সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, July 30, 2013

आरोपींना जन्मठेपेची शिक्षा

राजुऱ्याजवळील जोगापूरच्या जंगलात  ज्येष्ठ विधीज्ञ प्रदीप नालमवार यांच्यावर येथे तर बल्लारपूर पालिकेचे अभियंता विजय बिसने यांचा ७ सप्टेंबर रोजी खून  करण्यात आला होता. यातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनवलि आहे.  राजुरा ते आसिफाबाद मार्गावरील जोगापूरच्या जंगलात अ‍ॅड. प्रदीप नालमवार व अभियंता विजय बिसने यांचे मृतदेह आढळून आले. या दोघांचा देशीकट्टय़ातून गोळय़ा झाडून खून करण्यात आल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. छेरिंग दोरजे यांच्या नेतृत्वाखाली तातडीने तपास हाती घेण्यात आला. नालमवार व बिसने यांच्यासोबत अब्दुल राजीक हा शेवटपर्यंत असल्याने त्याला सर्वप्रथम ताब्यात घेण्यात आले. पोलिसांना उलटसुलट माहिती देणाऱ्या अब्दुलने सखोल चौकशी केल्यानंतर या खुनाचे गूढ  उलगडले. या प्रकरणात पोलिसांनी अब्दुल राजीक अब्दुल नबी शेख याच्यासह एकूण चार आरोपींना अटक केली होती . दोघांचा खून मालमत्तेच्या वादातून करण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले असले तरी अभियंता विजय बिसने यांना केवळ मैत्रीखातर जीव गमवावा लागल्याची बाब समोर आली होती. येथील सरकारनगरामध्ये राहणारे व जिल्हय़ातील बहुतांश पालिकांचे वकील असलेले अ‍ॅड. प्रदीप नालमवार पूर्वी येथील टपाल कार्यालयाजवळ असलेल्या स्वामी यांच्या घरी राहात होते. ही जागा व इमारत दिवंगत खासदार अ‍ॅड. व्ही. एन. स्वामी यांची होती. सध्या या जागेची मालकी त्यांचे दत्तक पुत्र कृष्णा स्वामी यांच्याकडे आहे. नामलवार यांनी स्वत:चे घर घेतल्यानंतरही जागेचा ताबा सोडण्यास स्पष्टपणे नकार दिला होता. कृष्णा स्वामीला ही मालमत्ता विकायची होती. येथील दोन व्यवसायिकांशी त्यांचा सौदाही झाला होता. नालमवार ताबा सोडत नसल्याने सौदा पूर्ण होत नव्हता. नालमवार यांनी ताबा सोडण्याचा मोबदला म्हणून २५ लाख रुपयांची मागणी केली होती. एवढी रक्कम देण्यास कृष्णा स्वामी तयार नव्हते. नालमवार वकील असल्याने हा वाद संपुष्टात येणार नाही याची कल्पना आल्यानंतर कृष्णा स्वामीने त्यांची सुपारी देऊन हत्या करण्याची योजना आखली. यासाठी त्यांनी येथील मुख्य मार्गावर असलेल्या शिवकृपा हॉटेलच्या मालकाचा मुलगा ललित रमेश प्रभावत याची मदत घेतली. अहेरी येथे शिक्षण घेतलेल्या ललितने एक लाख ६० हजार रुपयात ही सुपारी घेतली. ललितच्या हॉटेलात जलनगर वॉर्डातील अनेक गुंडांची उठबस असते. त्याने जिवती येथील अब्दुल राजीकला ८० हजार रुपयात हे खुनाचे कंत्राट दिले. जलनगर वॉर्डात राहणारा अब्दुल गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून सध्या तो जिवती येथे प्रवासी जीप चालवत होता. त्याचे लखमापूर-बाखर्डी शिवारातील एका शेतीच्या वादाचे प्रकरण नालमवार यांच्याकडे होते. नेमकी हीच बाब हेरून ललितने त्याची निवड केली. अब्दुलने रय्यतवारी कॉलरी परिसरात राहणाऱ्या मोंटू वर्माला देशी कट्टा देण्याच्या तयारीवर या कटात सामील करून घेतले. नंतर जिवती येथे टाटा सुमो चालवणारा साहेबरराव मून व त्याचा एक साथीदार पैशाच्या आमिषावर या कटात सामील झाले. सर्व तयारी झाल्यानंतर अब्दुल राजीकने शनिवारी सायंकाळी नालमवार यांचे घर गाठले. अब्दुल पक्षकार असल्याने नालमवारांना त्याचे येणे खटकले नाही. अब्दुलने स्वत:च्या शेतीचा वाद सोडवण्यासाठी राजुरा येथे राहणाऱ्या पटवाऱ्याची भेट घेणे आवश्यक आहे. तेव्हा तातडीने चला, अशी विनंती नालमवारांना केली. ते प्रश्नरंभी यायला तयार नव्हते तेव्हा अब्दुलने पैशाची लालूच दाखवली. यानंतर अब्दुल नालमवारांना घेऊन एम.एच.३४-८७२३ या क्रमांकाच्या टाटा सुमोतून राजुऱ्याकडे निघाला. वाटेत बंगाली कॅम्पवर त्याने इतर साथीदारांना सोबत घेतले. बल्लारपूरजवळ आल्यानंतर एकटेच कशाला जायचे म्हणून नालमवारांनी विजय बिसने यांना दूरध्वनी केला व त्यांनाही सोबत घेतले. अब्दुलने राजुरा आल्यानंतर वाहन न थांबवता ते थेट पाच किलोमीटरवरील जोगापूरच्या जंगलात नेले. काहीतरी गडबड असल्याचे लक्षात येताच नालमवार व बिसने भडकले. तेव्हाच अब्दुलने देशीकट्टा काढून त्यातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. मात्र दोन गोळय़ा नालमवारांना लागल्या नाही. नंतर गाडी थांबवून नालमवारांना खाली उतरवण्यात आले व अगदी जवळून त्यांच्यावर गोळी झाडण्यात आली. यानंतर इतर साथीदारांनी पकडून ठेवलेल्या विजय बिसने यांचीही गोळी झाडून हत्या करण्यात आली. या दोघांना तिथेच टाकून हे आरोपी समोर जंगलाच्या दिशेने रवाना झाले. आरोपींनी लेंडीगुडा गावाजवळच्या एका नाल्यावर टाटा सुमो गाडी स्वच्छ केली. काम फत्ते झाल्याचा निरोप कृष्णा स्वामी यांना दिला व सर्वजण फरार झाले. संशय येऊ नये म्हणून अब्दुल राजीकने दुसऱ्या दिवशी राजुऱ्यात उतरलो होतो, अशी बनावट कथा तयार केली. मात्र पोलिसांचा हिसका बसताच त्याने सर्व घटनाक्रम सांगितला. याप्रकरणी पोलिसांनी टाटा सुमो व देशीकट्टा जप्त केला. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.