সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, July 20, 2013

डॉ.दीपक म्हैसेकर जिल्हाधिकारी पदी रुजू

  चंद्रपूर दि.20- चंद्रपूर जिल्हयाचे नवे जिल्हाधिकारी म्हणून आज डॉ.दीपक म्हैसेकर यांनी प्रभारी जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर यांचेकडून पदभार स्वीकारला. मनपा आयुक्त प्रकाश बोखड, निवासी उपजिल्हाधिकारी पी.डी.बडकेलवार, जिल्हा नियोजन अधिकारी एम.एम.सोनकुसरे, जिल्हा माहिती अधिकारी रवि गिते, जिल्हा पुरवठा अधिकारी आर.एस.आडे, जिल्हा क्रीडा अधिकारी घनश्याम राठोड यावेळी उपस्थित होते.
    विजय वाघमारे यांची मुंबई येथे बदली झाल्यानंतर त्यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार अपर जिल्हाधिकारी सी.एस.डहाळकर यांचेकडे सोपविण्यात आला होता.  6 जुलै 2013 रोजी शासनाने चंद्रपूर जिल्हाधिकारी पदी डॉ.दीपक म्हैसेकर यांची कोल्हापूर येथून बदली केली.  त्यांनी आज जिल्हाधिकारी पदाची सुत्रे स्वीकारली.
    डॉ.म्हैसेकर मागील तीन वर्षापासून कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते.  डॉ.म्हैसेकर 1989 मध्ये परभणी येथे बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून शासकीय सेवेत रुजू झाले. त्यानंतर त्यांची तेथेच उपमुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली.
    जळगांव येथे अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी, नागपूर येथे पशुवैद्यकीय विद्यापीठाचे निबंधक, नांदेड मनपाचे आयुक्त, नगर विकास खात्याचे उपसचिव म्हणून काम बघितल्यानंतर त्यांची कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी म्हणून नियुक्ती झाली. त्यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेचे व्हीडीओ फोन यंत्रणा कार्यान्वित केली.  हायटेक यंत्रणा वापरणारी कोल्हापूर ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद ठरली.  आज त्यांनी चंद्रपूर जिल्हयाचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.