সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Wednesday, July 24, 2013

वरोरा भद्रावती तालुक्यातील पुरग्रस्त

भागाची जिल्हाधिका-याकडून पाहणी
चंद्रपूर दि.24- वरोरा व भद्रावती तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाले असून टाकळी, नंदोरी, कोसरसार, हिरापूर व खापरी या गावाची पाहणी आज जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केली.  पिकाच्या नुकसानीचा सर्व्हे करुन तातडीने पाठवा असे निर्देश त्यांनी दिले.  अप्पर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर, उपविभागीय अधिकारी जि.एच.भुगवाकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी  डॉ.डी.एल. जाधव, वरोरा तहसीलदार प्रमोद कदम व भद्रावती तहसीलदार प्रसाद मते यावेळी सोबत होते.

      यावेळी जिल्हाधिका-यांनी भद्रावती, नंदोरी दरम्यान असलेल्या पुलाची पाहणी केली.  त्यानंतर टाकळी येथील पुराने वाहून गेलेल्या शेतीची पाहणी जिल्हाधिका-यांनी केली.  नुकसान झालेल्या पिकाचा 50 टक्के पेक्षा कमी किती हेक्टर व 50 टक्या पेक्षा जास्त किती हेक्टर  असा अहवाल तात्काळ पाठविण्याचे निर्देश म्हैसेकर यांनी दिले. खांबाडा येथील नाल्याचे बॅकवॉटर कोसरसार या गावात शिरल्यामुळे येथील घराचे व शेतीचे मोठया प्रमाणात नुकसान झाले.  नुकसानग्रस्त नागरीकांशी चर्चा करुन जिल्हाधिकारी म्हैसेकर यांनी मदतीचे आश्वासन दिले.

      वरोरा तालुक्यातील खापरी या गावाच्या बाजूने नाला जात असून या नाल्याला आलेल्या पुरामुळे गावातील घरांचे नुकसान झाले.  या नुकसानीची पाहणी करतांना       गावक-यांनी पुर्नवसनाची मागणी जिल्हाधिका-याकडे केली.  ग्राम पंचायतने पुर्नवसनाचा ठराव घेवून पाठविल्यास यावर विचार करण्यात येईल असे डॉ.म्हैसेकर यांनी गावक-यांना सांगितले.

      चंद्रपूर तालुक्यातील मसाळा येथील माजी मालगुजारी तलाव फुटल्यामुळे धान पिकाचे नुकसान झाले.  या भागास जिल्हाधिकारी दीपक म्हैसेकर यांनी भेट दिली.  मामा तलाव तात्काळ दुरुस्त करण्याच्या सुचना जिल्हा परिषद सिंचन विभागाला दिल्या.  तसेच पावसामुळे  मसाळा गावातील पडलेल्या घराची पाहणी त्यांनी केली.  यावेळी तहसीलदार गणेश शिंदे सोबत होते.
     अतिवृष्टीमुळे चंद्रपूर जिल्हयातील 546 गावे बाधित झाली असून अंशत: 3849 तर पूर्णत: 190 घरे अतिवृष्टीमुळे पडली आहेत.  अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त व्यक्तींना जिल्हा प्रशासनातर्फे 2 लाख 41 हजार 125 रुपयाचे सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले.  अतिवृष्टीमुळे जिल्हयात एकूण 12 व्यक्तींचा मृत्यू झाला असून त्यांच्या वारसदारांना 15 लाख 5 हजाराचे अनुदान देण्यात आले. उर्वरीत अनुदान वाटपाची प्रक्रिया सुरु आहे.                                               0000 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.