चंद्रपूरः पोलिसांना गुंगारा देत शुक्रवारी फरार झालेला कोळसा माफियांच्या माध्यमातून झालेल्या एका खून प्रकरणातील न्यायाधीन कैदी लुकडी उर्फ धीरेंद्र जयकिसन यादव याला एकोरि मातेच्या मंदिराजवळून अटक करण्यात आली. प्रकृती अस्वस्थ असल्याने त्याला चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील कैदी वॉर्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . शुक्रवारी गस्तीवर असलेल्या पोलिसांना हुलकावणी देत धीरेंद्र पळून गेला . २ ८ जुलै २० १ १ रोजी परप्रांतीयांचा मुद्दा, अवैध उत्खननाविरुद्धची मोहीम आणि माहितीच्या अधिकाराचा वापर करून गैरप्रकार उघड करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुचना येथील वरोरा-भद्रावती क्षेत्राचे जिल्हा उपाध्यक्ष नंदू सूर यांचा खून करण्यात आला. लुकडी (पप्पू) यादव व सैन्यदलात काम करणारा सचिन यादव यांच्यासह सात ते आठ आरोपींनी सुनियोजितपणे कुचना येथील एका बारसमोर सकाळी दहा वाजताच्या सुमाराला बोलावून श्री. सूर यांच्यावर गोळी झाडून तसेच तलवारीने गंभीर वार करून खून करण्यात आला होता. लुकडी (पप्पू) यादव याला कारागृहात पाठविण्यात आले आहे.
Saturday, July 06, 2013
Author: खबरबात
Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.
এ সম্পর্কিত আরও খবর
- ব্লগার মন্তব্
- ফেইসবুক মন্তব্য