সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Sunday, July 14, 2013

पिंज-यातून बिबट पळाला…

चंद्रपूर- मोहुर्ली येथील वन विभागाच्या पिंज-यातील जेरबंद बिबट रविवारी सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास वनाधिका-यच्या हातावर तुरी देऊन पळाला. या घटनेमुळे वनाधिका-यात चांगलीच खळबळ माजली. या बिबट्याला शोधण्यासाठी जंगल पिंजून काढावा लागला. वन परीषेत्र अधिकारी राऊतकर, इको-
प्रो चे अध्यक्ष, मानद वन्यजीव रक्षक बंडू धोतरे यांनी शोध मोहीम राबउन या बिबट्याला पकडले. दीड वर्षापूर्वी सोमनाथ येथून जेरबंद करण्यात आलेला हा बिबट असून तो वन विभागाचा पाहुणा म्हणून पाहुणचार घेत आहे.
वनविभागाकडे सध्या यंदाचे चार आणि वर्षभरापूर्वीचा एक, असे एकूण पाच बिबटे असून, दिवसाला 15 किलो मटणाचा खर्च वनविभाग सोसत आहे. 
ताडोबा- अंधारी व्याघ्रप्रकल्प, चंद्रपूर शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागात बिबट्याच्या हल्ल्यात दीड महिन्यात 12 जण ठार झाले. वनखात्याने अनुक्रमे 14 एप्रिल, 27 एप्रिल आणि 29 एप्रिल रोजी मोहुर्ली, आगरझरी व मामला, पालेबारसा, माना टेकडी परिसरात पिंजरे लावून चार बिबटे जेरबंद केले. यातील तीन बिबट्यांना मोहुर्ली येथे तर, एक बिबट रामबाग नर्सरीत जेरबंद करून ठेवण्यात आला आहे. दीड महिन्यापासून चार बिबटे जेरबंद असून, पाहुणे बनून वनखात्याचा पाहुणचार घेत आहेत. याशिवाय वर्षभरापूर्वी सोमनाथ येथून आणलेला एक बिबट वनविभागाच्या दावणीला बांधून आहे. यंदा जेरबंद झालेल्या चारपैकी नेमका कोणता बिबट माणसांवर हल्ले करणारा आहे, याची शहानिशा न झाल्याने त्यांना जंगलात सोडण्यात आलेले नाही. त्यासाठी उपमुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती. ही समिती चारही जेरबंद बिबट्यांचा अभ्यास करून या संदर्भातील अहवाल प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) एस. डब्ल्यू. एच. नकवी यांच्याकडे सादर करणार होती. आतापर्यंत याबाबत समिती सदस्यांच्या तीनदा चंद्रपूर येथे बैठका झाल्या. मात्र, नेमका माणसांवर हल्ले करणारा बिबट कोण, या निर्णयापर्यंत समिती पोहोचली नाही. त्यामुळे चार बिबटे दीड महिन्यापासून पिंजऱ्यात अडकून आहेत. या चारही बिबट्यांना जंगलात सोडण्यापूर्वी मायक्रोचिप व रेडिओ कॉलर लावण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याचा प्रत्येकी खर्च तीन ते साडेतीन लाख रुपये असल्याने व कॉलर वनखात्याला मिळत नसल्याने बिबटे पिंजऱ्यात अडकून आहेत. एका बिबट्याला दिवसाला तीन किलो मटण लागते. त्यासाठी प्रतिकिलो 338 रुपये दराने मटण खरेदी केले जात असून, पाच बिबट्यांसाठी दररोज पाच हजार 70 रुपयांचा, तर महिन्याला 1 लाख 52 हजार 100 रुपयांचा खर्च मटणावर होत आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.