সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Thursday, July 04, 2013

मनसेने आणली महिला भजनमंडळी

चंद्रपूर : जिल्ह्यात कधी नव्हे आता मनसेने महिला सेनेची कार्यकारिणी गठित केली. त्यामुळे पक्षश्रेष्ठींसमोर महिलांचे शक्तिप्रदर्शन करण्यासाठी एका नगरसेवकाने चक्क वॉर्डातील महिला भजन मंडळाच्या कार्यकत्र्यांना आणल्याचा प्रकार दिसून आला.
जिल्ह्यात दोन दिवस आढावा बैठक झाल्यानंतर बुधवारी जिल्हा कार्यकारिणी घोषित करण्यात आली. त्यात प्रथमच महिला सेनेच्या दोन जिल्हाध्यक्षांची घोषणा होणार होती. मात्र, मनसेकडे महिला कार्यकत्र्याच नसल्याने पक्षश्रेष्ठींपुढे गोची होऊ नये म्हणून इंदिरानगरच्या नगरसेवकाने महिलांना आणण्याची शक्कल लढविली. दुपारी दोन वाजता कार्यक्रम असल्याचे सांगून त्यांनी वॉर्डातील सुमारे २० महिलांना ऑटोत बसवून आणले. त्या श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात आल्या. यात काही तरुणींपासून वृद्धाही होत्या. आपण कशासाठी आलात, याची विचारणा केली असता, एकाही महिलेकडे उत्तर नव्हते. भजन मंडळाच्या महिला असल्याचे सांगून नगरसेवकाने आपल्याला आणल्याचे त्या सांगत होत्या. या महिलांच्या खांद्यावर मनसेचे दुपट्टे आणि हातात जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याणच्या सभापतींचे व्हिजिqटग कार्ड देण्यात आले होते. एकूणच पक्षश्रेष्ठींपुढे आपले वजन आणि महिला कार्यकत्र्यांचेही पाठबळ असल्याचे दाखविण्यासाठी मनसेला भाडोत्री कार्यकर्ते आणावे लागले, हे यातून पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.
सर्वांधिक युवकांना संधी देणारा पक्ष म्हणजे राज ठाकरे यांनी निर्माण केलेला मनसे होय. या पक्षात स्थानिक पातळीपासून तर राज्यस्तरावरील राजकारणात तरुणांचा ओढा दिसतो. पक्षात तसे महिला संघटनेला वाव नव्हताच. पण, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना ५0 टक्के आरक्षण दिल्याच्या पार्श्‍वभूमिवर राज ठाकरेंनी पहिल्यांदाच महिला संघटनेची स्थापना केली. दरम्यान, स्थानिक पदाधिकार्‍यांनी जिल्हा संपर्क अध्यक्ष नंदू घाडीगावंकर यांना प्रभावित करण्यासाठी चक्क वृद्ध महिला पदाधिकार्‍यांचा वापर केल्याची बाब निदर्शनास आली. 
ठाकरे यांच्या नेतृत्त्वावर विश्‍वास संपादन करणारा वर्ग म्हणजे तरुण वर्ग होय. ठाकरे यांचा मराठी बाणा सर्वाधिक तरुण वर्गात चर्चिल्या जातो. राज्यात कुठेही भाषण असले तरी त्यांच्या भाषणाची चर्चा किमान दिवसभर रंगते. मुंबई - नाशीककडे मनसेची काय 'क्रेझ' असेल ती असो. परंतु, चंद्रपुरात या पक्षाचा कायम फज्जा उडाला आहे. मनसे जिल्हा पदाधिकार्‍यांमुळे या पक्षाचे वरिष्ठ नेते त्रस्त झाले होते. त्यामुळे दोन

दिवसांपूर्वी आ. प्रवीण दरेकर यांनी जिल्हा पदाधिकार्‍यांच्या कानपिचक्या घेतल्या आणि आंदोलने करा, पण ते वैयक्तिक लाभासाठी नको, असे खडसावून सांगितले. असे असताना आज संपर्क अध्यक्ष नंदू घाडीगावंकर यांनी नव्याने जिल्हा कार्यकारिणी घोषित केली. 
चंद्रपूर - गडचिरोली र्शमिक पत्रकार भवनात झालेल्या घोषणेत जिल्हय़ातील महिला संघटनांची प्रतिमा वाढविण्यासाठी चक्क वृद्ध महिलांचा वापर करण्यात आला. एका ७0 वर्षिय वृद्ध महिलेला येथे कशासाठी आली गं! असे विचारले असता, ती म्हणाली, वार्डातील नगरसेवकाने चला म्हटले म्हणून वार्डातील २0 ते ३0 महिला आलोत. कशासाठी आणले हे तर आम्हाला सांगितल्या गेले नाही. पण हे कार्ड आमच्या हातात दिले., अशी माहिती देत ती वृद्ध महिल म्हणाली, बापू, या कार्डच्या आम्हाला काही फायदा आहे का? यावर उपस्थित अचंबित झाले आणि कार्ड बघू लागले. तर ते जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण सभापती अमृता सूर यांचे होते. मनसेत दोन दिवसांपूर्वी महिला संघटनेची बांधणी करण्यात आल्यानंतर एकाच दिवसात इतक्या महिला कशा? असा प्रश्न सर्वांना पडू लागला. एकू ण तेथील महिलांवरून स्थानिक मनसे पदाधिकार्‍यांनी राजकारणाशी कुठलाही सबंध येत नसल्याने महिलांचाही पक्षाची प्रतिमा वाढविण्यासाठी वापर केल्याची बाब स्पष्ट झाली.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.