औद्योगिक कायदा धाब्यावर बसवून १५० एकर जमिनीवर ताबा
चंद्रपूर, : औद्योगिक कायद्यानुसार कोणत्याही एमआयडीसी परिसरात केवळ उद्योगांनाच जागा
देण्याची तरतूद आहे. मात्र, ताडाळी येथील एमआयडीसी परिसरात सुमारे दीडशे एकर जागा ३६ खासगी
व्यापाèयांनी मिळविली आहे. उद्योगांच्या
नावावर कोलडेपो चालविणाèया या व्यापाèयांना काही अधिकाèयांनी औद्योगिक नियम धाब्यावर
बसवून १७५ रुपये प्रति चौरस मीटर दराने २२ कोटी ५० लाखांत ही जागा मिळविल्याचा आरोप
राजू कक्कड यांनी केला.
राज्य शासनाच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाने २०११-१२ मध्ये जिल्हाधिकाèयांना पत्र पाठवून प्रदूषण दूर करण्यासाठी
ताडाळी परिसरातील कोलडेपो हटविण्याची कारवाई केली. त्यामुळे खासगी व्यापाèयांचे कोलडेपो बंद पडले. त्यासाठी
या ३६ व्यापाèयांनी पर्यायी जागेचा शोध
सुरू केला. औद्योगिक कायद्यानुसार कोणत्याही एमआयडीसी परिसरात केवळ उद्योगांनाच जागा
देण्याची तरतूद आहे. कोळसा हा उद्योग नसून, नैसर्गिक संपत्ती आहे. त्यामुळे औद्योगिक
परिसरात कोलडेपोंना जागा देता येत नाही. असे असतानाही या व्यापाèयांनी मंत्री, अधिकाèयांशी संगनमत करून दीडशे एकर जागा
केवळ २२ कोटी ५० लाखांत मिळविली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या औद्योगिक
क्षेत्रातील भूखंड वाटपाचे दर निश्चित आहेत. त्यानुसार चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रकल्पांत
औद्योगिक क्षेत्रासाठी १५५ रुपये प्रति चौरस मिटर, निवासासाठी २४५ रुपये प्रति चौरस
मिटर, तर व्यापारासाठी
३०५ रुपये प्रति चौरस मिटर असा दर आहे. ताडाळी एमआयडीसीत औद्योगिकसाठी १७५ रुपये प्रति
चौरस मिटर, व्यापारासाठी ३५० रुपये प्रति चौरस मिटर असा दर आहे. असे असतानाही या व्यापाèयांनी उद्योग दाखवून १७५ रुपये प्रति
चौरस मिटर दराने १५० एकर जागा बळकावल्याचा आरोप राजू कक्कड यांनी केला आहे. या व्यापाèयांत नरेश जैन, महावीर भट्टड, अग्रवाल कोल इंडिया,
जितेंद्र qसग, जिवराज शर्मा, रामदेव अग्रवाल, प्रदीप ठक्कर, बी. चेन्ना क्रिष्णा,
सज्जन जैन,
दीपक जैन, देव अग्रवाल, राजीव जैन, लिकेंश दोशी, शैलेंद्र अग्रवाल,
महावीर मित्तल,
वेदप्रकाश अग्रवाल,
एन. एन. ग्लोबल मेरकांटील
प्रा. लि., के. जनार्धन राव, अंशूल अग्रवाल, नरेशकुमार अग्रवाल, चके्रश जैन, विवेक जैन, विनय जैन, पियूष जैन, हरकिशन जैन, बजरंगदास अग्रवाल, नरेश गुप्ता, हरिष भत्तड, वासुदेव मालू, आशिष जैन, जुगलकिशार अग्रवाल,
पवन जैन, हरीभाई शहा यांचा समावेश
आहे.