সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, March 25, 2014

ज्येष्ठ अभिनेत्री बेबी नंदा यांचे निधन



मुंबई, दि. २४ मार्च सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री बेबी नंदा यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. त्या ७५ वर्षांच्या होत्या. मास्टर विनायक यांच्या कन्या असलेल्या बेबी नंदा यांनी आपल्या अदाकारीने qहदी सिनेसृष्टीत स्वतःचा असा एक वेगळा ठसा उमटवला होता. बालकलाकार म्हणून नंदा यांनी चंदेरी दुनियेत पाऊल ठेवले आणि शेवटपर्यंत त्यांना ङ्कबेबीङ्क या नावानेच ओळखत होते.

बेबी नंदा यांचा एका मराठी कुटुंबात जन्म झाला होता. त्यांचे वडील विनायक दामोदर कर्नाटकी मराठी सिनेमाचे दिग्दर्शन करत असते. लहानपणी वडील वारल्यानंतर त्यांनी संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी उचलली. बेबी नंदा १२ वर्षांच्या असताना ङ्ककुलदैवतङ्क या सिनेमातून नायिका म्हणून झळकल्या. या सिनेमानंतर त्यांनी मराठीत सहा सिनेमे केले. त्यानंतर काका व्ही. शांताराम यांनी त्यांना qहदीमध्ये ब्रेक दिला. बेबी नंदा यांनी बालकलाकार म्हणून मंदिर, जग्गू, शंकराचार्य, अंगारे, जगद्गुरू आदी सिनेमा महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या. नंदा अभिनेत्री म्हणून चमकल्या त्या ङ्कतुफान और दियाङ्क या सिनेमातून २५ आठवडे चाललेल्या या सिनेमाने नंदाची कारकीर्द बहरली. मग ङ्कछोटी बहनङ्क, ङ्ककालाबाजारङ्क, ङ्कलक्ष्मीङ्क, ङ्कदुल्हनङ्क, आणि ङ्कभाभी..भाभीङ्क हे सिनेमे ५० आठवडे बॉक्स ऑफिसवर चालले. त्यानंतर अभिनेत्री, बहिणीच्या रुपात, पत्नीच्या रुपात, आईच्या आणि खलनायिका म्हणूनही त्या प्रेक्षकांसमोर आल्या. पण त्यांची ही ओळख चाहत्यांच्या मनात कायमच घर करून राहिली. एवढंच नाहीतर ङ्कभैया मोरे राखी के बंधन को निभानाङ्क सारख्या गाण्यांनी तिला बहिणीच्या भूमिकेमध्ये जखडून टाकले. त्यानंतर ङ्कधूल का फूलङ्क, ङ्कआंचलङ्क, ङ्कप्रेमरोगङ्क यांसारख्या सिनेमात अभिनय केला. राज कपूरसोबत ङ्कआशिकङ्कमध्ये तर राजेश खन्नासोबत ङ्कइत्तेफाकङ्क मध्ये तिने रंगविलेल्या खलनायिकाही प्रेक्षक अजून विसरलेले नाहीत. विविध नायकांसोबत काम करताना बेबी नंदा यांनी त्यांचे घरही सांभाळले. अभिनयासाठी बेबी नंदा यांना अनेक फिल्मफेअर पुरस्कार देखील मिळाले.



सनीच्या ङ्करागिणी एमएमएस २ङ्क करतोय बॉक्स ऑफिसवर धमाल

पहिल्या आठवड्यात २४.५ कोटींची कमाई

मुंबई, दि. २४ मार्च (qह.स.)ः बॉलिवूडमधी पोर्नस्टार सनी लिओनचा ङ्करागिणी एमएमएस२ङ्क सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली असून पहिल्या आठवड्यात २४.५ कोटीं रुपयांचा आकडा पार केला आहे. एकीकडे क्रिकेट टी-२० विश्वचषक सुरू असताना आणि टीम इंडिया फॉर्ममध्ये असतानाही सनीची जादू त्यावरही भारी पडताना दिसत आहे. तसेच सलग तीन आठवडे चालणारा कंगना रानावतचा ङ्कक्वीनङ्क अजून बॉक्स ऑफिसवर कमाई करत आहे. तिसèया आठवड्यात या सिनेमाने ४७ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. त्यामुळे सनीचा ङ्करागिणी एमएमएस २ङ्क कंगणाच्या सिनेमाला टक्कर देत ४७ कोटींचा रेकाँर्ड तोडू शकेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

२१ मार्चला ङ्करागिनी एमएमएस २ङ्कसह ङ्कआँखो देखीङ्क, ङ्कगँग ऑफ घोस्टङ्क हे सिनेमे प्रदर्शित झाले होते. परंतु सनीच्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर शानदार ओपqनग मिळाली. सिनेमाने पहिल्या आठवड्यात २४ कोटींहून अधिक कमाई केली आहे. अभिनयाशी फारसे देणेघेणे नसलेल्या सनीने तिच्या बोल्ड रुपाला शोभणारी व्यक्तीरेखा साकारली आहे. त्यामुळे सिनेमागृहाबाहेर हाऊस फुलचा बोर्ड पाहायला मिळत आहे. पहिल्या दिवशी ८.४३ कोटी, दुसèया दिवशी ७.२९ आणि तिसèया ८.७८ कोटी रुपयांची दणदणीत कमाई या सिनेमाने केली आहे. तर एकाच दिवशी प्रदर्शित झालेला दिग्दर्शक सतीश कौशिक यांचा ङ्कगँग ऑफ घोस्टङ्क हा हॉरर सिनेमा तीन दिवसात जेमतेम एक कोटींचा आकडा पार करू शकला आहे. शिवाय रजत कपूर यांच्या ङ्कआँखो देखीङ्क या सिनेमाने अधिक परिश्रमानंतर बॉक्स ऑफिसवर फक्त १५ लाख रुपयांचा पल्ला गाठू शकला आहे.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.