সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Friday, July 19, 2013

मतिमंद जनाबाईची जिल्हा न्यायालयाने घेतली दखल

वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश 

भंडारा ;  तालुक्‍यातील कऱ्हांडला येथील शेवंता हरी तोंडरे व गुणा तोंडरे या मायलेकीचा भूकबळी गेल्यानंतर प्रशासनाच्या कारभारावर ताशेरे ओढले जात आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींकडून राजकारण सुरू असतानाच गावात भटकत असलेली मृत शेवंताची मतिमंद मुलगी जनाबाई हिच्याकडे लक्ष देण्यासाठी कोणालाही सवड नाही. गुरुवारी (ता. 18) "सकाळ'मध्ये प्रकाशित वृत्ताची दखल घेत जिल्हा व सत्र न्यायालयाने या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन मतिमंद जनाबाईला वेड्यांच्या रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले. यानुसार पोलिसांनी जनाबाईची वैद्यकीय तपासणी करून रुग्णालयात दाखल करण्याची कारवाई सुरू केली आहे.

शेवंताच्या दोन मुली मतिमंद असल्याने त्यांच्या पालनपोषणाची जबाबदारी शेवंतावरच होती. एक मुलगी शेवंताजवळच राहत होती, तर दुसरी जनाबाई (वय 25) परिसरात फिरत असे. दोन मुली अपंग असतानाही शेवंताला निराधार योजनेचा लाभ मिळत नव्हता. वृद्धत्वामुळे काम करणे जमत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली. यातूनच शेवंता आणि गुणाचा भूकबळी गेला. यानंतर कुंभकर्णी झोपेत असलेले प्रशासन जागे झाले. आजवर निराधार योजनेचा लाभ मिळवून न देणाऱ्या लोकप्रतिनिधींनी एकमेकांवर आरोप करून राजकारण केले. मात्र, दुसरी मुलगी जनाबाई हिच्या पालनपोषणाची जबाबदारी घेण्याचे सौजन्य दाखविले नाही. दरम्यान, "सकाळ'मध्ये "भूकबळी प्रकरणात शरमेने झुकली भंडाऱ्याची मान' या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित होताच जिल्हा व सत्र न्यायालयाने मतिमंद जनाबाईला वेड्याच्या रुग्णालयात दाखल करण्याचे आदेश दिले.

निराधारांना द्या मदतीचा हात 
जनाबाईसारख्या अनेक अपंग व अनाथ महिला-पुरुष खेड्यापाड्यात व शहरी भागात फिरत असतात. मात्र, त्यांना मदतीचा हात कोणीही देत नाही. लोकप्रतिनिधी केवळ राजकारण करतात. यामुळेच अशा अनुचित घटना घडतात. त्या घडू नये यासाठी लोकप्रतिनिधींसह सर्वसामान्यांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.