সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, March 24, 2014

श्रीमंत आम आदमी उमेदवार

देवतळे : ५ कोटी
चटप :     ३ कोटी
अहीर :     १.५ कोटी


चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातील काँग्रेसचे संजय देवतळे उमेदवार करोडपती असल्याचे त्यांच्या शपथपत्रावरून स्पष्ट होते. यात देवतळेंचा क्रमांक पहिला लागतो. त्या पाठोपाठ आपचे वामनराव चटप व नंतर हंसराज अहीर यांचा क्रमांक येतो. 

संजय देवतळे यांच्या शपथपत्रानुसार, त्यांच्याकडे टोयोटाची क्वॉलिस, स्वीप्ट आणि इनोवा कार आहे. पत्नीच्या आणि मुलीच्या नावे प्रत्येकी एक अँक्टिवा दुचाकी आहे. संजय देवतळे यांच्या स्वत:कडे एक लाख ३८ हजार रुपये किमतीचे दागिने आहेत. पत्नीकडे १ लाख ७५ हजारांचे व दोन्ही मुलांकडे ४0 हजार ५00 रुपये किमतीचे दागिणे आहेत. वरोरा येथे असलेल्या घराशिवाय तीन प्लॉट, मुंबईतील आशीर्वाद सोसायटीे तसेच श्रद्धा बिल्डींगमध्ये फ्लॅट आहेत.

दुसर्‍या क्रमांकावर 'आप'चे वामनराव चटप आहेत. दोन लाख रूपये नगदी रक्कम असल्याचे त्यांनी म्हटले असून त्यांच्याकडे १३ लाख रुपये किंमतीचे सफारी वाहन आहे. त्यांच्या स्वत:कडे २५ ग्रॅम सोन्याचे दागिने आहेत. तर, पत्नीकडे तीन लाख रूपयांचे १00 ग्रॅम दागिने आहेत. आपल्याकडे २४एकर जमीन असल्याचे चटप यांनी शपथपत्रात म्हटले असून त्याची किंमत सुमारे एक कोटी २५ लाख रूपये असल्याने त्यांनी म्हटले आहे. त्यांच्याकडे मुंबईत ४३ लाख 50 हजार रुपयांचा फ्लॅट असून राजुरा येथे घर असल्याचे म्हटले आहे. अशी एकूण तीन कोटी रूपयांची संपत्ती असल्याचे त्यांनी शपथपत्रात म्हटले आहे. 

भाजपाचे हंसराज अहीर यांचा लागतो. त्यांचे शिक्षण दहावीपर्यंत आहे. शपथपत्रात त्यांनी आपल्याकडे ४८ हजार रूपयांची रोख रक्कम असल्याचे म्हटले आहे. विविध बँकेत २२ लाख ५0 हजार रूपये शिल्लक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एक कार आणि २२ लाख ५0 हजार रूपये किंमतीचे ७५0 ग्रॅमचे दागिणे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जुनोना आणि घोडपेठ येथे एकूण ८.३३ हेक्टर शेतजमीन असून त्याचे बाजारमूल्य ५२ हजार असल्याचे म्हटले आहे. त्यांच्या संपत्तीचा आकडा दीड कोटी रूपयांच्या जवळपास जातो. 

तृणमूल कांग्रेसचे उमेदवार पंकजकुमार शर्मा यांनी स्वत:कडे ३७ हजार रूपये रोख व पत्नीकडे ५६ हजार रुपयांची रक्कम असल्याचे शपथपत्रात म्हटले आहे. त्यांच्या नावे बँकेत १२ लाख ५0 हजार ५00 रुपये तर, पत्नीच्या नावे २७ लाख ५0 हजार रुपये जमा आहेत. त्यांच्या नावे एक लाख ७९ हजार ३0२ रुपयांची एलआईसी पॉलिसी असून पत्नीच्या नावे ३ लाख ५५ हजार ५२0 रुपयांची पॉलिसी आहे.
त्यांच्या स्वत:कडे दोन लाख रुपये किमतीचे व पत्नीकडे तीन लाख रूपयांचे सोने असल्याचे त्यांनी दर्शविले आहे. त्यांच्या स्वत:च्या आणि पत्नीच्या नावे चंद्रपुरातील ओंकारनगर आणि नागपुरात सोमलवाडा येथे एक प्लॉट आणि फ्लॅट असल्याचे म्हटले आहे. पत्नीच्या नावे ४ लाख ५0 हजार रुपयांचे कर्जही आहे
.
बसपा उमेदवार हंसराज कुंभारे यांनी स्वत:कडे १५ हजार ५00 रुपयांची रोकड असल्याचे शपथपत्रात म्हटले आहे. सोबतच, ५0 हजार रूपयांचा डाक विमा असल्याचे म्हटले आहे. तसेच २ लाख ५0 हजार रूपयांचा विमा असून ८६ हजार ८00 रूपयांचे दागिने असल्याचे म्हटले आहे. आईच्या नावे 0.६ आर जमीन असल्याचेही त्यांनी शपथपत्रात नमूद केले आहे. 

       महागडी वाहने 
संजय देवतळे : शिक्षण बीई फायनल. 
बँक खाते - १0. शिल्लक ४८,६१,६१३ रूपये. पत्नीच्या नावे ३ खाते. शिल्लक ८,६३,५५७ रूपये. शेअर्स- २२,७0,२२२ रूपये. शेती- ४४.८३ एकर. पत्नीच्या नावे १२.८१ एकर. मुंबईत दोन फ्लॅट. एकूण संपत्ती - पाच कोटी. 

वामनराव चटप : शिक्षण एलएलबी. 
शेतजमीन- २४ एकर. (किंमत १.२५ कोटी). मुंबईत फ्लॅट - किंमत ४३,५0,000 रुपये. सफारी वाहन- किंमत १३ लाख. सोन्याचे दागिणे - २५ ग्रॅम. पत्नीकडे सोन्याचे दागिने- १00 ग्रॅम. नगदी रक्कम - २ लाख रूपये. एकूण संपत्ती - सुमारे ३ कोटी.

हंसराज अहीर : शिक्षण - दहावी. 
बँकेत शिल्लक -२२ लाख ५0 हजार. शेतजमीन- ८.३३ हेक्टर. भानापेठ व गोकूल वॉर्डात ३१ लाख रूपयांची जमीन. दागिने- ७५0 ग्रॅम. किंमत २२ लाख ५0 हजार. एकूण संपत्ती- १.५ कोटी
        कर्ज
देवतळे यांच्यावर जिल्हा मध्य. सह. बॅकेचे ९६ हजार ९00 रुपयांचे, महाराष्ट्र सह.बँकेचे १0 लाख ३६ हजार ३0६ रुपयांचे, इंडियन ओवरसीज बँकेचे ९ लाख ६२ हजार ५४0 रुपये आणि इतर १३ लाख३९ हजार ३६२ रुपयांचे असे मिळून ३४ लाख ३५ हजार रुपयांचे कर्ज आहे. वामनराव चटप यांच्यावर जिल्हा मध्य.बँकेचे १३ लाख रूपयांचे कर्ज आहे. हंसराज अहीर यांच्यावर ९९ हजार ५00 रूपयांचे कृषी कर्ज आहे. 

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.