स्मिता पौनिकर अद्यापही बेपत्ता : पदाचा प्रभार सोपविलाच नाही
चंद्रपूर, ता. ३०: उत्तराखंड राज्यातील केदारनाथ येथे यात्रेसाठी गेलेल्या जिल्हा महिला व
बालविकास अधिकारी स्मिता पौनीकर यांचा अद्यापही ठावठिकाणा लागलेला नाही. १२ जूनपासून
त्या परत न आल्या नसून, जिल्हा महिला व बालविकास कार्यालयातातील त्यांच्या पदाचा तात्पुरता
कार्यभार अद्यापही अन्य अधिकाèयाकडे देण्यात आलेला नाही.
त्यामुळे प्रशासकीय कामे खोळंबली आहेत.
जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी स्मिता पौनीकर यांच्यासह गोंदिया येथील एकात्मिक
बालप्रकल्प अधिकारी हेमलता बावणकर, विनोद खुरसमकर, आरती खुरसमकर, प्रदीप गुल्हाणे, क्रिष्णा गुल्हाने,
स्वरुपा गुल्हाने आदी
जण १२ जून रोजी नागपूर येथून विमानाने दिल्लीला गेले. तिथून खासगी वाहनाने केदारनाथ
यात्रेला रवाना झाल्या. १४ जून रोजी दर्शन झाल्यानंतर हे सर्वजण आसपासच्या परिसरात
पर्यटनासाठी गेले. श्रीमती पौनिकर यांनी १४ ते २२ जूनपर्यंत शासकीय रजेवर गेल्यानंतर
२४ जून पासून त्या सेवेत रुजू होणार होत्या. मात्र, १७ ते १८ जूनच्या दरम्यान केदारनाथ
येथे महापूर आल्याने त्या संपर्कातून दूर गेल्या. प्रशासनाने केलेल्या मोबाईल टॉवर
ट्रेसनुसार त्यांचा अखेरचा संपर्क सोनप्रयाग येथे झाला. १८ जून रोजी त्या जंगमच्चेटी
येथे चहा घेताना दिसून आल्याची माहिती प्रशासनाकडे होती. मात्र, त्या घटनेला १२ दिवसांचा
कालावधी लोटूनही त्यांचा पत्ता लागलेला नाही. काही दिवसांपूर्वीच पौनिकर यांच्या कुटुंबातील
एका बालकाचा मृत्यू झाला. या घटनेतून सावरत नाहीतोच महापुराने qचतेत टाकले आहे. श्रीमती
पौनिकर यांचे बंधू तुषार पौनिकर हेसुद्धा याच कार्यालयात परिविक्षाधीन अधिकारी आहेत.
बहिणीच्या शोधासाठी तेसुद्धा रजेवर गेलेत. जिल्हा महिला व बालविकास अधिकाèयांचा गत १५ दिवसांपासून शोध न लागल्याने
कार्यालयातील कर्मचारीसुद्धा qचतेत आहेत. शिवाय प्रशासकीय कामांचा खोळंबा झाला आहे. त्यांच्या
पदाचा तात्पुरता कार्यभार अद्यापही अन्य अधिकाèयाकडे देण्यात आलेला नाही. त्यामुळे अनेक महत्वाच्या पत्रांवर स्वाक्षरी झालेली
नाही.
-----------
बालविकास प्रकल्प प्रभारीकडे
शहरी विभागातील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी ईश्वर कोवेकर शनिवारी (ता. २९)
सेवेतून निवृत्त झाले. त्यांच्याजागी गडचिरोली येथील प्रकल्प अधिकारी गणवीर यांच्याकडे
प्रभार देण्यात आला आहे. दरम्यान, गणवीर यांच्याकडे पूर्वीपासूनच बल्लारपूर प्रकल्प कार्यालयाचा
प्रभार आहे. त्यामुळे त्यांना तीन ठिकाणी काम पाहावे लागेल. विशेष म्हणजे
नागपूर विभागातील चार-पाच अधिकारी जूनअखेर सेवानिवृत्त झालेत.