नागपूर वार्तापत्र
पळवून नेणा-या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल:
हुडकेश्वर - दि. 30.04.15 चे 1400 वा चे सुमारास आरोपी येशु मोहल्लम गौरखेडे वय 28 वर्ष राइंदीरानगर,
जाटतरोडी नं 3, नागपूर याने पोस्टे हुडकेश्वर हद्यीत राहणा-या फिर्यादीच्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीस फिर्यादीचे कायदेशिर रखवालीतून फुस लावून पळवून नेले. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे हुडकेश्वर येथे सपोनि धाडगे यांनी आरोपीविरूध्द कलम 363 भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
गंभीर दुखापत करणा-या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल:
कोराडी/लकडगंज - 1) दि. 01.05.15 चे 1900 वा चे सुमारास फिर्यादी शंकर गणपतराव वगारे वय 50 वर्ष राभोकारा झोपडपट्टी नागपूर यांचा मुलगा सागर वय 22 वर्ष यास अल्पवयीन 17 वर्षीय आरोपी याने घरगुती
कारणावरून वाद विवाद करून भांडण झाल्याने पोस्टे कोराडी हद्यीत भोकारा ग्राम पंचायत जवळील ठाकरे
पाणठेल्याजवळ भाजी कापण्याचे चाकुने पोटावर मारून गंभीर जखमी केले. जखमीचा उपचार मेयो
हाॅस्पिटल येथे सुरू आहे. याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे कोराडी येथे पोउपनि
धानोरकर यांनी आरोपीविरूध्द कलम 326 भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
2) दि. 01.05.15 चे 2200 वा चे सुमारास आरोपी सागर शिवलाल यादव वय 22 वर्ष राइतवारी
रेल्वे स्टेशन जवळ, भारतीय आखाडयाजवळ, नागपूर याने पोस्टे लकडगंज हद्यीत इतवारी रेल्वे
स्टेशन जवळ, प्लाॅट नं 624, भारतीय आखाडयाजवळ राहणारा फिर्यादी बादल सुधाकर बरमकर वय 23 वर्ष
यास दारू पिला असे म्हटले. फिर्यादीने आरोपीस दारू पाजण्यास पैसे नाही असे म्हटल्यावरून आरोपीने
फिर्यादीस शिवीगाळ करून पाहुन घेण्याची धमकी दिली. त्यानंतर फिर्यादी आपल्या घरी गेला असता
आरोपीने दि. 02.05.15 चे 0010 वा चे सुमारास फिर्यादीचे घरी जावून त्याच्या डाव्या मांडीवर चाकुने वार
करून गंभीर जखमी केले. जखमीचा उपचार रहाटे हाॅस्पिटल येथे सुरू आहे. याप्रकरणी फिर्यादी यांनी
दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे लकडगंज येथे सपोनि मोले यांनी आरोपीविरूध्द कलम 326,452,504,506 भादंवि
अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
प्राणांतिक अपघात
कळमणा - दि 30.04.15 चे 1900 वा चे सुमारास फिर्यादी नितीन देवरावजी बेंद्रे वय 29 वर्ष रा. शारदा
चैक, बजरंग पार्क, कामठी यांचे वडील देवरावजी बेंद्रे व मिस्त्री मुनीवर भाई हे पोस्टे कळमणा हद्यीत
कापसी पुला समोरील हैद्राबाद कडे जाणा-या रोडवर ट्रक क्र एमएच 40/एल/1831 ची दुरूस्ती करित
असताना हिरो मॅजेस्टीक क्र एमएच/49/एल/3491 च्या आरोपी चालकाने आपल्या ताब्यातील वाहन
निष्काळजीपने चालवून देवरावजी बेंद्रे व मुनीवर भाई यांना धडक मारून गंभीर जखमी केले. त्यांना
उपचाराकरीता तारांगण हाॅस्पिटल येथे भरती केले असता उपचारादरम्यान देवरावजी बेंद्र हे मरण पावले.
याप्रकरणी फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे कळमणा येथे पोउपनि डेरे यांनी आरोपी चालकाविरूध्द
कलम 279,337,304(अ) भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
हयगयीने मृत्युस कारणीभूत होणा-या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल:
कळमणा -दि. 01.05.15 चे 1610 वा चे सुमारास आरोपी बजरंगीलाल जेठामल अग्रवाल वय 64 वर्ष रावर्धमान
नगर, राधाकृष्ण अपार्टमेंट, नागपूर यांनी आपल्या पोस्टे कळमणा हद्यीतील चिखली मेहता
काटयासमोर, अन्नपुर्णा फुड प्राॅडक्ट या कंपनीतील बेबे बाॅयलर ची काळजी नघेता हलगर्जीपनाने ते यंत्र
सुरू केल्याने त्याचा स्फोट होवून ते स्वतःचे मरणास व कंपनीत काम करणारे 1) भुवनेश्वर गोवर्धन देशमुख
वय 20 वर्ष रा. मांगली, जि. भंडारा 2) सचिन गौतम टे ंभेकर वय 18 वर्ष रा. हरदोली जि. बालाघाट 3)
प्रितीचंद बिसेन वय 42 वर्ष रा. दुर्गानगर, भरतवाडा 4) अनवर बिसेन वय 24 वर्ष रा. गांेदीया 5) अगनु
धनसिंग शाहु वय 45 वर्ष रा. डिप्टीसिग्नल 6) नंदलाल हेमराज भिमशाहु वय 19 वर्ष रा. छत्तीसगढ, नागपूर
यांचे जखमी होण्यास कारणीभूत झाला. याप्रकरणी पोस्टे कळमणा येथे पोउपनि ओऊळकर यांनी आरोपी
विरूध्द कलम 304(अ),337,338 भादंवि अन्वये गुन्हा नोंदविला आहे.
विनयभंग करणा-या आरोपींविरूध्द गुन्हा
सक्करदरा - दि. 01.05.15 चे 1730 वा चे सुमारास 48 वर्षीय फिर्यादी यांचा फायनांन्स कंपनीचा व्यवसाय असून त्यांचेकडील फायनांन्सवर आरोपी क्र 1) अजगर नावाचा मुलगा याचे कडे थ्री सिटर अॅटो आहेफिर्यादी व त्याचे आॅफीसमध्ये काम करणारी मुलगी आॅफीसमध्ये हजर असताना आरोपी क्र 1 याने आपल्या इतर 5 ते 6 साथीदारांसोबत येवून शिवीगाळ करून फिर्यादीला हातबुक्कीने मारहाण केली. फिर्यादीचे
आॅफीसमध्ये काम करणा-या मुलीचा हात पकडून ओढले. याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून पोस्टे
सक्करदरा येथे पोउपनि नैताम यांनी आरोपींविरूध्द कलम 143,147,149,323,504,452,354 भादंवि अन्वये
गुन्हा नोंदविला आहे.