সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Saturday, July 06, 2013

कैदी पोलिसांना गुंगारा देत फरार

चंद्रपूरः कोळसा माफियांच्या माध्यमातून झालेल्या एका खून प्रकरणातील न्यायाधीन कैदी पोलिसांना गुंगारा देत शुक्रवारी फरार झाला . धीरेंद्र जयकिसन यादव हे या कैद्याचे नाव आहे . त्याच्या विरुद्ध कोर्टात खटला सुरू आहे . प्रकृती अस्वस्थ असल्याने त्याला चंद्रपूरच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातील कैदी वॉर्डात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते . शुक्रवारी गस्तीवर असलेल्या पोलिसांना हुलकावणी देत धीरेंद्र पळून गेला . वरोराजवळील माझरी गावातील नंदू सूर नामक युवकाचा गेल्या वर्षी जूनमध्ये कोळसा माफियांनी सुपारी देऊन खून केला होता . याप्रकरणातील धीरेंद्र हा आरोपी आहे .

२ ८ जुलै २० १ १ रोजी  परप्रांतीयांचा मुद्दा, अवैध उत्खननाविरुद्धची मोहीम आणि माहितीच्या अधिकाराचा वापर करून गैरप्रकार उघड करणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कुचना येथील वरोरा-भद्रावती क्षेत्राचे जिल्हा उपाध्यक्ष नंदू सूर यांचा आज खून करण्यात आला. लुकडी (पप्पू) यादव व सैन्यदलात काम करणारा सचिन यादव यांच्यासह सात ते आठ आरोपींनी सुनियोजितपणे कुचना येथील एका बारसमोर सकाळी दहा वाजताच्या सुमाराला बोलावून श्री. सूर यांच्यावर गोळी झाडून तसेच तलवारीने गंभीर वार करून खून करण्यात आला. यानंतर संतप्त जमावाने सुमारे बारा ट्रक जाळले, तर चाळीसहून अधिक दुकानांची नासधूस केली.
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष नंदू सूर हे मूळचे वणी तालुक्‍यातील झोला येथील रहिवासी आहेत. सध्या ते माजरी येथे राहत होते. दीड ते दोन वर्षांपासून त्यांनी अवैध व्यावसायिकांविरुद्ध मोहीम उघडली होती. परप्रांतीयांच्या मुद्द्यासोबतच त्यांनी अवैध उत्खननाचे मुद्देही लावून धरले होते. माहितीच्या अधिकाराचा वापर करून काही व्यावसायिकांचे त्यांनी पितळही उघडे पाडले होते. अशाच एका प्रकरणावरून लुकडी यादव आणि नंदू सूर यांच्यात वैमनस्य झाले. लुकडी यादव हा वाहतुकीचा व्यवसाय करायचा. त्याने आपल्याला धमक्‍या दिल्याचे सूर यांनी यापूर्वी तत्कालीन पोलिस अधीक्षक मनोजकुमार शर्मा यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती; मात्र पोलिसांनी यादववर कुठलीही कारवाई केली नाही.
गुरुवारी (ता. 28) सकाळी सव्वादहाच्या सुमारास लुकडी यादव याने कुचना येथील पाम वाइनबारसमोर बोलायचे असल्याचे निमित्त करून सूर यांना बोलावून घेतले. सूर यांनीही काळजी घेत भाऊ हरी सूर, साळा उमेश बोढेकर आणि रितेश मेश्राम यांना सोबत घेतले. बारजवळ पोचताच लुकडी यादव याने नंदू सूर यांच्यासोबत वाद घातला. यादवसोबत त्यावेळी सचिन यादव, फिरोज कय्यामुद्दीन आणि अन्य पाचजण होते. वाद सुरू असतानाच डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच सचिन यादव याने नंदू सूर यांच्यावर गोळ्या झाडल्या, तर लुकडी यादव याने तलवारीने डोक्‍यावर, हातावर आणि पोटावर वार केले. नंदू सूर लागलीच जमिनीवर कोसळले. बचाव करणाऱ्या उमेश बोढेकर यांच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली. श्री. सूर ठार झाल्याची खात्री पटल्यावर लुकडी यादव, सचिन यादव आणि अन्य पाच ते सहा आरोपी चारचाकी वाहनाने पसार झाले. आरोपींपैकी सचिन यादव हा सैन्यात कार्यरत असल्याचे वृत्त आहे.
घटनेचे वृत्त कळताच नागरिक रस्त्यावर आले. वरोरा, भद्रावती, चंद्रपूर आणि वणी तालुक्‍यातील मनसेचे पदाधिकारी, कार्यकर्तेही घटनास्थळाकडे निघाले. घटनेनंतर पंधरा ते वीस मिनिटांनी कुचना गावाची स्थिती हाताबाहेर गेली. वर्दळीचा वणी-वरोरा मार्ग रोखून धरण्यात आला. थांबलेल्या सुमारे बारा ट्रकला आग लावण्यात आली. छोट्या-मोठ्या सुमारे 40 हून अधिक दुकानांतील सामान बाहेर काढून जाळण्यात आले, तसेच नासधूस करण्यात आली. माजरी कॉलरीची एक स्कूलबसही जाळण्यात आली. जवळच असलेल्या शुभम बारमधील सर्व वस्तूंची तोडफोडही करण्यात आली. माहिती मिळाल्यांनतर वरोरा, भद्रावती पोलिसांसह पोलिस अधीक्षक सुवेज हक अतिरिक्‍त कुमक घेऊन घटनास्थळी पोचले. हा सर्व ताफा पोचेपर्यंत माजरी ठाण्याचे रणधीर मेश्राम हेसुद्धा जखमी झाले होते.
घटना घडल्यानंतर पोलिसांची कुमक पोचण्यास दीड ते दोन तास लागले. पोलिस पोचल्यानंतर संतप्त नागरिक आणि मनसेनेही प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. काही प्रमाणात दगडफेकही झाली. गर्दी आवरत नाही, हे लक्षात येताच पोलिसांनी बंदुकीची एक फैरीही झाडल्याचेही वृत्त आहे. पोलिसांनी सौम्य लाठीमारही केला. गर्दी पांगविल्यानंतर नंदू सूर यांचा मृतदेह वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. त्यामुळे मनसे कार्यकर्त्यांनीही तेथे गर्दी केली. येथे झालेल्या धक्काबुकीत वरोरा येथील पोलिस उपनिरीक्षक येरमे यांचे पिस्तूल हिसकण्याचा प्रयत्न झाला. आजच्या घटनेत दोन पोलिसांसह उमेश बोढेकरही जखमी झाले. नंदू सूर यांच्या खुनानंतर काही वेळात नंदोरी येथून आरोपींनी वापरलेले वाहन जप्त केल्याचे वृत्त आहे. एमएच-34-9052 या क्रमाकांची सुमो ही लुकडी यादव याचीच असून, सुमोत रक्‍तही आढळून आले. दरम्यान, पोलिसांनी तिघा आरोपींना ताब्यात घेतल्याचेही वृत्त आहे. वृत्त लिहीपर्यंत पोलिसांनी मात्र याला दुजोरा दिलेला नव्हता.


चंद्रपूर जिल्हयात खाण माफियांचं वाढतं वर्चस्व कोळसा व्यवसायाला धोका निर्माण करणारं आहे. गेल्या काही दिवसात कोल माफीयांनी चार लोकांचा खून केला आहे. जिल्ह्याला लागून असलेल्या घुग्गुसमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर अध्यक्षाची भर दिवसा तलवारीने हत्या करण्यात आली. कारण होतं. कोळशाच्या व्यवसायातलं शत्रुत्वाचं. हे कोळसा माफिया बेकायदेशीर तस्करी तर करतातच पण त्यांच्या कारनाम्यांमुळे गुन्हेगारीही वाढलीय.
चंद्रपूर जिल्ह्यात 40 हजारांच्या वर अंडरग्राउंड आणि ओपनकास्ट खाणी आहेत. खाणीतला कोळसा नेताना यावर कोळसामाफियांची करडी नजर असते. या व्यवसायात अनेक गँग सक्रिय आहेत आणि त्यामुळे गुन्हेगारी वाढलीय. लाखांची दलाली आणि प्रशासनाचं पाठबळ यामुळे चंद्रपूर जिल्ह्यात कोळसा माफियांनी उच्छाद मांडला आहे. या कोळसा माफियांना रोखण्यासाठी केंद्र सरकारने सीआयएसएफसारखी यंत्रणा लावावी, अशी मागणीही झाली. पण सरकारनं त्याकडे फारसं गांभिर्याने बघितलं नाही. जो अधिकारी अशा माफियांवर कारवाई करण्याची हिंमत दाखवतो त्या अधिकार्‍याची बदली करण्यात येते. त्यामुळे माफिया आणि प्रशासन यांचे साटेलोटे तर नाही ना अशी चर्चा आता सुरू झालीय. चंद्रपूरमध्ये कोळसा खाणींवरुन होणार्‍या हिंसेचं प्रमाण गेल्या काही वर्षात वाढलंय. एक नजर टाकूया या गँगवॉरवर…
- हाजी सरवर आणि तिरुपती पॉल यांच्यातलं गँगवॉर नेहमीचंच- 2011 : कोल माफिया सत्याचा खून- 2011 : मनसे शहर अध्यक्ष नंदू सूर याचा खून – 6 महिन्यांपूर्वी घुग्गुस शहरात हाजी सरवरवर गोळीबार – 6 गोळ्या लागूनही हाजी सरवर बचावला- 4 दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचा शहर अध्यक्ष तिरुपती पॉल याचा खून
सिंधुदुर्गात कळणेमध्ये 600 कोटींपेक्षाही जास्त बेकायदा मायनिंगतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कळणे मायनिंगने लाखो टन बेकायदा लोहखनिज काढल्याचं निष्पन्न होऊन तब्बल सहा महिने झाले तरी अद्याप या मायनिंग कंपनीवर कोणतीही कारवाई झालेली नाही . नागपूर आणि कोल्हापूर खनिकर्म विभागाने नव्याने केलेल्या संयुक्त तपासणीत या मायनिंगमधून तब्बल 9 लाख टन बेकायदा लोहखनिजाचं बेकायदा उत्खनन झाल्याची माहिती आयबीन्एन लोकमतच्या हाती लागलीय. सुमारे 600 कोटीपेंक्षाही अधिकचा हा घोटाळा आहे. शिवाय सरकारचा कोट्यवधींचा महसूलही बुडाला आहे. मात्र राजकीय वरदहस्तामुळेच हे सगळं प्रकरण झाकलं जात असल्याचं गावकर्‍यांचं म्हणणं आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.