সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Tuesday, March 18, 2014

भेजगावात आपल्या मुद्दयांवर मतदान करण्याचा महिलांचा निर्धार

भेजगावात आपल्या मुद्दयांवर मतदान करण्याचा महिलांचा निर्धार

मूल - तालुक्यातील भेजगांव येथे महिलांनी आपल्या मुदयावर मतदान करण्याचा
निर्णय घेऊन गावात अॅॅड. पारोमिता गोस्वामी यांचे हस्ते फलकाचे उदघाटन व
कार्यक्रम घेतला.
भेजगाव येथे महिलांनी श्रमिक एल्गार संघटना स्थापन करून 8 मार्च श्रमिक
महिला मतदार अधिवेशनात सहभागी झाले. अधिवेशनात आपल्या मुदयांवर मतदान
करण्याचा निर्धार महिलांनी केला होता. त्याचा परीणाम भेजगांव येथील
महिलांमध्ये झाला. महिलांनी चंद्रपूर जिल्हा दारूबंदी कधी होणार, भेजगांव
येथील नदीवर पुल कधी होणार, निराधारांचे अनुदान 1500 रूपये कधी होणार,
बिपिएलचा घोळ कधी संपणार या मुदयांवर उमेदवारांने व पक्षाचे
कार्यकत्र्यांनी बोलावे असा फलक लावला. या फलकाचे उदधाटन अॅड. पारोमिता
गोस्वामी यांचे हस्ते उदघाटन झाले. यावेळी गावात सभा घेण्यात आली. सभेत
विजय सिध्दावार, विजय कोरेवार, अरूण जराते, गिता गणवीर आदींनी मार्गदर्शन
केले. गावात महिलांचा कार्यक्रम होउ नये यासाठी येथील पदाधिकारींनी अडथळा
निर्माण केला होता परंतु महिलांनी विरोध पत्कारून कार्यक्रम घेतला.
याकरीता रत्नमाला लेनगुरे, रंजना मोहुर्ले, छाया तेलावार, सुनिता
तेलावार, सुरेखा वाढई, कल्पना कावळे, लक्ष्मी चटारे, कवळाबाई निकोडे आदी
महिलांनी पुढाकार घेतला.

पुन्हा फलक लावावे लागले
मुल - तालुक्यातील भेजगांव येथे आमचे मत आमच्या मुदयांवर असा फलक
महिलांनी लावला परंतु गावातील विरोधक पदाधिकाÚयांनी हा फलक दुसÚया दिवशी
काढल्याने महिलांनी घेराव घालुन फलक लावण्यास भाग पाडले.
भेजगांव येथे आपल्या मुदयांवर महिलांनी गावात सार्वजनिक ठिकाणी फलक
लावला. परंतु महिला स्वता निर्णय घेत असल्याने, संघटीत होत असल्याने
येथील उपसरपंच अखिल गांगरेडीवार यांना खटकले. यांनी ग्रामपंचायतच्या
कर्मचायाकडुन फलक काढले. ही बाब महिलांना माहित होताच महिला एकत्र आल्या
व उपसरपंचाला जाब विचारीत चैकातच चार तास घेराव घातला. महिलांच्या
प्रश्नाचे भडीमारापुढे उपसरपंचाचे काहीच चालले नाही, यावेळी महिलांनी
गांगरेडीवार याचा शर्टही फाडला. शेवटी उपसरपंचालाच फलक त्याच जागेवर
लावावे लागले. यावेळी महिला शक्तीचा विजय झाला. गावातील लोकांनी गावात
प्राथमिक आरोग्य केंद्र व्हावे, बॅंक व्हावे, सब मायनर व्हावे हे मुदेही
घेण्यास सांगीतले

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.