा परिषदेचा अभियंता प्रकाश शंखदरबार यांचा समावेश आहे. यातील प्रा.राजेश कातट्रवार याच्याविरुद्ध गडचिरोली पोलीस ठाण्यात यापूर्वी खुनाचा प्रयत्न, दंगल, सरकारी कर्मचार्‍यांना मारहाण करणे आदी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, हे विशेष.
मृत सी-६0 पथकातील जवान विनोद किरंगे हा त्याच्या काही सहकार्‍यांसोबत ४ जून रोजी चंद्रपूर-गडचिरोली मार्गालगत वैनगंगेच्या काठावरील प्रा.राजेश कातट्रवार याच्या मालकीच्या सारंग बारमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी गेला होता. यावेळी अतिमद्यप्राशनामुळे विनोदने उलटी केली. या कारणावरून वेटरसह अन्य कर्मचार्‍यांनी विनोदशी वाद घातला. हा प्रकार एवढय़ावरच थांबला नाही, तर बारमालक प्रा.राजेश कातट्रवार याच्यासह अँड.संजय भट, अभियंता प्रकाश शंखदरबार व अन्य काही साथिदारांनी विनोदला बेदम मारहाण केली. यात विनोदचा मृत्यू झाला. प्रकरण अंगलट येईल म्हणून विनोदचा मृतदेह चंद्रपूर-गडचिरोली मार्गालगत असलेल्या वैनगंगा नदीच्या पुलाखाली फेकण्यात आला.
वैद्यकीय अहवालात विनोदचा गळा आवळून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सावली पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरवून प्रफुल्ल गोहोणे व नीळकंठ सिडाम या दोघांना अटक केली. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी प्रा.राजेश कातट्रवार याच्यासह आणखी दोघांविरुद्ध खुनाचे गुन्हे दाखल केले आहेत. दरम्यान प्रा.कातट्रवार याच्यासह अन्य दोन आरोपी फरार झाले. त्यांनी  अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी ऊच्च न्यायालयात अर्ज केला होता.  नागपूर खंडपीठाने तो  मंजूर केला. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.