সংবাদ শিরোনাম
লোডিং...
Menu

Monday, March 24, 2014

गडचिरोलीत नक्षलवादामुळे उमेदवारांचा प्रचार झाला हायटेक !

गडचिरोली, दि. २४ मार्च
नक्षलवाद्यांच्या प्रभावामुळे दुर्गम भागात प्रचार करू शकणाèया गडचिरोलीतील उमेदवारांना हेलिकॉप्टर देण्याचा निर्णय काँग्रेस व भाजपने घेतला आहे. यामुळे राज्यात सर्वात मागास असलेल्या या मतदारसंघातील प्रचार मात्र हायटेक होणार आहे.

राज्याच्या टोकावर असलेल्या गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघात नक्षलवाद्यांच्या प्रभावामुळे निवडणूक घेणे प्रशासकीय यंत्रणेसाठी नेहमीच जोखमीचे काम होऊन बसले आहे. निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्नसुद्धा त्यांच्याकडून होतो. यावर उपाय म्हणून दुर्गम भागातील मतदान केंद्रावर कर्मचारी व इतर सामुग्री पोहोचवण्यासाठी प्रशासनाकडून हेलिकॉप्टरचा वापर केला आहे. आता तोच कित्ता राजकीय पक्षांनीसुद्धा गिरवण्याचे ठरवले आहे. या मतदारसंघातील अहेरी, गडचिरोली, वडसा व आमगाव या चार विधानसभा मतदारसंघात नक्षलवाद्यांचा सर्वाधिक प्रभाव आहे. निवडणूकीतील उमेदवार हा धोका टाळण्यासाठी दुर्गम भागात प्रचारासाठी जातच नाहीत. येथे काँग्रेसकडून आमदार डॉ. नामदेव उसेंडी, तर भाजपकडून अशोक नेते रिंगणात आहेत. या वेळी खर्च मङ्र्मादा वाढवण्यात आल्याने हेलिकॉप्टरचा वापर करणे श्नय झाले आहे, असे या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सांगितले.

শেয়ার করুন

Author:

Etiam at libero iaculis, mollis justo non, blandit augue. Vestibulum sit amet sodales est, a lacinia ex. Suspendisse vel enim sagittis, volutpat sem eget, condimentum sem.