সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, July 22, 2013

इरई धरणाचे सातही दरवाजे उघडले

चंद्रपूर (प्रतिनिधी) : सोमवारी झालेल्या पावसामुळे इरई धरणाचे सातही दरवाजे शून्य पूर्णाक पाच मीटरने उघडण्यात आल्याने इरई नदी भरून वाहत अहे. चंद्रपूर शहरालगतची शेती आणि काठावरील वस्ती पाण्याखाली आली आहे.
चोवीस तासांत विश्रांती घेतल्यानंतर चंद्रपूर जिल्ह्यात आज सकाळपासून पावसानं दमदार हजेरी लावली. यामुळं पूर्वपदावर येत असलेलं जनजीवन पुन्हा विस्कळित होण्याची शक्यता बळावली आहे. आज दिवसभर संततधार पाऊस असल्यानं नागरिकांना घराबाहेर पडणं कठिण झालं.
मागील आठवडा गाजवल्यानंतर नव्या आठवड्याची सुरुवात पुन्हा दमदार पावसानं झाली. मागील चोवीस तासांची विश्रांती घेतल्यानंतर पावसानं संपूर्ण चंद्रपूर जिल्ह्यात आज सकाळी नऊ वाजल्यापासून बरसायला सुरुवात केली. कधी मुसळधार तर कधी रिमझिम स्वरुपाचा हा पाऊस चंद्रपूर जिल्ह्यासाठी आता डोकेदुखी ठरलाय. मागच्या आठवड्यात पावसाचं पाणी घरात घुसल्यानं सुमारे एक हजार कुटुंबांना घराबाहेर काढून सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं. या लोकांच्या चेहèयावर पावसाच्या कालच्या विश्रांतीमुळं हसू ङ्कुलत असतानाच आज सकाळपासून सुरू झालेल्या पावसानं हे चेहरे पुन्हा कोमेजले. जिल्ह्यात सुमारे ५०० घरांची पडझड झाली आहे. या लोकांना घर उभं करण्यासाठी qकवा सामानांची पाहणी करण्याची संधीसुद्धा पावसानं दिलेली नाही. त्यामुळं सर्वसामान्य नागरिक या अस्मानी संकटानं त्रस्त झाले आहेत.
मागील नऊ दिवसांपासून सातत्यानं कोसळत असलेल्या या पावसामुळं चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे. घरांसोबतच हजारो हेक्टर शेती पाण्यात बुडाली. रस्ते वाहून गेले. चंद्रपूर शहरातील रस्त्यांवर चालणंसुद्धा कठिण झालं आहे. सर्व रस्ते चिखलमय झाले आहेत. इरई आणि वर्धा या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहात आहेत. त्या धोक्याच्या पातळीखाली असल्या तरी परिस्थिती केव्हाही बदलू शकते, असं चित्र इथं आहे. दरम्यान, आज शहरात चार वाजेपर्यंत ८० मिमी पाऊस झाला, तर जिल्ह्यात सरासरी ९० मिमी पाऊस पडला. यावर्षी पावसानं या जिल्ह्यावर चांगलीच मेहरबानी दाखवली आहे. जून महिन्याची चंद्रपूर जिल्ह्याची सरासरी १८५ मिमी असताना प्रत्यक्षात ४३० मिमी एवढा प्रचंड पाऊस झाला. तर जुलैची सरासरी ३९७ मिमी एवढी आहे. ही सरासरी जवळपास गाठली गेली. ३७० मिमी एवढा पाऊस या महिन्यात पडला असून, महिना संपायला आणखी एक आठवडा आहे. म्हणजेच सरासरीपेक्षा अधिक पाऊस इथं पडत आहे. सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस पडत असल्यानंच चंद्रपूर जिल्ह्यात जनजीवन विस्कळित झालं आहे. यात शहरी आणि ग्रामीण भागालाही मोठा ङ्कटका बसला आहे. शेतीचं मोठं नुकसान झाल्यानं शेतक-यांची स्थिती वाईट झाली आहे. या पाश्र्वभूमीवर आता हा जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी पुढे येत आहे.


শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.