चंद्रपूर, : येत्या लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रात धनगर समाजाचे मत निर्णायक ठरणार आहे. आजवर सरकारने धनगर समाजाच्या मागण्यांकडे दुर्लक्षच केले आहे. ही बाब लक्षात घेवून धनगर समाज जय मल्हार सेनेने अजूनपर्यंत कोणत्याही पक्षाला पाठींबा दिलेला नाही, असे जय मल्हार सेनेचे प्रदेश सरचिटणीस संजय कन्नावार यांनी कळवले आहे.
आज जारी केलेल्या एका पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, जय मल्हार सेनेला आजवर सर्वच पक्षांनी आश्वासने दिली. आम्ही आमदारांच्या घरासमोर धरणे आंदोलन केले. हिवाळी अधिवेशनावर समाजाचा मोर्चाही काढण्यात आला. मात्र आमच्या समाजाला अनुसूचित जातींच्या सवलती मिळाव्या यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाने प्रयत्न केले नाही असा आरोप त्यांनी केला आहे. या संदर्भात जय मल्हार सेनेच्या कार्यकत्र्यांच्या बैठकीत निर्णय घेतला जाईल असेही त्यांनी या पत्रकात म्हटले आहे.